मालिका बघून मुलानं स्वतःच्याच अपहरणाचा बनाव केला

0
18
school boy kidnapping case : मालिका बघून मुलानं स्वतःच्याच अपहरणाचा बनाव केला - school boy plans own kidnapping and demands 20 lakhs ransom from his father after watching tv serial


नोएडा: एका शाळकरी मुलानं मालिका बघून स्वतःच्या अपहरणाचा बनाव रचून पालकांकडून २० लाख रुपये खंडणीची मागणी केल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. पोलिसांनी काही तासांतच त्या घटनेचा छडा लावला. विद्यार्थ्याला त्याच्या मित्रांच्या घरून ताब्यात घेतलं. मित्रांना सोबत घेऊन या विद्यार्थ्यानं अपहरणाचा बनाव रचल्याची माहिती मिळाली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एका पोलीस अधिकाऱ्याचा वाहन चालक हा एका गावातील वसाहतीत राहत आहे. त्यांचा एकुलता एक मुलगा नववी इयत्तेत शिकतो. तो आणि त्याचे इतर चार मित्र सहामाही परीक्षेत नापास झाले. त्यामुळं पालक रागावतील अशी भीती त्यांच्या मनात होती. त्यानंतर चालकाच्या मुलानं टीव्हीवर मालिका बघितल्यानंतर स्वतःच्या अपहरणाचा बनाव रचला.

बिबट्याला ठार मारून त्याच्या मांसाचं गावजेवण

यूपीः अपघातानंतर बसला आग; २० प्रवासी ठार

या विद्यार्थ्यानं आपल्या मोबाइलवरून पालकांना फोन केला आणि रडू लागला. हे लोक मला मारून टाकतील असं त्यानं सांगितलं. त्यानंतर मुलगा जिवंत हवा असेल तर २० लाख रुपये द्या, अशी मागणी त्याच्या मित्रांनी फोनवरून केली. त्यानंतर त्याच्या वडिलांनी याबाबतही माहिती मालक असलेल्या पोलीस अधिकाऱ्याला दिली. त्याचवेळी मुलानं आपल्या घरी काय परिस्थिती आहे हे जाणून घेण्यासाठी मित्राला घरी पाठवलं. पोलीस घरी आल्यानंतर तो मित्र घाबरला आणि त्यानं तक्रार करू नका अशी विनवणी केली. घाबरलेल्या मुलाला पाहून पोलिसांनी त्याची चौकशी केली. त्यावेळी त्यानं खरं कारण सांगितलं. त्यानंतर पोलिसांनी त्याला त्याच्या एका मित्राच्या घरातून ताब्यात घेतलं.

सेक्स रॅकेट: बॉलिवूडमधील २ अभिनेत्रींना अटक

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here