Connect with us

विश्व

अमेरिका चीन नव्हे तर हा देश शक्तिशाली देश म्हणून पुढे येतो आहे.

Published

on

America China India

कोरोना! काही महिन्यांपूर्वी हा शब्द फक्त चीन या देशा पुरता मर्यादित होता. पण बघता बघता, कोरोना नावाच्या विषाणूने संपूर्ण जगाच काबीज केला आहे. चीनच्या वुहान शहरापासून सुरुवात झालेला COVID-19 या आजाराने जगभरात लाखो बळी घेतले आहेत.
आपणा सर्वांना याविषयी माहिती आहे, त्यामुळे कोरोना काय आहे आणि त्याची सुरुवात कशी झाली याबाबत तुम्हाला काही वेगळं सांगायला नको.

जगातील सर्वात शक्तिशाली असा देश म्हणजे अमेरिका, त्याच्या पावलावर पाऊल ठेवून नव्याने महाशक्ती म्हणून उदयास येणार आदेश म्हणजे आपला शेजारी देश चीन. कोरोना महामारी च्या काळात छोट्या देशांना मोठ्या देशांकडून मदतीची अपेक्षा असते. अमेरिका, इटली, जर्मनि यासारख्या देशांना चीन पेक्षाही जास्त नुकसान होत आहे.

अशा आणीबाणीच्या परिस्थिती वेळी अमेरिका इतर देशांच्या मदतीला जात असते, आणि आणि आपणच या जगातील महासत्ता आहोत हे सिद्ध करत असते. पण चक्क यावेळी जगातील सर्वात बलाढ्य देशाला म्हणजेच अमेरिकेला मदतीची हाक मित्र राष्ट्रांकडे मागावी लागत आहे.

अमेरिकेतील कोरुना रुग्णांची संख्या हे दिवसेंदिवस वाढतच चालली आहे आज हा लेख लिहिताना अमेरिकेतील कोरूना बाधित रुग्णांची संख्या ही सहा लाखांच्या घरात आहे. अमेरिकेतील कोरोना बाधित रुग्णांची संख्या प्रदेशांच्या तुलनेत तीन पटींनी पेक्षा अधिक आहे. त्या परिस्थितीमध्ये अमेरिका दुसऱ्या देशाकडे मदतीचा हात मागतो यात नवल नाही.

नवल तर या गोष्टीचे आहे की अमेरिकासारख्या देशाने चक्क भारताकडे मदतीचा हात मागितला आहे. आज पर्यंत अमेरिका सारखा देश भारताला दुर्बल मानत होता, पण अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी चक्क सोशल मीडियाच्या माध्यमातून भारताला विनंती केली.

त्याच असं झालं, की अमेरिकेतील कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी, यांना हायड्रोक्सीक्लोरोक्वीन या औषधाची ची आवश्यकता होती. आणि हे हायड्रोक्सीक्लोरोक्वीन भारताकडे मूलभूत प्रमाणात आहे. भारताने निर्यातीवर निर्बंध लागल्याने अमेरिकेला भारतीय सरकारला विशेष विनंती करून त्या औषधा वरील निर्बंध करण्यास विनंती करावी लागली.

एकीकडे भारतामध्येही कोरोना रुग्णांची दिवसेंदिवस वाढत असून सुद्धा भारत सरकारने अमेरिकेला हायड्रोक्सीक्लोरोक्वीन हे औषध दिलं. फक्त अमेरिकाच नव्हे इतर शेजारी राष्ट्र नेपाळ, भुटान, श्रीलंका, अफगानिस्तान या देशांना सुद्धा भारताने मदत केली आहे.

जे अमेरिका, इटली, इंग्लंड, जर्मनी, चीन यासारख्या देशांना जे जमलं नाही ते भारताने करून दाखवलं. भारतामध्ये कोरूना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, असे असून देखील इतर देशांना मदत करण्यापासून भारत मागे हटला नाही. आणि म्हणूनच कोरूना साथीच्या रोगाच्या वेळी भारत एक महाशक्ती म्हणून उदयास येत आहे.

जर तुम्हाला वरील माहिती उपयुक्त वाटत असेल तर नक्की शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंट बॉक्समध्ये नोंद करायला विसरू नका. तसेच नवनवीन नाविन्यपूर्ण माहिती मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा व इंस्टाग्राम वरती आम्हाला फॉलो करा.