Connect with us

भटकंती

सिंधुदुर्गातील १५ लक्षणीय सुमुद्र किनारे तुम्ही नक्की भेटी द्या!

Published

on

devgad beach

सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातील दक्षिणेकडचा सगळ्यात शेवटचा जिल्हा. सिंधुदुर्गची हद्द संपली की तुम्ही गोवा या राज्यात प्रवेश करता. अर्थात गोवा हा तिथल्या समुद्र किनाऱ्यांमुळे आणि नाईट लाईफमुळे खूप प्रसिद्ध आहे. दरवर्षी लोक लाखोंच्या संख्येने गोव्याला भेट देतात.

सिंधुदुर्ग गोव्यापेक्षा काही वेगळा नाही, गोव्यातील नाईट लाईफ सोडली तर सिंधुदुर्ग अगदी गोवाच आहे. महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा असून देखील सिंधुदुर्गचा म्हणावा तास विकास झाला नाही. सिंधुदुर्गातील मोजके समुद्रकिनारे सोडले तर बाकीच्या समुद्र किनाऱ्याचा विकास झालेला नाही.

सिंधुदुर्ग हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने गोवा राज्यापेक्षा मोठा आहे. गोवा राज्याला १०३ कि. मी. लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे त्या उलट सिंधुदुर्ग जिल्ह्याला १२० कि. मी. लांबीचा समुद्र किनारा आहे. अर्थातच सिंधुदुर्ग मध्ये असणाऱ्या समुद्र किनाऱ्यांची संख्या एकंदरीत गोवा राज्यापेक्षा जास्त आहे.

जर आपण गोवा राज्याची तुलना आपण महाराष्ट्र राज्याच्या किनाऱ्याच्या लांबीशी केली तर महाराष्ट्राला ७२० कि. मी. लांबीचा समुद्र किनारा आहे, म्हणजेच ६१७ कि. मी. अधिक सुमुद्रा किनारा आपल्या राज्याला लाभला आहे, आणि असे असून सुद्धा येथील समुद्र किनाऱ्याचा पर्यावरणाच्या दृष्टीने विकास झालेला नाही.

आज आपण सिंधुदुर्गातील काही सुंदर आणि प्रसिद्ध अशा सागरी किनाऱ्याची माहिती घेणार आहोत.

  • तारकर्ली,
  • देवबाग,
  • भोगवे,
  • शिरोडा,
  • निवती,
  • रेडी,
  • आचरा,
  • मोचेमाड,
  • तांबळडेग – मिठबांव,
  • कुणकेश्वर,
  • तारा मुंबरी,
  • देवगड,
  • चिवला,
  • कोंडुरा,
  • खवणे

१. तारकर्ली

तारकर्ली बीच ला भारतातील नं. १ बीच असे संबोधले जात होते. सध्या CNN च्या नवीन यादी प्रमाणे तारकर्ली हा भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा बीच आहे. मालवण तालुक्यात समुद्राच्या किनारी वसलेलं हे छोटस गाव.

मालवण तालुक्याच्या ठिकाणापासून साधारण ८ कि. मी. अंतरावर तारकर्ली बीच आहे. पर्यावरणच्या दृष्टीने सुसज्ज असा हा बीच आहे. वॉटर स्पोर्टचा भरपूर आनंद तुम्ही येथे घेऊ शकता. स्नोर्केल्लिंग, स्कुबा डायविंग, पॅरासिलींग, बोट हाऊस असे विविध प्रकार तुम्ही तारकर्ली बीच वर करू शकता.

पोहचण्याचे मार्ग –

हा बीच मुंबई पासून ६३० कि. मी. आहे, आणि सगळ्यात लवकर पोचण्याचा मार्ग म्हणजे कोकण रेल्वे. कणकवली हे तारकर्ली बीच ला सगळ्यात जवळच रेल्वे स्टेशन आहे. तिथून बस किंवा प्रायव्हेट गाडी करून तुम्ही मालवण ला येऊ शकता.

तारकर्ली हा बीच कोकणच्या अगदी शेवटी असल्यामुळे जर तुम्ही स्वतःची गाडी घेऊन मुंबई – गोवा रोडने आलात तर उत्तमच आणि त्यात जर सागरी मार्गाचा वापर केला तर तुम्हाला कोकणच्या निसर्ग सौंदर्याचा आनंद घेता येईल.

रेल्वे – जवळचे रेल्वे स्थानक कणकवली आहे.
बस -मालवण बस डेपो

२. देवबाग

तारकर्ली बीचला लागूनच देवबाग हे छोटासा गाव आहे. तारकर्लीच्या प्रसिद्धतेमुळे देवबागचा उल्लेख तास होत नाही पण तारकर्ली बीच बरोबरच त्याला जोडले जाते. तारकर्लीप्रमाणे एका बाजूला खाडी आणि दुसऱ्या बाजूला समुद्र देवबाग आहे, पण देवबागच वेगळेपण दडलंय हे खाडी आणि नदीच्या संगम स्थळामुळे. तारकर्लीप्रमाणेच देवबागला देखील तुम्ही वॉटर स्पोर्टच आनंद घेऊ शकता. २

पोहचण्याचे मार्ग –

रेल्वे – जवळचे रेल्वे स्थानक कणकवली आहे.
बस -मालवण बस डेपो

३. भोगवे

देवबागच्या संगम बीचवरून तुम्हाला भोगवे बीचचे दर्शन होते. असं तरी हा बीच कुडाळ तालुक्यात येतो. बाकीच्या तालुक्यांची तुलना करता कुडाळ तालुक्याला तसे फार कमीच बीच आहेत. पण पांढऱ्या शुभ्र वाळूची चादर ओढलेला भोगवे बीच पर्यटकांचे आकर्षण केंद्र आहे.

पोहचण्याचे मार्ग –

रेल्वे – जवळचे रेल्वे स्थानक कुडाळ आहे.
बस – कुडाळ बस डेपो

४. शिरोडा

वेंगुर्ला तालुक्यातील शिरोडा बीच म्हणजे एखाद्या उत्तम चित्रकाराने रेखाटलेले एक विहंगमय दृश्य. एका बाजूला उंच डोंगर तर दुसऱ्या बाजूला माडांच्या रांगा आणि त्या मध्ये माचीमाऱ्यांची झोपड्या.

तुम्ही या बीचवर विविध प्रकारचे वॉटर स्पोर्ट्स देखील करू शकता. जेट स्कीईंग हे सगळ्यात प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर पॅराग्लायडींचा आनंद तुम्ही घेऊ शकता.

पोहचण्याचे मार्ग –

रेल्वे – जवळचे रेल्वे स्थानक सावंतवाडी आहे.
बस – वेंगुर्ला बस डेपो

५. निवती

निवतीचा समुद्रकिनारा हा दोन भागात विभागाला गेला आहे आणि त्यातच त्याच वेगळेपण दडलेलं आहे. उंच उंच दगड, निळेभोर पाणी, पांढरी शुभ्र वाळू आणि शांत लाटा असा हा निवतीचा समुद्रकिनारा आहे. निवती समुद्रकिनाऱ्याला भेट दिल्यावर अगदी हिंद महासागरातल्या बेटांच्या समुद्रकिनाऱ्यांसारखा आहे.

पोहचण्याचे मार्ग –

रेल्वे – जवळचे रेल्वे स्थानक कुडाळ आहे.
बस – कुडाळ बस डेपो

६. रेडी

वेंगुर्ल्यातील रेडीची समुद्र किनारा तास फारसा मोठा नाही पण शिरोडाचा समुद्र किनारा आणि रेडीचा समुद्र किनारा यांच्या मधून वाहणाऱ्या अरबी समुद्र आणि तिरोबा खाडी यांच्या संगमामुळे एक विलक्षण आकर्षण तयार झालाय.

पोहचण्याचे मार्ग –

रेल्वे – जवळचे रेल्वे स्थानक सावंतवाडी आहे.
बस – वेंगुर्ला बस डेपो

७. आचरा

वरती पाहिलेल्या सर्व समुद्रकिनाऱ्यांमध्ये सगळ्यात मोठा आचऱ्याचा समुद्रकिनारा आहे. त्याच कारण असं की, हा लांब समुद्र किनारा चार समुद्रकिनाऱ्यांचा बनलेला आहे. त्या मध्ये आचार, वायंगणी, तोंडवळी आणि तळाशील या समुद्रकिनाऱ्यांपासून बनलेला आहे.

पोहचण्याचे मार्ग –

रेल्वे – जवळचे रेल्वे स्थानक कणकवली आहे.
बस – आचरा तिठा बस स्टॉप

८. मोचेमाड

वेंगुर्ला तालुक्याच्या ठिकाणापासून मोचेमाड बीच हा अवघ्या ९ कि. मी. अंतरावर आहे. आकाराने जरी हा समुद्रकिनारा छोटा असला तरी येथे पर्यटकांची वर्दळ बऱ्या पैकी असते. पांढरी शुभ्र वाळू सूर्यास्ताला सोनेरी रंगाची जणू चादरच ओढते.

पोहचण्याचे मार्ग –

रेल्वे – जवळचे रेल्वे स्थानक सावंतवाडी आहे.
बस – वेंगुर्ला बस डेपो

९. तांबळडेग – मिठबांव

तांबळडेग हे देवगड तालुक्यातील समुद्र आणि खाडी यांच्या मधोमध वसलेलं एक छोटंसं गाव आहे. तास बघता हा समुद्र किनारा दोन गावांमध्ये विभागाला गेला असला तरी खूपच छोटासा म्हणजे जवळ पास १०० ते १५० मी. एवढा भाग हा मिठबाव या गावात येतो. जर तुम्हाला एखादा शांत समुद्र किनारा हवा असेल तर तांबळडेग – मिठबांव हा सर्वात उत्तम पर्याय आहे.

पोहचण्याचे मार्ग –

रेल्वे – जवळचे रेल्वे स्थानक कणकवली आहे.
बस – देवगड बस डेपो

१०. कुणकेश्वर

कुणकेश्वर हे सिंधुदुर्गातील तसेच महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध देवस्थान आहे. दरवर्षी लाखोंच्या संख्येने भाविक या देवस्थानाला भेट देतात. हे देवस्थान सुमुद्रा किनाऱ्याला लागून असल्यामुळे येथील समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांची गर्दी मोठ्या प्रमाणात पाहावयास मिळत. जागृत देवस्थान आणि समुद्र या दोन्ही गोष्टींमुळे पर्यटक नेहमीच कुणकेश्वरला भेट देतात.

पोहचण्याचे मार्ग –

रेल्वे – जवळचे रेल्वे स्थानक कणकवली आहे.
बस – देवगड बस डेपो

११. तारा मुंबरी

गेली अनेक वर्ष देवगड तालुक्याचं कुशीत लपलेला हा समुद्र खऱ्या अर्थाने सर्व लोकांच्या निर्दशनास आला जेव्हा देवगड आणि मीठ मुंबरी या दोन गावांना जोडणारा पूल सुरु झाला. समुद्राला लागून खाडी असल्यामुळे खाडी आणि समुद्र यांचा संगम असं एक विलक्षण दृश्य पाहावयास मिळते.

पोहचण्याचे मार्ग –

रेल्वे – जवळचे रेल्वे स्थानक कणकवली आहे.
बस – देवगड बस डेपो

१२. देवगड

देवगडचा समुद्र किनारा जरी छोटा असला तरी दोन डोंगरांच्या मध्ये असलेला हा समुद्रकिनारा खूप प्रसिद्ध आहे. एका बाजूला पवनचक्की आणि दुसऱ्याबाजूला देवगडचा किल्ला यामुळे पर्यटकांची नेहमीच या समुद्रकिनाऱ्याला पसंती असते.

पोहचण्याचे मार्ग –

रेल्वे – जवळचे रेल्वे स्थानक कणकवली आहे.
बस – देवगड बस डेपो

१३. चिवला

सिंधुदुर्ग म्हटला की, सगळ्यात पाहिलं नाव कोणाच्या पण सहज तोंडावर येत ते म्हणजे मालवण. मालवण तालुका हा पर्यटनाच्या दृष्टीने सर्वात विकसित असा तालुका आहे. सिंधुदुर्ग किल्ला हा देखील मालवणच्या समुद्रात वसलेला आहे. त्याच मालवण मधील चिवला हा समुद्र किनारा खूपच प्रसिद्ध आहे. अगदी तारकर्ली सारखी गर्दी आपणास या समुद्र किनाऱ्यावर पाहता येईल.

पोहचण्याचे मार्ग –

रेल्वे – जवळचे रेल्वे स्थानक कणकवली आहे.
बस – मालवण बस डेपो

१४. कोंडुरा

सिंधुदुर्गमध्ये बरेच असे समुद्रकिनारे आहेत जे बऱ्याच लोकांना आजून माहित पण नाहीत. त्यातलाच एक समुद्र किनारा म्हणजे वेंगुर्ला तालुक्यातील कोंडुरा गावचा कोंडुरा बीच. पांढरीशुभ्र वाळू, मोठे मोठे खडक हे तुम्हाला या कोंडुराच्या समुद्रकिनाऱ्यावर पाहायला मिळेल.

पोहचण्याचे मार्ग –

रेल्वे – जवळचे रेल्वे स्थानक कणकवली आहे.
बस – मालवण बस डेपो

१५. खवणे

वेंगुर्ला तालुक्यातील प्रसिद्ध समुद्रकिनाऱ्यांपैकी असा एक हा खवणे बीच आहे. खवणे समुद्र किनारा दोन भागात विभागाला गेला आहे एक म्हणजे मोठा खवणे बीच आणि छोटा खवणे बीच. अर्थातच नावावरून तुमच्या लक्षात आलाच असेल की, दोन्ही बीचच्या आकारावरून ही नाव पडली आहेत.

अशाचप्रकाराचे अनेक छोटे मोठे समुद्र किनारे सिंधुदुर्गात आहेत त्यांचा उल्लेख या लेख मध्ये केला गेला नाही पण त्याचा अर्थ असा होत नाही की, ते समुद्र किनारे चांगले नाहीत.

सर्व समुद्र किनाऱ्यांची माहित एकाच लेखाच्या माध्यमातून घेणं कठीण असल्यामुळे आम्ही काहीच बीच येथे घेतले आहोत. जर तुम्हाला सिंधुदुर्गातील असे काही बीचेस माहित असतील जे इतर लोकांना फारसे माहित नसतील किंवा असा एखादा बीच जो तुम्हाला वाटतो कि वरील यादी मध्ये पाहिजे होता तर आम्हाला खाली कंमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा.

Continue Reading
Advertisement
6 Comments

6 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *