Connect with us

तंत्रज्ञान

Samsung Galaxy Z Flip 5 Launched: सॅमसंगचे Fold आणि Flip स्मार्टफोन लॉन्च; भारतात कधी येणार? येथे पाहा

Published

on

Samsung Galaxy Z Flip 5 : सॅमसंग गॅलेक्सी Z फ्लिप 5 स्मार्टफोन आज लाँच करण्यात आला आहे. आज झालेल्या Galaxy Unpacked इव्हेंटमध्ये Galaxy Z Fold 5सोबत लाँच करण्यात आला आहे. या वर्षातील सॅमसंगचा हा दुसरा इव्हेंट आहे, आज लाँच झालेला फोन हा गॅलेक्सी Z फ्लिप4 चा अपग्रेटेड व्हर्जन आहे. या नवीन लाँच झालेल्या फोनमध्ये आधीच्या तुलनेते मोठी स्क्रीन देण्यात आली आहे. आयसी ब्लू, फँटम ब्लॅक, क्रीम, ग्रे आणि ब्लू या रंगात हा फोन उपलब्ध होणार आहे.

फोनमध्ये आहेत हे खास फिचर

डिस्प्ले

Galaxy Z Flip 5सोबत कस्टम स्नॅपड्रॅगन 8 Gen 2 प्रोसेसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर फोनला IPX8 रेटिंग मिळाली आहे. Galaxy Z Flip 5मध्ये अँड्रोइड 13सोबतच OneUI 5.1.1 आहे. सोबतच यात आर्मर एल्यूमिनीयम फ्रेम आहे. फोनमध्ये 6.7 इंचाची फुल एचडी प्लस डायनेमिक एमोलेड 2X इनफिनिटी फ्लेस डिस्प्ले देण्यात आला आहे. याचा रिफ्रेश रेट 120 Hz इतका आहे. तर, फोनचा दुसरा डिस्प्ले 3.4 इंचाचा सुपर एमोलेड असून 60HZ इतका आहे. डिस्प्लेला गोरिला ग्लासचे विक्टस प्रोटेक्शन देण्यात आला आहे. यात स्नॅपड्रॅगन 8 Gen 2 प्रोसेसरसोबत 8 जीबी रॅम आणि 512 जीबीपर्यंत स्टोरेज देण्यात आली आहे.

कॅमेरा

Galaxy Z Flip 5मध्ये जबरदस्त कॅमेरा देण्यात आला आहे. यात डुअल रियर कॅमेराचा सेटअप देण्यात आला आहे. यातील प्रायमरी लेंस 12 मेगापिक्सलमध्ये अल्ट्रा अँगल आहे. ज्याचा अपर्चर f/2.2 आहे. तर दुसरी लेन्स 12 मेगापिक्सलचा वाइड अँगल आहे. कॅमेऱ्यासोबतच ऑप्टिकल इमेज स्टेबलाइयेशन (OIS) मिळणार आहे. तर, फ्रंट कॅमेरा 10 मेगापिक्सल देण्यात आला आहे.

बॅटरी लाइफ

Galaxy Z Flip 5 मध्ये 5G, 4G LTE, Wi-Fi 6E, ब्लूटूथ 5.3, GPS/ A-GPS, NFC आणि USB Type-C पोर्ट मिळते. या फोनमध्ये साइट माउंटेड फिंगरप्रिट सेंसरदेखील आहेत. Samsung Galaxy Z Flip 5मध्ये 3700mAhची दमदार बॅटरी देण्यात आली आहे. त्याचबरोबर 25Wची फास्ट चार्जिंग देण्यात आली आहे. यात वायरलेस चार्गिंगबोरबर 2.0 पॉवरशेअरदेखील आहे. तर, फोनचे वजन 187 ग्रॅम इतके आहे.

किंमत

Galaxy Z Flip 5 11 ऑगस्टपासून काही बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. मात्र भारतात त्याची किंमत किती असेल याबाबत कोणतीच माहिती अद्याप समोर आलेली नाहीये. लवकरच कंपनीकडून याबाबत घोषणा करण्यात येईल. दरम्यान Samsung Galaxy Z Flip 4 ची भारतातील सुरुवातीची किंमत 89,999 रुपये इतकी होती.

Continue Reading
Advertisement
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *