जगब्लॉग

भारतीय क्रिकेट संघ आणि नंबर ४ चा संघर्ष

भारतीय क्रिकेट संघाच्या चौथ्या क्रमांकाच्या समस्या

क्रिकेट हा एक सांघिक खेळ आहे आणि त्यात खेळणारे अकरा खेळाडूंचे महत्व जवळ जवळ सारखेच असते. ज्याप्रकारे गाडीच एक चाक फिरायचं बंद झालं तर जशी गाडी बंद होते त्याप्रमाणेच या चेंडू-फळीच्या (क्रिकेट) खेळात. प्रत्येक सदस्य हा तेवढाच महत्वाचा असतो. सध्या तसाच काहीतरी भारताच्या क्रिकेट संघा बरोबर घडतंय. सध्या भारतीय क्रिकेट संघ हा जगातील सगळ्यात बलाढ्य देशांपैकी एक आहे आणि क्रिकेटच्या तीनही प्रकारात उत्तम प्रदर्शन करीत आहे. कसोटी संघांच्या क्रमवारीत भारतीय संघ जवळपास दोन वर्षे नंबर १ च्या जागी बसला आहे. भारताचे प्रदर्शन मर्यादित (ODI /T20) षटकांच्या सामन्यात काही वाईट नाही. भारतीय संघ नेहमीच क्रमवारीत (Ranking) अव्वल स्थानांमध्ये असतो. पण मागील काही वर्षात भारतीय संघाला एक समस्या जास्त भेडसावत आहे ती म्हणजे मर्यादित शतकांच्या सामन्यात नंबर चार चा फलंदाज. 

भारतीय क्रिकेट संघाकडे  रोहित शर्मा, शिखर धवन, आणि विराट कोहली सारखे तीन दिग्गज फलंदाज आहेत आणि बऱ्याच वेळा संघाच्या विजयांमध्ये या तिघांचा मोलाचा वाटा असतो. पण जर ही तिकडी अपयशी ठरली तर भारताच्या फलंदाजी देखील पत्त्यांच्या घरी सारखी कोसळते आणि अशामुळे मागील काही वर्षात भारतीय क्रिकेट संघ काही महत्वाचे सामने गमावले आहेत.

२०११ च्या विश्वचषकात विराट कोहली सारखा फलंदाज भारताकडे होता. पण आज विराट नंबर तीन वर खेळात असल्यानी भारताला त्याचा एवढा नाही पण साजेशी खेळी करणारा फलंदाज हवा आहे. २०१५ च्या विश्वचषकात ती भूमिका मराठमोळ्या अजिंक्य राहणे ने निभावली होती. पण त्यात त्याला म्हणावं तास यश नाही मिळालं. भारताला विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात यजमान ऑस्ट्रेलिया कडून पराभवच सामना करावा लागला होता आणि त्याच बरोबर विश्वचषक आपल्याकडे राखून ठेवण्याचं भारताचं स्वप्न तुटलं. दोन वर्षानंतर हीच समस्या भारतीय संघाला पुन्हा एकदा उदभवली ती म्हणजे प्रतिस्पर्धी पाकिस्तान बरोबर झालेल्या चॅम्पिअन्स  ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात. तेथेही भारतीय संघाने सलग दोन वेळा चॅम्पिअन्स ट्रॉफी जिंकण्याची संधी गमावली आणि नंबर चारची समस्या पुन्हा एकदा भारतीय संघाला भेडसावू लागली. दरम्यानच्या काळात बरेच फलंदाजणांनी फलंदाजी केली पण म्हणावं तास यश कोणालाच लाभलं नाही.

त्यानंतर काही वेळाने अंबाती रायडू ने या क्रमांकावर फलंदाजी करताना चांगली कामगिरी केली. जसा जसा २०१९ चा विश्वचषक जवळ येत होता तस तस वाटू लागलं होत की आता भारतीय संघाचं नंबर चारचा प्रश्न आत सुटला. दरम्यान विश्वचषकाच्या आधी भारताने आपली शेवटची ५० षटकांची मालिका खेळली ती ऑस्ट्रेलिया सोबत. भारताने सुरुवातीचे दोन्ही सामने जंकून ती मालिका २-३ ने गमावली. भारतामध्ये झालेली ती मालिका विश्वचषकाच्या  दृष्टीने खूप महत्वाची मनाली जात होती आणि जो प्रश्न सुटल्या सारखा वाटत होता तो पुन्हा एकदा भारतीय क्रिकेट संभासमोर उभा ठाकला. त्या मालिकेत भारताचा नंबर चार चा फलंदाज आंबती रायडू पूर्णपणे नाकाम ठरला. तसे तर तो तीन सामानेच खेळाला होता. रायडूच्या सुमार कामगिरीमुळे रिषभ पंत ला संघात स्थान मिळाले. तो ही अपयशीच ठरला. पुन्हा एकदा भारतीय क्रिकेट संघ आणि नंबर चारची चर्चा सुरु झाली. एकीकडे भारताला विश्वचषकाचा प्रबळ दावेदार मनाला जात होता तर एकीकडे नंबर चारवरून भारताच्या दावेदारीवर प्रश्नचिन्ह उभे राहत होते. क्रिकेट पंडितांच्या मते भारताकडे पुरेसं बेंच स्ट्रेंग्थ आहे आणि त्याचा परिणाम भारतीय फलंदाजीवर होणार नाही आणि गरज पडली तर महेंद्रसिंग धोनी सारखा खेळाडू संघात आहे. ज्याची कामगिरी नंबर ४ वर अप्रतिम आहे, कोण विसरले तो सिक्स! त्याच क्रमांकावर फलंदाजी करताना माजी कर्णधार धोनीने भारताला २८ वर्षानंतर विश्वचषक जिंकावला होता.

IPL 2019 झाल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाची विश्वचषकासाठी घोषणा करण्यात आली. त्यामध्ये  निवड समितीने अंबाती रायडू ला संघातून वगळून नवख्या विजय शंकरची भारतीय संघात निवड केली. हा निर्णय अतिशय  आश्चर्यचकित  करणारा होता. ज्या फलंदाजाने ऑस्ट्रेलियाच्या  मालिके आधी चांगली फलंदाजी केली होती आणि फक्त तीन सामन्याच्या खराब कामगिरीमुळे त्याला संघातून वगळण्यात आलं.

भारताची विश्वचषकात सुरुवात उत्तम झाली. कोहली आणि कंपनीने सलामी फलंदाज असलेल्या के. एल. राहुलची नंबर चार साठी नियुक्ती केली. मिळालेल्या एका संधीत राहुल ने ऑस्ट्रेलिया सोबत छोटीशी पण महत्वाची खेळी केली आणि असं वाटू लागलं की, भारताचं नंबर चारच संकट तळाला. पण त्याच सामन्यात झालेल्या दुखापतीमुळे शिखर धवनला विश्वचषकातून माघार घ्यावी लागली आणि तोच प्रश्न पुन्हा एकदा भारतीय संघ पुढे उभा राहिला. तत्काळ अष्टपैलू खेळाडू विजय शंकरला संघात स्थान देण्यात आलं. पण तो देखील अपयशी ठरला.

विश्वचषकासाठी भारतीय संघात रिषभ पंतची  निवड झाली नाही म्हणून बरेच क्रिकेट प्रेमी नाराज होते, आणि जेव्हा धवनच्या दुखापती मुले पंतला संधी मिळाली आणि पुन्हा एकदा असा वाटलं की आता तर हा नंबर चारचा प्रश्न सुटेल, कारण पंतने IPL मध्ये दिल्ली कॅपिटल संघाकडून नंबर चारवर उत्तम फलंदाजीची केली होती. पण त्याची पुनरावृत्ती करण्यात पंतला अपयश आले आणि पुन्हा एकदा भारत क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंग्लंडच्या लॉर्ड्स मैदनात विश्वचषक उचलायला मुकला. गुणतालिकेत अव्वल स्थानी असून पण भारत थोड्या कमकुवत समजल्या जाणाऱ्या न्यूझीलंड संघा सोबत उपांत्य सामन्यात हरला.  ह्या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी अतिशय सुंदर गोलंदाजी करीत न्यूझीलंडच्या संघाला २४० च्या खाली रोखले. असू वाटू लागलं होत आता लॉर्ड्स दूर नाही आणि भारत हा सामना आरामात जिंकून जाईल, तशी फलंदाजीही भारताकडे होती, जे घडलं नव्हतं तेच घडलं आणि भारताची सलामीचे तीन फलंदाचा ५ धावांवर तंबूत परतले आणि पुन्हा एकदा नंबर चारच्या अनुभवाच्या अभावी भारताने सामना गमावला. खरतर त्या पराभवाला एकटा नंबर चार चा फलंदाज करणीभूत नव्हता तर संपूर्ण भारतीय फलंदाजी न्यूझीलंड समोर ढेपाळली होती.

खरंच ही नंबर चारची  समस्या एवढी मोठी आहे का जी आज ६ ते ७  वर्षे झाली तरीही आपण एक चांगला फलंदाज नाही बनवू शकलो? तसे नाही दरम्यानच्या काळात राहणे, रायडू सारखे चांगले फलंदाज खेळून गेलं, पण पुरेशी संधी न मिळाल्याने ते दोघेही संघाचे अविभाज्य घटक नाही बनूशकले. आज गेली १६ वर्षे मी क्रिकेट फार जवळून बघत आलोय आणि एक गोष्ट नक्कीच मला समजलीय ती म्हणजे फलंदाजीमध्ये तुमच्या संघातले सर्वोत्तम आणि अनुभवी फलंदाज सर्वात आधी फलंदाजी करतात. मग प्रश्न हाच राहतो की नंबर चारवर उत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या धोनीला का खेळवलं जात नाही. याच स्पष्टीकरण कर्णधाराने आणि व्यवस्थापक मंडळाने बऱ्याचदा दिले. पण त्याने नंबर चारची समस्या दूर झाली का, तर नाही.

कधी कधी मला तर निवड समितीवरच प्रश्न पडतो, ज्यांना आंतरराष्ट्रीय खेळाचा अनुभव नाही तेच लोक अशा महत्वाच्या आंतराष्ट्रीय स्पर्धांमध्ये निवड समितीच प्रतिनिधित्व करतात आणि ज्या माजी खेळाडूंचा आंतराष्ट्रीय अनुभव दांडगा असतो अशांना या सर्वापासून दूर लोटले जाते. ह्या गोष्टी कुठे तरी थांबणं गरजेचं आहे.

सध्या भारतीय संघ वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर आहे आणि तेथे सुद्धा तडाखेबाज फलंदाज रिषभ पंत हा चार नंबर वर फलंदाजीसाठी येत आहे आणि तो खूप चांगला फलंदाज देखील आहे त्याच्या दिवशी तो एकट्याने पूर्ण सामना जिंकून देऊ शकतो. पण त्याच्या या शैलीचा फायदा दार वेळी होईल असे नाही. त्याच ताज उदाहरण म्हणजे विश्वचषकाचा उपांत्य सामना. ज्यावेळी भारतीय संघाला संयमी खेळीची गरज असताना मोठा फटका खेळण्याच्या नादात पंत बाद झाला आणि त्याचा मोठा परिणाम सामान्यांच्या निर्णयावर झाला. नंबर चारसाठी असा फलंदाज हवा जो संयमी देखील असेल आणि गरज पडल्यास आक्रमक खेळी ही करू शकेल. असेच काही युवा फलंदाज सध्या भारतीय ‘अ’ संघातून खेळात होते. ते म्हणजे श्रेयस अय्यर, मनीष पांडे आणि शुभमन गिल हे तीनही फलंदाज संयम आणि आक्रमक खेळीचे उत्तम उदाहरण आहेत आणि त्यांनी ते IPL मध्ये सिद्ध केले आहे.

मी अशी आशाकरतो की येणाऱ्या काळात यांच्यापैकी एक जण आपली गुणवत्ता या जागेसाठी सिद्ध करेल आणि एवढ्या वर्षांचा नंबर चर्चा भारतीय संघाचा संघर्ष थोड्याफार प्रमाणात संपेल. तर तुमचं याबाबत काय मत आहे, तुम्हाला कोण योग्य वाटतो नंबर चारसाठी मला नक्की कळवा या आर्टिकल वर COMMENT करून.

Tags
Show More

Related Articles

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close