देश
47 वर्षांनी रशियाकडून चांद्रमोहीम… ‘लुना 25’ यान अवकाशात झेपवणार
Published
4 months agoon
By
KokanshaktiRussia Luna 25 Mission: रशिया (Russia) तब्बल 47 वर्षांनी आपल्या दुसऱ्या चांद्रयान मोहिमेचा (Moon Mission) शुभारंभ करणार आहे. 10 ऑगस्ट रोजी रशियाचं लुना 25 (Luna 25) हे यान अवकाशात झेपावणार आहे.
रशियाचं लुना 25 हे यान पाच दिवसांत चंद्राच्या कक्षेत पोहचणार आहे. त्यांनंतर ते पाच ते सात दिवस हे यान चंद्राच्या कक्षेतच राहणार असून त्यानंतर दक्षिण ध्रुवावर असणाऱ्या तीन स्थानकांपैकी एका स्थानकांवर रशियाचं हे यान असल्याची माहिती रशियाची अंतराळ संस्था रॉसकॉसमॉसने दिली आहे.
युक्रेन आणि रशियाच्या युद्धानंतर रशियाची ही पहिलीच अंतराळ मोहिम आहे. तसेच भारताच्या इस्रो (ISRO) या संस्थेने लाँच केलेल्या चांद्रयान -3 साठी रशियाचं हे यान प्रतिस्पर्धी ठरणार असल्याचं देखील म्हटलं जात आहे.
काय आहे रशियाची लुना – 25 मोहीम?
आतापर्यंत तीन देश चंद्रावर पोहचण्यास यशस्वी झाले आहेत. यामध्ये अमेरिका, रशिया आणि चीन या देशांचा समावेश आहे. पण रशिया आता पुन्हा एकदा चंद्रावर जाण्याच्यात तयारीत आहेत.
तब्बल 47 वर्षांनी रशियाने त्यांची दुसरी चांद्रयान मोहीम हाती घेतली आहे. भारताने चांद्रयानाचं यशस्वी प्रक्षेपण केल्यानंतर चार आठवड्यांनी रशियाचं हे यान अवकाशात झेपावणार आहे. हे यान मॉस्कोच्या पूर्वेला असलेल्या रशियाच्या स्पेसपोर्ट वरुन प्रक्षेपित करण्यात आलं आहे. रशियाने त्यांच्या या मोहिमेला लुना-25 हे नाव दिलं आहे.
हे यान अवघ्या पाच दिवसांत चंद्राच्या कक्षेत पोहचणार असल्याचा दावा रशियाच्या अंतराळ संस्थेकडून करण्यात आला आहे. त्यानंतर पुढील पाच ते सात दिवस चंद्राच्या कक्षेतच राहणार आहे.
दक्षिण धुव्रावर असणाऱ्या तीन स्पेस स्टेशनपैकी एका स्पेस स्टेशनवर हे यान उतरणार असल्याची माहिती देखील रशियाकडून देण्यात आली आहे. ऑक्टोबर 2021 मध्ये या यानाचं प्रक्षेपण करण्यात येणार होतं.
पण काही कारणास्तव ही मोहीम स्थगित करण्यात आली होती. पण आता रशिया त्यांची ही मोहीम यशस्वी करण्याच्या तयारीत आहे.
भारताचं यान आणि रशियाचं यान एकत्र चंद्रावर पोहचणार ?
भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोने चांद्रयान -3 चं यशस्वी प्रक्षेपण कलं आहे. त्यानंतर या यानाने चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला असून 23 ऑगस्टपर्यंत हे यान चंद्रावर उतरणार असल्याचं सांगण्यत येत आहे. तर रशियाचं चांद्रयान देखील याच दरम्यान चंद्रावर पोहचणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
हे यान चांद्रयान -3 च्या आधी चंद्रावर पोहचण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे आता कोणतं यान पहिलं चंद्रावर पोहचणार याकडे संपूर्ण जगाकडे लक्ष लागून राहिलं आहे.
You may like
शिमलातील शिव मंदिर कोसळून 9 जणांचा मृ्त्यू; ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकल्याची भीती
ज्या ब्रिटीश कंपनीने भारतावर 250 वर्षे राज्य केलं, आज त्याच कंपनीचा मालक भारतीय
जेएनपीटी ते दिल्ली रेल्वे कॉरिडॉरचा मार्ग मोकळा! नालासोपाऱ्यातील भूसंपादनावरील स्थगिती उठवली
सावधान! विमानाने प्रवास करताना पाॅवर बँक घेऊन जाणे पडेल महागात, होऊ शकते…
सिक्कीममध्ये सरकारी महिला कर्मचाऱ्यांना खास भेट; एक वर्षाच्या प्रसूती रजेची घोषणा
Solar Eclipse 2022 :भारतात सूर्यग्रहण कुठे आणि कधी दिसणार? जाणून घ्या