JNU : पोलीस-जेएनयूकडून अभाविपला वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न, विद्यार्थ्यांचा आरोप

0
28
JNU : पोलीस-जेएनयूकडून अभाविपला वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न, विद्यार्थ्यांचा आरोप - discussion with jnu students on jnu violence


नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) हिंसाचाराबाबत दिल्ली पोलिसांनी जी माहिती दिली, त्यावर विद्यार्थ्यांनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. दिल्ली पोलीस आणि जेएनयू प्रशासन यांच्याकडून मिळून सत्य बाहेर येऊ दिलं जात नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’शी बोलताना केला. विद्यार्थी नोंदणी चुकीच्या पद्धतीने केली जात असल्याचं सांगत या विद्यार्थ्यांनी कुलगुरुंवरही आरोप केले.

५ जानेवारीला जेएनयूमधील साबरमती वसतीगृहात घुसून अज्ञातांनी डाव्या संघटनांच्या विद्यार्थ्यांवर हल्ला केला. या प्रकरणी सध्या तपास सुरू आहे. पोलिसांनी पहिल्यांदाच या प्रकरणी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. पोलिसांनी सांगितल्यानुसार, विद्यापीठात दरवर्षीप्रमाणे नोंदणी सुरू आहे. पण डाव्या संघटनांकडून विद्यार्थ्यांना नोंदणीपासून रोखलं जात होतं, याच संघटनेच्या विद्यार्थ्यांनी सर्व्हर रुमचीही तोडफोड केली. याचाच आधार घेत जेएनयू विद्यार्थी संघटना अध्यक्ष आईशी घोषसह आठ जणांवर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या या दाव्यानंतर विद्यार्थ्यांचं काय म्हणणं आहे, ते ‘मटा’ने थेट जेएनयू कॅम्पसमध्ये जाऊन जाणून घेतलं.

महाराष्ट्रातील दोन विद्यार्थी, ‘मिलिंद आणि सुरेश यांच्या मते विद्यापीठ प्रशासनाकडून सत्य बाहेर येऊ न देण्याचा पूर्ण प्रयत्न केला जातोय.’ मूळचा उस्मानाबाद जिल्ह्यातून पीएचडीसाठी आलेला मिलिंद सांगतो, ‘मी स्वतः कोणत्याही राजकीय संघटनेशी संबंधित नाही. आम्ही सर्व जण इथे शिकण्यासाठी आलो आहोत. पण एवढं शिक्षण घेऊनही आपण समोर काही होत असेल तर डोळे झाकून बसण्याला काही अर्थ नाही. विद्यापीठात जे होतंय, त्यामुळे विद्यार्थी असुरक्षित आहेत. पोलीस ४ तारखेलाच सर्व्हर रुम तोडल्याचा दावा करतात. मग ४ तारखेलाच विद्यापीठाने गुन्हा का दाखल केला नाही? फक्त अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) वगळता इतर सर्व संघटनांचं नाव येतं हे कसं शक्य आहे?’


सुरेश हा पीएचडीसाठी नांदेड जिल्ह्यातून आला आहे. त्यानेही कुलगुरुंच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. ‘विद्यार्थ्यांना शिकण्याची इच्छा आहे. पण त्यांना पास न होताच पुढच्या वर्गात प्रवेश दिला जातोय. विद्यार्थ्यांचं म्हणणं न ऐकताच नोंदणी सुरू आहे. विद्यापीठात किरकोळ वाद होत असले तरी असं बाहेर येऊन कुणी हल्ला करणं कधीही झालं नव्हतं. विद्यार्थ्यांकडे उपलब्ध असलेल्या व्हिडीओमध्ये हल्लेखोर स्पष्टपणे दिसत आहेत. पण त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही. पोलिसांनी यात निष्पक्ष भूमिका घेणं गरजेचं आहे. पण पोलीस देखील त्यांना मिळत असलेल्या आदेशानुसार कारवाई करत आहेत,’ असा आरोप सुरेशने केला.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here