आरोग्यजगतंत्रज्ञानब्लॉगलाईफ स्टाईल

कोरोनाचा कहर..! काय आहे कोरोनाव्हायरस आणि COVID – १९ ?

कोरोनाव्हायरस (Coronavirus) ने संपूर्ण जगभर थैमान घातला आहे आणि हा आजार आता एक जागतिक समस्या बनली असून त्याचा प्रभाव एवढा जास्त आहे की जगातल्या १९५ देशांपैकी १५३ देशांतील लोकांना त्याची लागण झाली आहे (सादर आकडा हा लेख लिहितानाच आहे.)

हा आजार जगभर खूप वेगाने पसरत आहे त्यामुळे येणाऱ्या काही दिवसात हा आकडा बदलण्याची शक्यता आहे.

वर्ल्ड ओ मीटर ( World O Meter) या संकेतस्थळाच्या चालू आकडेवारीप्रमाणे १५ मार्च पर्यंत तब्बल १,६२,५०१ रुग्णांची अधिकृतरित्या कोरोनाव्हायरसची लागण झाल्याची नोंद झालीय.

तसेच ६,०६८ लोकांचा कोविड-१९ या आजाराने मृत्यू झाल्याचे समजते. एकूण रुग्णांपैकी ७५,९६८ रुग्ण या आजारपणातून पूर्णपणे बरे झाले आहेत.

आपल्याला काय माहित असणे आवश्यक आहे.

✅ कोरोनाव्हायरस (Coronavirus) ची सुरवात चीनच्या वुहान शहरात डिसेंबर २०१९ मध्ये सर्वप्रथम झाली.
✅ COVID-१९ हा कोरोनाव्हायरस (Coronavirus) पासून होणार संसर्गजन्य रोग आहे.
✅ डोकेदुखी, ताप, सर्दी, खोकला, शिंका येणे, घास खवखवणे, निमोनिया, अस्वस्थ वाटणे इत्यादी कोरोनाव्हायरसची प्रमुख लक्षणे आहेत.
✅ अद्याप तरी ठोस उपचार/औषध उपलब्ध नाही.

कोरोना विषाणू ( Coronavirus ) म्हणजे काय?

काही लोकांचा गोंधळ होत असेल की कोरोना म्हणायचे की कोविड – १९ ( COVID – 19) म्हणायचे. तर कोरोना हे एका विषाणूचे नाव आहे. कोरोनाव्हायरस (Coronavirus) ही एक मोठी विषाणूंची प्रजाती आहे आणि त्यापासून सर्दी, ताप, श्वसनक्रिये मध्ये त्रास असे आजार होतात.

कोरोनाव्हायरस (Coronavirus) झुनेटिक, म्हणजेच हा विषाणू प्राणी आणि मनुष्य यांच्यात संक्रमित होतो. याचा सविस्तर अभ्यास केला की असे आढळते की सार्स-कोव्ही सिव्हेट मांजरींकडून मानवांमध्ये आणि एमइआरएससीओव्ही ड्रॉमेडरी उंटामधून मानवांमध्ये संक्रमित झाली.

अशा प्रकारचे अनेक कोरोनाव्हायरस प्राण्यांमध्ये फिरत आहेत आणि त्यापुसून मानवांना संसर्ग झालेला नाही.

कोविड – १९ ( COVID – 19) म्हणजे काय?

कोरोनाविषाणूचे भरपूर प्रकार आहेत आणि त्यापैकी काही पासून रोग होतात. यातला सगळ्यात नवीन रोग म्हणजे कोविड – १९ ( COVID – 19).

कोविड – १९ हा रोग सर्वप्रथम चीनच्या वुहान शहरात डिसेंबर २०१९ मध्ये सापडला आणि हळूहळू चीन आणि इतर देशांमध्ये पसरू लागला. कोविड – १९ ( COVID – 19) हा कोरोना विषाणूंपासून पासून होणार सगळ्यात नवीन रोग आहे आणि म्हणून त्याच्यावर अद्याप निदान नाही.

coronavirus

कोविड – १९ ( COVID – 19) प्रसार कसा होतो?

कोविड – १९ ( COVID – 19) हा संसर्गजन्य रोग असल्यामुळे तो एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला होतो. समुदाय प्रसार पण होतो, म्हणजेच एखाद्या विशिष्ट क्षेत्रातील लोकांना झाला तर खूप कमी वेळात तू संपूर्ण समुदायामध्ये पसरू शकतो. तसेच एखाद्या वस्तूवर कोरोनाचे विषाणू असतील आणि तुम्ही त्याच्या संपर्कात आलात तरीही तुम्हाला कोविड – १९ होऊ शकतो.

कोविड – १९ होणाऱ्या कोरोनाव्हायरसच्या प्रसाराचे परीक्षण सध्या जागतिक आरोग्य संघटना आणि जगभरातील इतर आरोग्य संस्था करीत आहेत. जागतिक आरोग्य संघटना (WHO) ने ३० जानेवारी २०२० मध्ये आरोग्य आणिबाणी जाहीर केली आहे.

हवेमार्फत प्रसार होतो का?

जागतिक आरोग्य संघटना (WHO) च्या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार कोरोनाव्हायरसचे विषाणू सरळ हवे मार्फत नाही जाऊ शकत अर्थात सर्दी झाल्याच्या शिंकेतून दुसऱ्याच्या शरीरात संक्रमित होऊ शकतात.

संक्रमित झालेल्या व्यक्तीच्या विष्टे / मल यापासून कोविड – १९ होऊ शकतो का?

संक्रमित झालेल्या व्यक्तीच्या मलापासून हा रोग होणे खूप मुश्किल आहे तरी पण सार्वजनिक शौचालये तथापि स्नानगृह वापरल्यावर खाण्याआधी हात स्वच्छ धुवावेत.

कोरोनाव्हायरसच्या प्रसारापासून स्वतःला कसे वाचवायचे?

  • नियमितपाने साबणाने हात धुवावेत
  • शिंकणाऱ्या किंवा खोकणाऱ्या व्यक्तीपासून कमीत कमी ३ फूट अंतर ठेवावे.
  • हात स्वच्छ धुतल्याखेरीज चेहऱ्याकडील अवयवांना स्पर्श करू नये.
  • शक्यतो गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे.
  • सर्दी, ताप, खोकला या सारखी लक्षणे असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

चीनपासून सुरुवात झालेला कोविड-१९ आता जगातील दीडशेपेक्षा अधिक देशांमध्ये पसरला आहे, आणि अमेरिका, जर्मनी, कॅनडा, फ्रांस या सारख्यामोठ्या देशांबरोबर भारतातही याचा प्रसार सध्या वेगाने होत आहे.

country wise corona virus report - kokanshakti

भारतामध्ये देखील या रोगाचा प्रसार वेगाने होत असून एकूण रुग्णांची संख्या आता १०८ पर्यंत पोहचली आहे आणि दोघांचा कोविड-१९ या आजाराने मृत्यू झाला आहे.

आतापर्यंत नोंदणी झालेल्या अधिकृत रुग्णांमध्ये चीनमध्ये सर्वाधिक म्हणजे ८०,८४९ रुग्णांची नोंद झालीय. चीन पाठोपाठ इटलीमध्ये २१,१५७ पर्यंत रुग्णांचा आकडा पोहचला आहे.

Tags
Show More

Related Articles

4 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close