Connect with us

ब्लॉग

सुंदर दिसण्यासाठी या वनस्पतीचा उपयोग करा!

Published

on

Alovera

कोरफड हे नाव आयुर्वेदामुळे सर्व परिचित आहे. थंडावा देणरी वनस्पती म्हणून देखील ही  सर्वत्र परिचित आहे. मराठीमध्ये या वनस्पतीला कोरफड, इंग्रजीमध्ये हिला ॲलो, तर  संस्कृत मध्ये कुमारी म्हणतात. तर विदर्भातील झाडी प्रांतात हिला गवारफाटा असेही म्हणतात. कोरफडीच्या रसामध्ये ए, सी, बी१ बी२, बी३, बी६ व फॉलिक ऍसिड असल्याने कोरफडीचा रस अत्यन्त गुणकारी आहे. त्यामुळे कोरफडीच्या रसाचं नियमित सेवन करणं आवश्यक आहे. 

कोरफडीच्या जवळजवळ पाचशे प्रजाती आहेत. परंतु सर्वच प्रजाती याऔषधी व गुणकारी नाहीत. या वनस्पतीला जास्त माती, जास्त पाण्याची आवश्यकता नसते. त्यामुळे काही ठिकाणी शेतकरी मोठ्या प्रमाणवर कोरफडची शेती करतात. या वनस्पतीची पानं  रसरशीत व जाड मांसल असतात.

या वनस्पतीचे मूळ उत्पत्तिस्थान हे वेस्टइंडिज आहे. भारतात प्रामुख्याने  हिच्या दोन प्रजाती जास्त आढळतात त्या म्हणजे ॲलोवेरा व  ॲलोइंडिका ह्या आहेत.                        

हे वाचा: मोबाईलचा अतिवापर करणं एका टी.व्ही. अभिनेत्रीला पडलं महागात                  

कोरफडीचे अनेकोत्तम  उपयोग

कोरफडीचा प्रामुख्याने सौन्दर्य प्रसाधनांमध्ये वापर केला जातो.  याशिवायही हिचे अनेक उपयोग आहेत. कोरफडीचा रसअतिशय थंड असल्याने भाजल्यास, जळजळ होत असल्यास  लावल्याने  भाजलेली जखम, व जळजळ  लवकर  बरी होते. लहान मुलांना सर्दी कफ खोकला झाल्यास कोरफडीचा रस दिल्यास त्यांना लवकर अराम  पडतो.                                                               

निरोगी व सुंदर डोळ्यांसाठी

अलीकडे सौन्दर्यासाठी अनेक क्रिम्सचा वापर केला जतो. पण काही वेळेस आपल्याला साईड इफेक्ट्सना सामोरे जावे लागते. अशावेळी जरआपण कोरफडीचा रस काढून जर डोळ्यांच्या सभोवताली लावला तर डोळ्यांची जळजळ, डोळ्यांना आलेली सूज, डोळ्यांच्या खालच्या पापणीच्या खाली झालेला काळा भाग असे अनेक डोळ्यांचे विकार या कोरफडीच्या रसाने बरे करूशकतो.     

निरोगी व सुंदर त्वचेसाठी 

आज ग्लोबल  वॉर्मिग मूळे अनेक  त्वचा विकारांना  सामोरे जावे  लागत  आहे  जर आपणाला मुलायम त्वचा, त्वचेवर काही जखमांमुळे पडलेले डाग. चेहऱ्यावरील डाग घालवायचे असल्यास कोरफडीचा रस अत्यन्त गुणकारी आहे. 

नखे चमकदार बनवा

कोरफडीचा रस हे मुळात  एका  उत्तम जेलचे  काम करते. हिवाळ्यामध्ये आपली त्वचा नखे कोरडी पडतात. अशावेळी कोरफडीचा रस  नखांच्या मुळाशी व त्वचेस लावल्यास नखे, त्वचा चमकदार होते.   

सन बर्न मुळे होणाऱ्या त्रासापासून बचाव

ओझोनच्या  थराला पडलेल्या छिद्रामुळे आज प्रखर सूर्य किरणांना सामोरे जावे लागत आहे. अशावेळी त्वचेवर लाल रंगाचे चट्टे पडतात. त्वचेला भेगासुद्धा पडतात. अशावेळी प्रखर उन्हात जाताना त्वचेला कोरफडीचा रस लावून बाहेर   पडल्यास  या होणाऱ्या त्वचा विकारांना सामोरे जावे  लागणार नाही. 

कोरफडीच्या रसाचा स्क्रब म्हणून  वापर

 आपली त्वचा स्वच्छ, मऊ , मुलायम  ठेवायची  असल्यास  कोरफडीच्या रसामध्ये  लिंबाचा रस, साखर मिसळून त्याचा  स्क्रब तयार करून लावावा . स्क्रबमुळे आपल्या त्वचेवरील कोरडी त्वचा   निघून जाते व त्वचा हायड्रेड ही होते.शिवाय कोरफडीच्या रसामध्ये नारळाच्या तेलाचे  थेंब  मिसळून हाताच्या पायाच्या कोपरांच्या ठिकाणी त्वचा काळी झालेली असते त्याठिकाणी    लावल्यास  काळे पणा निघून जातो.  

हे वाचा: तुळशीची पाने कसे बरे करतील तुमचे आजार ?

केसांच्या सुंदर वाढीसाठी 

आजकाल केस गळणे ही  फार मोठी समस्यां निर्माण झालेली आहे. अर्थात याला आपला आहार व केसांसाठी वापरत असलेले शॅम्पू ही  काही प्रमाणात जबाबदार आहेत . म्हणूनच यावर एक उत्तम उपाय आहे कोरफड. कोरफडीने केसांचे गळणे थांबते.

केसात कोंडा होत नाही. केस काळे व चमकदार होतात.यासाठी कोरफडीचा रस काढून घेऊन त्याने केसांना व डोक्याला चान्गला मसाज करावा. तसेच कोरफडीचा रस व लिंबाचा रस यांचे मिश्रण करून ते  ओल्या केसांना लावावे, केस गरम पाण्यात भिजवलेल्या टॉवेलने पंधरा ते वीस मिनिटे बांधून ठेवावेत. नन्तर कोमट पाण्याने केस धुवावेत असे केल्याने केस मऊ,  मुलायम, घनदाट व काळेभोर होतात. केसांची सुंदरता वाढते.

याशिवाय अनेक समस्यांवर कोरफड रामबाण उपाय आहे जसे की , वजन  कमी करण्यासाठी कोरफडीच्या  रसाचे सेवन  करावे. कोरफडीमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते व  रक्ताचे प्रमाण सुधारते.

कावीळ झाल्यावरही कोरफडीच्या रसाचे सेवन केल्यास कावीळ बरी होते. गुडघेदुखीवर कोरफडीचा रस लावल्यास काही प्रमाणात आराम मिळतो. पोटांच्या समस्यांही कोरफडीचा रस घेतल्याने बऱ्या होतात.   सकाळी रिकाम्या पोटी कोरफडीचा रस नियमित सेवन केल्यास डोके दुखी सारखे त्रासदायक दुखणे ही  बरे होते. 

परंतु कोरफडीचे फायदे जरी भरपूर असले तरी त्याचे तोटे ही काही प्रमाणत आहेत. तेव्हा कोणत्याही गोष्टीचा अतिवापर टाळावा. मधुमेहअसलेल्या व्यक्तींनी,  गर्भवती स्त्रियांनी याचा वापर टाळावा. आवश्यक वाटल्यास डॉक्टरांचा सल्लाही घ्यावा.

 तर मित्रांनो कोरफड ही अतिशय गुणकारी वनस्पती आहे. आपणही जर कोरफडीचा वापर करत  असाल तर तो  कशाप्रकारे करता हे खालील कमेंट बॉक्स मध्ये कळवायला विसरू नका.

Continue Reading
Advertisement
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *