Connect with us

ब्लॉग

आता Zomato किराणा मालाची देखील डिलिव्हरी करणार

Published

on

zomato

कोरोनामुळे जरी संपूर्ण देशात लॉकडाऊन असला तरी अत्यावश्यक गोष्टींच्या खरेदीसाठी ठीक ठिकाणी लोकांची गर्दी दिसून येते.

सरकार जरी वारंवार सामाजिक अंतरच (Social Distancing) महत्त्व पटवून देत असल तरी सुध्दा बरेच लोक किराणा मालाच्या नावाखाली सरास घरातून बाहेर पडताना दिसतात.

आणि दुकाने, भाजी मार्केट इत्यादी ठिकाणी लोकांची खूप गर्दी होते. लोक अगदी बेभान होऊन सामान खरेदी करण्याच्या मागावर असतात.

एकीकडे दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत असून सुध्दा अजून लोकांमध्ये जगृतता निमार्ण होत नाहीय. प्रशासन आणि पोलिस नेहमीच वेगवेगळ्या पर्यायातून सामाजिक अंतर (Social Distancing) अवलंबणात आणण्याचा प्रयत्न करतात.

हे पण वाचा: अर्जुन रामपालला का कर्जतला रहायला आवडत?

आशातच लोकांनी घरात राहावे व फक्त किरणामालाच्या निमित्ताने घराबाहेर जाणे टाळवे या निमित्ताने ठाणे महानगरपलिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एक सुंदर अशी युक्ती केलीय.

लॉकडाऊन सगळ्याच कंपन्या, हॉटेल्स बंद आहेत. काही खाण्याचे हॉटेल्स मात्र सुरू आहेत. त्यांच्या फूड डिलिव्हरी ह्या Swiggy आणि Zomato करता आहेत.

Zomato ठाण्यामध्ये किराणा मालाची डिलिव्हरी करणार?

लोकांची होणारी गर्दी टाळण्यासाठी ठाणे महानगरपालिकेने Zomato या कंपनी सोबत कॉन्ट्रॅक्ट करून त्यांना किराणा मालाची डिलिव्हरी ठाण्या शहरामध्ये करण्यास सांगितली आहे.

या सेवेचा लाभ घेण्यासाठी ठाणेकरांना http://essentials.thanecity.gov.in यासंकेतस्थळावर जावून ऑर्डर द्यावी लागेल. या योजने अंतर्गत तुम्ही किरणामाल, भाज्या, फळे, मास मच्छी तुम्ही घरात बसवून मागवू शकता.

जेणेकरून या वस्तूंची खरेदी करण्याच्या निमित्ताने बाहेर जाणाऱ्यांची संख्या कमी होईल, परिणामी कोरोनाला आळा घालण्यास मदत होईल.

सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला हे सामान अगदी घरपोच मिळणार आहे आणि त्यासाठी कोणत्याही प्रकारची अधिक डिलिव्हरी चार्जेस देखील लागणार नाहीत.

तर ठाणेकरांनो आता उगाच बाहेर पडणं थांबवा आणि महानगरपालिकेने दिलेल्या सेवेचा लाभ घ्यावा.

जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर ती नक्की शेअर करा आणि त्याचबरोबर नवनवीन माहिती मिळवण्यासाठी कोकणशक्तीला फेसबुक’वर लाईक करा व इंस्टाग्राम वरती फॉलो करा.

Continue Reading
Advertisement
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *