Connect with us

आरोग्य

Desi Ghee : देशी तुपाचे सेवन ‘या’ लोकांसाठी धोकादायक, आजारपणाला द्याल आमंत्रण

Published

on

Who Should Not Eat Desi Ghee : भारत हा दूध उत्पादनात अव्वल स्थान आहे. भारतात दूध, दही, लोणी आणि तुपाची नदी वाहते असं म्हणतात. गावातील अनेक घरांमध्ये गायी म्हशी असल्याने घरातच अस्सल तुप तयार करण्याची परंपरा आहे. भारतीय आहारातील तूप हा महत्त्वाचा घटक आहे. देशी तूपाची चपाती, गरमा गरम खिचडीवर तुपाची धार, पुरणपोळी तर तुपाशिवाय अपूर्ण… आरोग्य तज्ज्ञ असो किंवा आयुर्वेद तूप हे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असून स्वयंपाकात तेला ऐवजी तूप वापरण्याचा सल्ला देतात. सुपरफूडचा दर्जा असणारं तूप हे वजन कमी करण्यापासून, केस, त्वचेपर्यंत अनेक गोष्टींसाठी फायदेशीर आहे. (Desi Ghee Side Effects Who Should Not Eat Desi Ghee health news in marathi)

देशी तूप सेवन करणे फायदेशीर की धोकादायक ?

देशी तूप खाण्याचे अनेक फायदे आहेत, हे आपण वारंवार ऐकलं आहे. मात्र कुठलीही गोष्ट ही प्रमाणात घेतली पाहिजे. कारण अतिरिक्त सेवन हे अनेक वेळा आपल्या आरोग्यासाठी धोकादायक असू शकतं. त्यामुळे कुठलाही पदार्थ हा मर्यादित प्रमाणात खाल्ल्यास त्याचा आरोग्यास फायदा होतो. मग अशावेळी देशी तुपाचं सेवन नेमकं कुठल्या लोकांनी करु नयेत, काय सांगतात तज्ज्ञ.

‘या’ लोकांनी देशी तूप खाऊ नये

देशी तुपाचं सेवन काही लोकांसाठी धोकादायक असल्याचं, भारतातील प्रसिद्ध पोषण तज्ज्ञ निखिल वत्स यांनी सांगितलं आहे.

तुम्ही दररोज ऑफिसमध्ये 8 ते 10 तास बसून काम करत आणि शारीरिक हालचाली करत नसाल तर तुमच्यासाठी देसी तुपाचं सेवन धोकादायक आहे.

तुम्हाला मधुमेहाचा त्रास होत असेल तर देशी तूप टाळा कारण ते तुमचं आरोग्य बिघडण्यास कारणीभूत ठरु शकतं.

देशी तूप ‘या’ लोकांसाठी फायदेशीर

जे लोक जास्त वेळ वर्कआउट किंवा शारीरिक हालचाली करतात त्यांच्यासाठी देशी तूप सेवन करणे अतिशय फायदेशीर आहे.

ज्या लोकांची कामानिमित्त खूप धावपळ होते अशा लोकांसाठी देशी तूप खाणे खूप जास्त फायद्याचं आहे.

लहान मुलांसाठीही देशी तूप आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

ज्या लोकांना वजन वाढवायचे आहे त्यांनी तुपाच्या सेवन केल्यास त्यांना नक्की फायदा होईल.

(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. ‘कोकणशक्ती’ याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

Continue Reading
Advertisement
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *