Hyundai EXTER चा धुमाकूळ, Tata Punch ला तगडं आव्हान; महिन्याभरात 50 हजारांहून अधिक गाड्यांचं बुकिंग

[ad_1]

Hyundai ने नुकतीच भारतीय बाजारपेठेत सर्वात स्वस्त एसयुव्ही Hyundai Exter ला लाँच केलं होतं. दरम्यान आपली किंमत, फिचर्स यामुळे लाँच झाल्यानंतर काही वेळातच ही कार लोकांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाली आहे. ही कार लाँच झाल्यानंतर आतापर्यंत 50 हजारांहून अधिक युनिट्सची बुकिंग झाल्याची माहिती कंपनीने दिली आहे. हुंडईने फक्त 6 लाखांच्या सुरुवातीच्या किंमतीसह 10 जुलैला Exter ला लाँच केलं होतं. या एसयुव्हीला पेट्रोल इंजिनसह, सीएनजी व्हेरियंटमध्ये सादर करण्यात आलं आहे.

“हुंडई एक्स्टरला मिळालेल्या जबरदस्त प्रतिसादामुळे आम्ही आनंदी आहोत. या एसयुव्हीने इंडस्ट्रीत नवा दर्जा तयार केला आहे. ग्राहकांनी या एसयुव्हीत दिल्या जाणाऱ्या सेफ्टी फिचर्सला प्राथमिकता दिली आहे. ही एसयुव्ही लाँच झाल्यानंतर 30 दिवसांच्या आत 50 हजारांपेक्षा अधिक युनिट्सची बुकिंग झाली आहे,” अशी माहिती हुंडई मोटर इंडिया लिमिटेडचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर तरुण गर्ग यांनी दिली आहे.

Hyundai EXTER ला एकूण 5 व्हेरियंटमध्ये सादर करण्यात आलं आहे. यामध्ये बेसिक मॉडेल EX पासून ते ‘S’, ‘SX’, ‘SX (O)’ आणि SX (O) Connect यांचा समावेश आहे. या कारची किंमत 6 लाखांपासून ते 10 लाखांपर्यंत आहे. याच्या बेस व्हेरियंटमध्ये फक्त मॅन्यूअल ट्रान्समिशन गेअरबॉक्स देण्यात आला आहे. तसंच त्यात CNG चा पर्याय नाही. याशिवाय इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल, हिल स्टार्ट असिस्ट आणि व्हेईकल स्टॅबिलिटी मॅनेजमेंटसारखे फिचर्स फक्त SX (O) व्हेरियंटमध्ये दिले जात आहेत.

75 टक्के लोकांकडून सनरुफ व्हेरियंटला पसंती

Hyundai EXTER च्या सनरुफ व्हेरियंटला सर्वाधिक पसंती दिली जात असल्याचं कंपनीने सांगितलं आहे. एकूण बुकिंगमधील 75 टक्के ग्राहकांनी सनरुफ व्हेरियंटची निवड केली आहे. Exter SX पासून सनरुफ फिचर दिलं जात आहे. जिची किंमत 8 ते 8.97 लाखापर्यंत आहे. हे व्हेरियंट 1.2 पेट्रोल इंजिनसह CNG मध्येही उपलब्ध आहे. ज्याला 5 स्पीड मॅन्यूअल आणि ऑटोमॅटिक गेअरबॉक्सशी जोडण्यात आलं आहे.

Exter SX व्हेरियंटमध्ये काय फिचर्स आहेत?

सनरूफ (वॉयस इनेबल्ड)
15 इंचाचा डुअल-टोन अलॉय व्हील
प्रोजेक्टर हेडलँप
रियर पार्किंग कॅमेरा
ISOFIX माउंट (मुलांसाठी सीट)
क्रूज कंट्रोल (फक्त पेट्रोलमध्ये)
रियर डिफॉगर
शॉर्क-फिन एंटिना
पॅडल शिफ्टर (फक्त ऑटोमेटिकमध्ये)

बेस व्हेरियंटमध्ये कोणते फिचर्स?

Exter च्या बेस व्हेरियंटमध्ये EBD सह ABS, कीलेस एंट्री, सर्व आसनांवर 3-पॉइंट सीट बेल्ट, फ्रंट पावर विंडो, रियर हेडरेस्ट, सीट बेल्ट रिमाइंडर्स, LED टेल-लँप, सेंट्रल लॉकिंग सिस्टम, डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर, मॅन्यूअल AC और रियर पार्किंग सेंसर सारखे फिचर्स मिळतात.

यामधये 6 एयरबॅग, 3-पॉइंट सीट बेल्ट आणि सीटबेल्ट रिमाइंडर (सर्व आसनांसाठी), कीलेस एंट्री, इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रीब्यूशन (EBD) सह एंटी लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS), रियर पार्किंग सेंसर, ESS, बर्गलर अलार्म आणि अन्य फिचर्स देण्यात आले आहेत. हे स्टँडर्ड फिचर्स असल्याने सर्व व्हेरियंट्समध्ये मिळतात.

[ad_2]

Related Posts

अनाकोंडा नदीचा हेलिकॉप्टर व्ह्यू! हे दृश्य तुमच्या स्वप्नांमध्येही धडकी भरेल – हे खरं की AI जनरेटेड?

सोशल मीडियावर सध्या एक भयावह व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये एका नदीचा वरून घेतलेला व्ह्यू पाहून लोक घाबरून जात आहेत. एक नदी, जी वरून पाहताना एखाद्या विशालकाय अनाकोंडासारखी दिसते… आणि…

Continue reading
तुमचीही गाडी देतेय कमी मायलेज? ‘या’ 5 चुका ठरतात कारणीभूत

[ad_1] Fuel Consumption in Vehicle: जर तुम्ही कारने प्रवास करत असाल आणि तुमची कार सर्वात कमी मायलेज देत असेल, तर यामागे काही सामान्य कारण असू शकते. परंतु तुम्ही देखील या…

Continue reading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Missed

🔥 “एक गोणी खताची किंमत ₹1350 असताना शेतकऱ्यांकडून ₹1600 पर्यंत वसुली!”

  • By Editor
  • June 20, 2025
  • 45 views
🔥 “एक गोणी खताची किंमत ₹1350 असताना शेतकऱ्यांकडून ₹1600 पर्यंत वसुली!”

🌧️ पावसाळ्यातील त्वचेची काळजी: नैसर्गिक उपाय आणि टिप्स

  • By Editor
  • June 18, 2025
  • 18 views
🌧️ पावसाळ्यातील त्वचेची काळजी: नैसर्गिक उपाय आणि टिप्स

🛑 पुण्यात पूल कोसळला, अनेक जण वाहून गेले

  • By Editor
  • June 15, 2025
  • 16 views
🛑 पुण्यात पूल कोसळला, अनेक जण वाहून गेले

Ahmedabad Plane Crash News: अहमदाबाद विमान अपघातात एका संपूर्ण कुटुंबाचा दुर्दैवी अंत

  • By Editor
  • June 13, 2025
  • 29 views
Ahmedabad Plane Crash News: अहमदाबाद विमान अपघातात एका संपूर्ण कुटुंबाचा दुर्दैवी अंत

एअर इंडियाचे लंडनकडे जाणारे विमान अहमदाबादमध्ये कोसळले; २४२ जण होते प्रवासात

  • By Editor
  • June 12, 2025
  • 24 views
एअर इंडियाचे लंडनकडे जाणारे विमान अहमदाबादमध्ये कोसळले; २४२ जण होते प्रवासात

IPLचा ‘Lucky Charm कोण आहे माहितीय का?

  • By Editor
  • June 12, 2025
  • 25 views
IPLचा ‘Lucky Charm कोण आहे माहितीय का?