ब्लॉगजगभटकंतीसाहित्य

मार्क्सचा सिंधू-संस्कृती विपर्यास

शोषक आणि पोषक या बाबी मानवी समूहाच्या इतिहासा इतक्याच जुन्या आहेत. भूक आणि संरक्षणीय निवारा या माणसाच्या रानटी अवस्थेपासून मूलभूत गरजा आहेत. माणूस गुहा अथवा झाडांच्या डोलीमधून ज्यावेळी टोळीप्रधान जीवन जगू लागला त्यातून इतर टोळ्यांशी त्याचे सुजलाम, सुफलाम टापूसाठी झगडे सुरु झाले. त्यातूनच जीत आणि जेते या संकल्पना अस्थित्वात आल्या. जे जेते होते ते जीत समूहाचे आपल्या प्रबळतेने शोषण करू लागले.

त्यासाठी तो आपल्या मेंदूचा अधिकाधिक वापर करू लागला. तेव्हाच माणूस हा वैचारीक प्राणी आहे असे म्हटले जाऊ लागले. अन्य टोळ्यांच्यावर वर्चस्व स्थापन केल्यानंतर त्यांच्या शोषणाच्या विविध मार्गांचा तो विचार करू लागला. पण सतत झगडे करण हे आपल्या हितसंबंधनाबाधक आहे. याची कालांतराने त्याला जाणीव झाली आणि टोळीप्रधान लोकसमूहांचा सामाजिक विकास कालौघात सुरु झाला. यातूनच सामाजिक उन्नयनाची प्रक्रिया, मूलधरुन निर्माण झाली. आर्य-अनार्यांचे झगडे मिटले आणि सामाजिक शोषण मुक्ततेच्या दिशेने प्रवास सुरु झाला.

अथार्त ही चार दिवसात घडलेली घटना नव्हती. त्यासाठी लक्षावधी वर्षे खर्च पडली. हीच मानवी समाजाच्या उत्क्रांतीची अवस्था. ती थेट उपनिषदांपर्यंत जाऊन भिडली. (अर्थात ती थांबलेली नाही; कारण कालौघ कधीच थांबत नसतो.) कालौघाचा पाणलोट नव्या नव्या अनुभवाधारित ज्ञानाचा नवा नवा उन्मेष घेऊन येत असतो. म्हणून ज्यावेळी व्यापक समाजभान जागल त्यावेळी बालहीनांवर समाजात मंथन सुरु झाले आणि त्याचे निष्कर्ष निसर्गाच्या नियमांशी भिडले ते म्हणजे – “जागा आणि जगू द्या ” आणि बाळहीनांना जगण्याचा हक्क असतोच.

या विचार मंथनाचा काळ म्हणजेच वैदिक काळ. ज्ञानगंगा अविरत वाहातच असते, म्हणूनच ती अनंतकालीन असते. नवे अनुभव नवे निष्कर्ष अखंड असतात, हेच जीवनाचं सत्य आहे. अपरिवर्तनीय आणि “Ultimate Truth is Only” सतचित आनंद, हेच होय. विशालता हेच त्याचे स्वरूप होय. म्हणूनच उपनिषदांत ती आवर्जून आढळते. बाहुबल आणि राजकीय सत्ता असा ज्यावेळी तीचा संकोश होतो त्यावेळी तो उलट्या दिशेचा प्रवास असतो. म्हणूनच सर्व शक्तिमान, सर्व साक्षी आणि सर्वांभूती असणाऱ्या परमेश्वराने सदाचरणाची भावना निर्माण केली. वेन वेदांतांच सम्यक सार मानल्या गेलेल्या गीतेत ‘परित्राणाय साधूनाम । विनाशायाच दुष्कृताम । 

धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे ।। अशा शब्दात या सदभावना प्रक्रियेचा नियम ग्रथित करून ठेवला. यातील ‘धर्म ‘ या संज्ञेचा अर्थ पोथिनिष्ठपणे Religion असा न घेता व्यक्तीचे समष्ठीप्रत (समाज) कर्तव्य असाच घेणे यथोचित आहे. ज्ञान-विज्ञानाच्या विस्तारलेल्या आजच्या युगात आपण माणूस हा ‘रॅशनल’ आहे असे मानतो. धार्मिक लोकनेता अथवा प्रेषित म्हणून पुढे आलेला कोणीही याचा विपर्यास करू नये.

याच दृष्ठीने ज्यावेळी आपण वर्गविग्रहाचे तत्वज्ञान मांडणाऱ्या मार्क्स कडे पाहतो त्यावेळी त्याचे अंतिम परिणाम किती हानिकारक असू शकतात याची स्पष्ट जाणीव आपल्याला होते, आज भारतात गडचिरोली आदी भागात पसरलेल्या नक्सलवाद्यांच्या भयानक परिणामांची जाणीव समाजातील नव्यापिढयांना व्हायला हवी आणि सांस्कृतिक दृष्ठ्या व्यष्टी (व्यक्ती) पेक्षा समष्टी (समाज) महत्वाचा आहे हे भान निर्माण व्हायला हवं.

युरोपमध्ये जी औद्योगिक क्रांती झाली त्यामधून समाज जीवनाची धाडी विस्कटली आणि खाजगी संपन्नतेकडे समाज विस्कटलं. हे असे का झाले यावर मार्क्सने विचार केला असता त्याला यातून चाट मुद्दे गवसले . म्हणजे ‘अतिरिक्तता ‘, ‘वर्गाचा आकृतिबंध ‘, ‘शोषण ‘, आणि ‘धारं या चारही मुद्द्यांचा साकल्याने विचार करता ते ‘सामाजिक विभागाणीं’ याच ऐका संकल्पनेत मानवी समाजाची विपर्यास्तविभागणी झाली मानवी समाजातला एकजीनसीपणा नष्ट झाला. ‘धर्म ही अफूची गोळी आहे.’ हा मार्क्स चा सिद्धांत याच दृष्ठीने पाहावा लागेल. पण मग धर्माला पर्याय म्हणून वर्गविग्रह तरी काय करतो?

सर्वसामान्य माणूस हा धार्मिक असतो याचा फायदा धर्मोपदेशक आणि सत्ताधीश यांच्या संगनमताने घेतला आणि शोषण हा त्यांचा परिणाम ठरला. पण मग अशा क्षणभंगूर आणि दुर्बल आधारावर आपला विचार अवलंबून ठेवण्याऐवजी मार्क्सवाद्यानी वैदिक वाङ मयाचा अभ्यास केला आसता तर त्यांना त्यात भरपूर वैचारिक खाद्य मिळालं असतं आणि विद्यमान समाजातील अनेक गैर व्यवहारांवर ते तोडगे वापरता आले असते. 

मार्क्स आणि मार्क्सवादी यांची प्रारंभी अपेक्षा होती की, इंग्लंड व फ्रांस यांज सारख्या संपूर्णतः औद्योगिक बनलेल्या राष्ट्रात त्यांच्या विचारांचा प्रसार होईल पण झाले उलटेच. रशियासारख्या आधीच औद्योगिक दृष्ठ्या मागासलेल्या देशात लेनिन व ट्रॉटस्की यांच्या क्रांतीकारक नेतृत्वाखाली मार्क्सवाद अंगिकारण्यात आला. लेनिन याच्या हुकूमशाही नेतृत्वाखाली सर्व सामान्य जनता, कामकरी वर्ग यांच्यावर अधिराज्य मिळाले.

त्यानंतर स्टॅलीनने माणसाची माणसापासून शोषण मुक्ती करण्यासाठी समाजवाद या गोंडस नावाखाली अत्याचारांची परंपरा राखली. संपत्तीचे समाजात समसमान वाटप या नावा खाली ते केले गेले. त्याचा परिणाम असा झाला की, लोकांचे अनन्वित हाल झाले. उत्पादन वाढ थबकली आणि नोकसरशाहीत भ्रष्टाचार बोकाळला.

मार्क्स वाद हा युरोपीय देशात फसल्यानंतर मार्क्सवाद्यांनी आपल्या गृहितकांचा पुर्नविचार सुरु केला. रशिया आणि आणखी काही देशात झालेल्या क्रांतीचे कारण मार्क्स वाडी तत्वज्ञान असा डिमडिंम ते त्यावेळी वाजवीत होते पण आता त्याच वैचारिकतेला ते काळिमा फाशीत आहेत. ते आता म्हणू लागले आहेत कि, त्या देशांच्या कारभारात मार्क्सवादाचे तत्वज्ञान मुळातच नव्हते. रशियादी देशात जे अत्याचार घडले ते मार्क्सवादाने नव्हे तर नोकरशाहीने केलेली ती कृत्ये होती. याच नोकरशाहीने अर्थशास्त्रीय इतके घोटाळे करून ठेवले की, त्यांनाच त्या देशात टंचाई माजली. आता तर त्यांची मजल इथवर जात आहे की, खाजगी मालमत्तेचे उच्चाटण हे मार्क्सभिप्रेत नव्हतेच.

मग शेताची मालकी असणारा शेतकरी हा मार्क्सवादाला कधीच मान्य नव्हता अशी जी विचारसरणी मार्क्सने प्रस्तुत केली होती तीच काय? खार तर औद्योगिक क्रांतीच्या पार्श्वभूमीवर वर्गविग्रहाचे विचार मांडणाऱ्या मार्क्सनं शेतकरी वर्गाचा विचार केला असे वाटत नाही. त्यादृष्टीने मार्क्सवादात मानवी समाजापुढील सर्व समस्यांची उत्तर आहेत. हा मार्क्स आणि मार्क्सवाद्यांचा दावा संपूर्णतः फोल होता आणि उत्पादन हे तर मूळगामी असल्याने अर्थव्यवस्थेच्या विकासात शेतीचा आणि शेतीच्या उत्पादनाचा महत्वपूर्ण वाट असतो. पण मार्क्सवाद्यांनी पोथीनिष्ठ विचारसरणी स्वातंत्र्य व खाजगी पुढाकार यांची जीवनरेषाच तोडण्याचे अपश्रेय घेतले.

खुद्द मार्क्सला मात्र आपल्या वैचारिकतेत अनेक संदिग्धता असल्याची जाणीव असावी याची अनेक उदाहरणे सापडतात. जगात फक्त एकट्या महात्मा गांधींना या गफलतीची माहिती होती म्हणूनच त्यांनी राजेरजवाड्यांना प्रारंभीच ज्या संपत्तीचे प्रदर्शन तुम्ही अंगाखांद्यावर वागवीत आहेत त्यावर समाजाचा हक्क आहे असे स्पष्टपणे बजावून याच विचारातून पुढे विश्वसंस्थानची  विचारसरणी प्रतिपादन केली.

मार्क्सवाद्यांची खरी शोकांतिका म्हणजे त्यांचे हे कसरती वाकपांडित्य ऐकण्यात आज कुणालाच रस नाही. चीनने मार्क्सवाद स्वीकारला पण आज चीनने तर हुकूमशाही राजवटीखाली भांडवलशाही अर्थव्यवस्था राबविण्याचाच चंग बांधलेला आहे. आजच्या औद्योगिक युगात भांडवलशाहीने निर्माण केलेल्या व्यवस्थापन तंत्राचाच पुरस्कार केला जात आहे.

वर्ग विग्रहाचा मार्क्स चा विचार म्हणजे समाजाची वर्गवार विभागणीच आहे आणि त्याच श्रमिकांना अवास्तव महत्व दिले गेल्याने त्यात हिंसाचाराचा अवलंब हा त्याचा दुसरा टप्पा आहे. औद्योगिक शांतता नसेल तर उत्पादन विकास होऊ शकत नाही याची जाणीव आता अमेरिकेसारख्या भांडवलशाही देशालाही होऊ लागली आहे. कष्टकऱ्यांच्या पाटीपटीने वाढत राहिलेल्या हातांना उदरनिर्वाहाचे काम उपलब्ध करून द्यायचे तर औद्योगिक विकासाला पर्याय नाही या विचारांवरच आज जगाचा प्रवास सुरु आहे.

तत्वज्ञानाचा प्रवास हा एक चिरंतन प्रवास आहे. तो विश्वसंचारी आहे. माणूस हा बुद्धिजीव प्राणी असल्याने तत्वज्ञानाचा प्रामुख्याने माणूस आणि मानवी समाज यांच्यावरच विचार मांडले जातात. विचारणा अथवा वैचारिकतेला त्या त्या काळाच्या समाज परिस्थितीची चौकट लक्षात घ्यावी लागते. या चौकटीमुले माणसाचा सर्वांगीण विकास अडविला जात असेल तर त्या चौकटी की मोडून विकासनिष्ठ चौकटी निर्माण कराव्या लागतात. मार्क्स नेमका इथेच घसरला. कारण शोषणमुक्त समाज ही कल्पनाच त्याच्या लेखी जेम्स नव्हती.

माणसाकडून माणसाचं होणार शोषण इतकंच त्याला अपेक्षित होत. याचा अर्थ माणसाच्या इतर नैसर्गिक प्रेरणा त्यानं लक्षात घेतल्या नाहीत. ते अस्वाभाविक होत असं म्हणता येणार नाही. कारण युरोपातील औद्योगिक क्रांतीचे जे अनिष्ट परिणाम जे मानवी जीवनावर होत होते त्यावरच त्याने चिंतन करून तोडगा काढला. पण हा तोडगा म्हणजे अखिल मानव जातीच्या उद्धाराचा तोडगा आहे असा जो अभिनिवेश त्यात निर्माण झाला आणि हा अभिनिवेश फॅसिस्ट प्रवृत्तीत परिणत: होऊ शकेल हा त्यानं आणि मार्क्स वौद्यांनी कधीच विचार केला नाही, समाजात वैचारिकतेचे विविध स्टार असतात म्हणून त्यापैकी कोणत्याही एका स्तराच वर्चस्व वाढण  म्हणजे त्या स्तराच्या हुकूमशाहीला वाव देणंच ठरतं. याउलट माणसामाणसांत जी पारंपरिक प्रेमभावाची जी प्रेरणा असते ती मार्क्स नि मुळीच लक्षात घेतली नाही. याच प्रेरणेने संबंध जग एका नातेसंबंधात बंधणे शक्य होईल या तत्वज्ञानाचा प्रत्येक्षात वापर जगात प्रथम महात्मा गांधी यांनीच केला. त्याचा राम हे त्याचेच प्रतीक आहे.

मार्क्सवाद्यांचे व्यासंगी धर्मानंद कोसंबी यांनी चोरांपासून सुरक्षित ठेवणारे (थीफ प्रूफ हाऊस ) ही संज्ञा शोषकांसाठी वापरली. हे शोषक सरस्वती-सिंधू संस्कृतीमधील असल्याचा निष्कर्ष ते काढतात. पण सरस्वती-सिंधू संस्कृती ही वेदांचे अपत्य असल्याचे ते विसरतात. तत्कालीन राजे आपल्या गढीत अथवा गडावर राहत ते आपली संपत्ती सुरक्षित राहावी म्हणून नव्हे तर आपल्या शत्रूपासून आपलं संरक्षण व्हावं म्हणूनच होय. जी भारतात रामराज्याची कल्पना आढळते ती एक आदर्श राज्य पद्धती या स्वरूपाची होती आणि तोच कित्ता त्यानंतरचे राजे गिरवितात असं आढळतं.

मार्क्सवादाने अनेक परिस्थितीच्या संदर्भात जे निष्कर्ष प्रतिपादन केले आहेत ते त्याच्या सोयीसाठी वाळवून घेतल्या सारखेच आहेत. म्हणूनच चोरांपासून भयमुक्त असलेले गड आणि सिंधू-सरस्वती संस्कृती मधील धार्मिक व सांस्कृतिक प्रतीक असलेले सामूहिक स्नानगृह या बाबी मार्क्सला सर्वसामान्यांसाठी असलेली अफूची गोळी अशी वाटते. हे सामूहिक स्नानगृहे हे त्याकाळात तीर्थक्षेत्रासारखे असावे. तो तत्कालीन नागररचनेचा भाग असावा. ती कुंडेही असू शकतील. त्यांच्या परिसरात कोठेही देवाच्या मूर्ती अथवा प्रतीके सापडलेली नाहीत.

मार्क्स हा औद्योगिक क्रांतीतून निर्माण होणाऱ्या अनिष्ठतेचा भाष्यकार होता त्याला इतिहासकार मनात येणार नाही.

मार्क्सपेक्षाही आर्य चाणक्य यांचं राजनीतिशास्त्र हे अधिक सवाई ठरत. कारण त्यात सखोल चिंतन आढळत म्हणूनच व्यवस्थापनाला स्पर्श करणारे आनेक निष्कर्ष आढळतात. मार्क्सवादाचे जे इतिहास तज्ज्ञ होऊन गेले त्यात डॉ. बुद्धप्रकाश यांच्या चिंतनामकतेला दाद द्यावा अशी त्यांची प्रतिपादने असली तरी देखील यांच्या ठायीही भ्रामकता आढळते.

कारण सिंधू संस्कृतीतील नांगरांचा विनाश ग्रामीण जनतेच्या अशांततेतून झाला असावा हा निष्कर्ष त्यांच्या बुद्धीला पटणारा नाही. कारण सिंधू संस्कृतीचं विनाश नद्यांच्या पुरामुळे व जलमय यातून झाल्याचे खात्रीलायक पुरावे मोहंजोदडो, हडप्पा, दावरकोट, चन्हुदडो. अमरी, लोहवजोंदडो, नोकजोशाह दिजाई, पन्हीकाही, अलिमुराद, गाझीशाह आदी ठिकाणच्या उत्खननातून मोठ्या प्रमाणावर सापडले आहेत.

पाण्याच्या महापुरापासून स्वतःला वाचविण्यासाठी पाळणारे जे सांगाडे मिळाले आहेत किंवा योगसाधना करणाऱ्यांचे पद्मसनात बसून जालंदरबंध लावण्यासारख्या स्थितीत सापडलेलं सांगाडे हे कसले द्योतक आहे?

डॉ. कोसंबी एक विसरतात की, त्याच्या मार्क्सवादाला प्रवास हा मार्क्स-एंजल्स, लेनीन व स्टॅलिन यांच्या खांद्यावर बसूनच झालेला आहे पण ही परंपरा कालौघत अल्पयुषीच ठरली.

भारतामधील गुलामगिरीची पद्धत, चातुर्वर्ण्य आणि राजनिती या संबंधाची मार्क्सची तत्वे पूर्णतः इतिहासाचा विपर्यास करणारी आहेत.

– राम प्रधान 

Tags
Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close