आरोग्य

दिवाळीत खात असाल अधिक मिठाई तर वेळीच काळजी घ्या, नाहीतर…

Published

on

[ad_1]

Sweets on Diwali:  दिवाळी म्हटलं की मज्जा मस्ती आलीच. दिवाळीचा सण सुरु झालाय. फटाके, फराळ, रांगोळी आणि दिव्यांचा लखलखाट म्हणजेच दिवाळी. भारतात दिवाळीचा उत्साह सर्वत्र पाहायला मिळतो. जर तुम्हाला कोणी सांगितले की दिवाळीत  मिठाई खाऊ शकत नाही असं सांगितल्यास तुम्हाला राग येईलच पण आपल्या आरोग्याची काळजी घेणे हे देखील महत्त्वाचे असते. पण तरीही तुम्ही दिवाळीत मिठाई खाणार असाल तर नक्कीच जाणून घ्या मिठाईमध्ये किती कॅलरीज असतात? या छोट्या-छोट्या गोष्टींची काळजी घेतल्यास तुमचे आरोग्य चांगले राहते. (If you eat more sweets during Diwali be careful at the right time nz)

तज्ञांच्या मते

1. जर तुमचे पोट भरले असेल तर तुम्ही गोड पदार्थ कमी खावेत. जर तुम्ही अन्न खाल्ले नसेल तर थोडी जास्त मिठाई देखील नुकसान करत नाही. जर तुम्ही जास्त खात असाल तर वर्कआउटवर लक्ष केंद्रित करा.

2. तुम्ही दिवसातून तीन किंवा चार वेळा खावे, म्हणजेच दिवसभरात 2200 कॅलरीज घ्याव्यात. जर तुम्ही इतक्या कॅलरीज वापरल्या असतील तर तुम्ही जास्त गोड खाऊ नये. याशिवाय तुम्ही वर्कआउट करा आणि जास्तीत जास्त पाणी प्या.

3. बाहेरील गोड खाणे टाळावे.

Advertisement

आहारतज्ञांच्या मते

1. जेवण झाल्यावर मिठाई खा.

2. जे लोक मिठाई खातात त्यांनी भरपूर पाणी प्यावे. ज्यामुळे तुमच्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात.

3. शक्य असल्यास, मिठाई खाल्ल्यानंतर किमान 20 मिनिटे व्यायाम करा.

4. दिवाळीनंतर तुमचा डाएट प्लॅन बनवा.

मिठाईमधून तुम्हाला किती कॅलरीज मिळतात?

1. रसगुल्ला

1 ग्रॅम चरबी, 2 मिलीग्राम कोलेस्ट्रॉल, 150 कॅलरीज (2 तुकड्यांमध्ये)

Advertisement

2. दूध केक

9 ग्रॅम चरबी, 20 मिलीग्राम कोलेस्ट्रॉल, 175 ग्रॅम कॅलरी प्रति 50 ग्रॅम.

3. राबरी

19.9 ग्रॅम चरबी, 20 मिलीग्राम कोलेस्ट्रॉल, 373.7 ग्रॅम कॅलरी प्रति 1 कप.

(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. दैनंदिन आयुष्यात याचा वापर करायचा झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

[ad_2]

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ट्रेंडिंग

Exit mobile version