Connect with us

ब्लॉग

YouTube पासून कमाई कशी होते?

Published

on

how to earn from youtube

यूट्यूब (YouTube) हे नाव आपणा सर्वांना चांगलेच प्रचलित आहे. आपण दररोज यूट्यूब (YouTube) च्या माध्यमातून नवनवीन विडिओज पाहत असतो.

अगदी काहीही सर्च करायच म्हटल की सर्वप्रथम आपण यूट्यूब (YouTube) वरच जातो. नवीन गाणी, मोबईलेचे विडियो, एखाद्या जागेची माहिती, एखाद्या नवीन रेसीपी शिकण्यासाठी किंवा कम्प्युटर बिघडला या साऱ्या छोट्या मोठ्या गोष्टींसाठी आपला ओघ हा नेहमीच यूट्यूब (YouTube) कडे असतो.

हे वाचा: सलग तीन वेळा भारताला लूटणारा वास्को-द-गामा!

भारतामध्ये मागील पाच वर्षामध्ये यूट्यूब (YouTube)च्या वापरात प्रचंड वाढ झालीय आणि ही वाढ नुसत्या यूट्यूब (YouTube) पहाणाऱ्यांमद्धे नाही तर यूट्यूब (YouTube) वर विडियो बनवणाऱ्यांमद्धे सुद्धा मोठ्याप्रमाणात वाढ झाली.

तुम्हाला माहितीय का तुम्ही एखाद्याचा जेव्हा विडियो पाहता तेव्हा त्या विडियो बनवणाऱ्या व्यक्तीला चक्क पैसे मिळतात?

खूप लोकांचे यूट्यूब (YouTube) हे प्रथम इन्कम सोर्स बनले आहे. खूप लोकांनी म्हणजे अगदी १५-१६ वर्षाच्या मुलापासून ते अगदी ५० वर्षाच्या माणसे ही यूट्यूब (YouTube) पासून चांगले इन्कम करतात.

आज या लेखाच्या माध्यमातून आपल्या मराठी बांधवांसाठी या बद्दलच माहिती मी देणार आहे.

आपल्या पैकी बरेच जण हे यूट्यूब (YouTube) वर विडियो बघून आपले मनोरंजन किंवा एखादी माहिती घेतात, जर हेच मनोरंजन अथवा माहिती जर तुम्ही यूट्यूब (YouTube) च्या मध्यमातून लोकांना दिली, तर तुम्ही देखील एक नवीन इन्कम सोर्स तुमच्यासाठी बनवू शकता.

YouTube पासून कमाई कशी होते?

यूट्यूब (YouTube) वर विडियो पाहताना तुम्ही खूप वेळा जाहिरात पहिली असेलच, काही जाहिराती ५ सेकंड नंतर आपण बंद करू शकतो तर काही पूर्ण एक मिनिटे चालतात तर काही विडियो चालू असताना आडव्या बॅनरमध्ये विडिओच्या खाली दिसतात.

ह्या सर्व जाहिराती तुमच्या विडियो वरती दाखवण्याचे यूट्यूब (YouTube) तुम्हाला पैसे देत.

यूट्यूब (YouTube) पासून होणारी कमाई तशी पाहता खूप सरळ आहे, तुम्ही एखाद्या विषयावर विडियो बनवा त्यानानंतर यूट्यूब (YouTube) च्या ज्या पॉलिसीज आहेत त्या पूर्ण करा आणि मग यूट्यूब (YouTube) तुमच्या विडियोज वर जाहिरात दाखवत आणि यूट्यूब (YouTube) त्या साठी तुम्हाला पैसे देत.

पण हे सर्व जेवढ वाटतंय तेवढ सोप नाही मंडळी! या साठी तुम्हाला भरपूर मेहनत घ्यावी लागेल आणि तुमच्यापाशी संयम, जिद्द, चिकाटी लागेल.

कारण जर तुम्ही म्हटलात मी आजच एक यूट्यूब (YouTube) चॅनल चालू करेन आणि उद्या पासून त्यावर कमाई चालू होईल तर तुम्ही चुकीचा विचार करताय.

हे वाचा:१०,००० खोल्यांचे हॉटेल, का होत ७० वर्षे खाली?

यूट्यूब (YouTube) च्या काही पॉलिसीज आहेत त्या पूर्ण करणे अनिवार्य आहे. त्याखेरीज तुम्ही तुमच्या विडियो पासून कमाई करू नाही शकत. त्या पॉलिसीज पूर्ण झाल्याशिवाय यूट्यूब (YouTube) तुमच्या चॅनलवर जाहिरात दाखवणार नाही.

सर्वप्रथ आपण यूट्यूब (YouTube) चॅनल कसं चालू करायचा याची माहिती घेऊ. जर तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही सरल पुढच्या पॉइंट वर जाऊ शकता.

यूट्यूब (YouTube) चॅनल कसा चालू करायचा?

१. यूट्यूब (YouTube) चॅनल चालू करण्यासाठी सर्वप्रथम तुमच्या कडे गूगलच म्हणजेच Gmail अकाऊंट असणे अनिवार्य आहे आणि ते आज कल सर्वांचाच आहे, जर तुमच गूगल अकाऊंट नसेल तर येथे क्लिक करा आणि आजच एक नवीन अकाऊंट तयार करा.

२. आता तुमच गूगल अकाऊंट लॉगिन असलेल्या ब्राऊजर मधून यूट्यूब (YouTube) ओपन करा. ओपन केल्यावर तुम्हाला काही खालील चित्राप्रमाणे दिसेल.

३. आता तुम्हाला तुमच्या गूगलच्या प्रोफाइल पिक्चरवरती क्लिक करायच आहे. जर तुम्ही आधीच चॅनल बनवल असेल तर तुम्हाला चॅनल वरती क्लिक करा नाहीतर क्रिएट न्यू चॅनल वर क्लिक करा.

४. आता तुम्हाला तुमच्या चॅनलला नाव द्याव लागेल, जर तुम्हाला कोणत नाव सुचत नसेल तर तुम्ही स्वतच्या नावाने देखील चॅनल चालू करू शकता आणि भविष्यात ते बदलू शकता.

५. चॅनल बनवून झाले आता सर्वात महत्वाचे म्हणजे त्यावरती तुम्हाला नियमित पणे विडियोज अपलोड करावे लागतील.

यूट्यूब (YouTube) पॉलिसीज

यूट्यूब (YouTube) वरुन पैसे कामावण्यासाठी यूट्यूब (YouTube)च्या काही अटी आहेत त्यांचे तुम्हाला पालन करणे गरजेचे आहे. त्या सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

यूट्यूब (YouTube) पैसे कामावण्यासाठी सर्वात महत्वाचे म्हणजे तुमच्या चॅनल वरती १००० Subscribers आणि ४००० तासांचा Watch Time मागील एका वर्षात असणे अनिवार्य आहे.

अन्यथा तुम्ही तुमच्या चॅनल पासून पैसे कामवू शकणार नाहीत आणि म्हणूनच मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हटल होत की, यूट्यूब (YouTube) चॅनल चालू करण्यासाठी तुम्हाला भरपूर मेहनत घ्यावी लागेल आणि तुमच्यापक्षी संयम, जिद्द, चिकाटी असावी लागेल.

Watch Time म्हणजे काय?

वॉच टाइम हे एकाद्या यूट्यूब (YouTube) चॅनल साठी अत्यंत महत्वाची गोष्ट आहे कारण यातूनच यूट्यूब (YouTube) ला समाजात की, तुमच्या विडियोज ना किती प्रमाणात लोकांची पसंती आहे.

तुम्ही अपलोड केलेला विडियो जेवढे मिनिटे पहिला जातो त्याला वॉच टाइम असे म्हणतात. उदा, तुम्ही अपलोड केलेला विडियो ५ मिनिटांचा आहे आणि तीन लोकांनी तो पहिला, त्यापैकी एक व्यक्तीने तुमचं विडियो २ मिनिटे, तर दुसऱ्याने १ मिनिट आणि टीसाऱ्याने ४ मिनिटे पहिला तर तुमचा वॉच टाइम हा ७ मिनिटे झाला.

अशाप्रकारे तुमचे विडियोज एक वर्षामध्ये ४००० तास पहिले गेले पाहिजे तसेच तुमच्या चॅनल वरती एक वर्षामध्ये १००० Subscribers झाले पाहिजेत, तरच तुम्ही यूट्यूब (YouTube) चॅनल पासून पैसे कामवू शकता.

ऑनलाइन अर्निंग आणि ब्लॉगिंग विषयी जाणून घेण्यासाठी आमच्या हिन्दी चॅनल ला SUBSCRIBE करा.

हे वाचा: दमा, अस्थमा, टी. बी. याआजारावर कडकनाथचे चिकन अतिशय गुणकारी

Continue Reading
Advertisement
1 Comment

1 Comment

  1. Pingback: शाळा सुरू होणार की नाहीत वाचा मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *