8.5 कोटी शेतकऱ्यांना PM किसानचा 14 वा हप्ता वितरीत, पंतप्रधानांच्या हस्ते विकासकामांचं उद्घाटन
[ad_1]
केंद्राकडून दरवर्षी शेतकऱ्यांना 6000 रुपयांची आर्थिक मदत
PM किसान योजनेचा एप्रिल ते जुलै 2023 या कालावधीचा देय लाभ देशातील लाभार्थी शेतकऱ्यांना दिला गेला. राजस्थानमधील (Rajasthan) सीकर येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन समारंभाद्वारे PM किसानचा 14 वा हप्ता वितरीत केला. PM किसान सन्मान निधी योजने अंतर्गत भारत सरकार दरवर्षी शेतकऱ्यांना 6000 रुपयांची आर्थिक मदत करते. हे सहा हजार रुपये प्रत्येकी चार महिन्याला दोन हजार रुपयांच्या हप्त्याने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतात. आत्तापर्यंत 13 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले होते. आज अखेर पुढचा 14 हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला आहे.
1 लाख 25 हजार पंतप्रधान किसान समृद्धी केंद्रांचे लोकार्पण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज 1 लाख 25 हजार पंतप्रधान किसान समृद्धी केंद्रांचे (PM Kisan Samridhi Kendras) लोकार्पण करण्यात आलं. केंद्र सरकार टप्प्याटप्प्याने देशातील किरकोळ खत विक्री केंद्रांचे रुपांतर पंतप्रधान किसान समृद्धी केंद्रांमध्ये करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानातील सीकर येथे आयोजित कार्यक्रमात उपस्थित राहून विविध उपक्रमांचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी पंतप्रधान किसान समृद्धी केंद्रांचे लोकार्पण देखील केले. ही केंद्रे शेतकऱ्यांच्या विविध प्रकारच्या गरजा पूर्ण करतील आणि शेतकऱ्यांना कृषीविषयक साहित्य (खते,बियाणे, अवजारे), मृदा, बियाणे आणि खते यांच्या तपासणीची सुविधा पुरवतील. तसेच ही केंद्रे सरकारच्या विविध योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवतील. ब्लॉक, जिल्हा पातळीवरील दुकानांमध्ये नियमित किरकोळ विक्रीची क्षमता उभारणी सुनिश्चित करणार आहेत.
पाच वैद्यकीय महाविद्यालयांचे उद्घाटन
राजस्थानमधील धौलपूर, चित्तोडगड, सिरोही, श्री गंगानगर आणि सीकर इथे उभारण्यात आलेल्या पाच वैद्यकीय महाविद्यालयांचे उद्घाटन देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज झालं. तसेच राज्यात आणखी सात वैद्यकीय महाविद्यालयांची पायाभरणी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केलं जाणार आहे.
[ad_2]
Post Comment