Connect with us

देश

Jaipur Train Crime : गोळीबारात RPFचे सहाय्यक पोलीस निरीक्षक टीकाराम मीणा आणि तीन प्रवाशांचाही मृत्यू

Published

on

बईजवळच्या पालघर जिल्ह्याच्या हद्दीत ट्रेनमध्ये गोळीबार झाल्याची घटना घडलीय. जयपूरहुन मुंबईकडे येणाऱ्या जयपूर सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानाने हा गोळीबार केलाय. या गोळीबारात आरपीएफचे सहाय्यक पोलीस निरीक्षक टीकाराम मीणा यांच्यासह तीन प्रवाशांचाही मृत्यू झालाय.

पहाटे पाच वाजून २३ मिनिटांनी वापी आणि मीरारोड स्टेशनच्या दरम्यान ही घटना घडलीय. आरोपी चेतन सिंह सध्या जीआरपीच्या ताब्यात असून त्याच्या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर आलीय.

महत्त्वाची बाब म्हणजे आरोपी चेतन सिंहनं आदल्या दिवशी काही भडकावणारे व्हिडिओ आणि फोटो पाहिले होते, त्यातून त्याचं त्यामुळे त्यानं हे धक्कादायक कृत्य केल्याचं म्हटलं जातंय.

दरम्यान, चार खून केल्यावर ट्रेनमधील अन्य प्रवाशांसमोर तो आपल्या या कृत्याचं समर्थन करत होता असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. चेतन सिंह हा रागीट स्वभावाचा असल्याचीही माहिती समोर आलीय.

Continue Reading
Advertisement
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *