३५०० मराठा उमेदवारांना तत्काळ नियुक्तकरा

0
41


प्रवीण दरेकर यांचा इशारा

मुंबई : मराठा समाजाच्या उमेदवारांना शासनाच्या अधिनियमातील कलम १८ नुसार नियुक्ती देण्यात यावी, अन्यथा हा विषय विधिमंडळात मांडण्यात येईल. तरीही या प्रश्नाला सरकारने न्याय मिळवून दिला नाही तर विधिमंडळाचे सभागृह चालू देणार नाही असा जोरदार इशारा विधानपरिषदचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी दिला.

मराठा आरक्षण २०१८ अधिनियम ६२ क्रमांक १८ नुसार मराठा समाजाच्या उमेदवारांना नियुक्ती मिळण्याच्या मागणीसाठी सकल मराठा समाज महाराष्ट्र पुरस्कृत धरणे आंदोलन आझाद मैदान येथे सुरू आहे. विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी आंदोलनाच्या ठिकाणी भेट दिली. त्यांच्या समवेत आमदार राणा जगजितसिंह पाटील आणि आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी दरेकर यांनी धरणे आंदोलनाला बसलेल्या उमेदवारांचा प्रश्न समजून घेतला. मराठा समाजाच्या सुमारे ३५०० उमेदवारांना तात्काळ नियुक्ती देण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.

आमच्या सरकारमध्ये मराठा आरक्षणच्या अधिनियमानुसार या उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली होती. परंतु विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेल्या सत्ता स्थापनेच्या पेचा दरम्यान काही प्रशासकीय अधिका-यांनी या विषयामध्ये खो घातला. तसेच हा विषय न्यायालयात योग्य पध्दतीने मांडला गेला नाही, त्यामुळे या मराठा समाजाच्या या उमेदवारांवर अन्याय झाला असेही दरेकर यांनी स्पष्ट केले.

मराठा समाजाच्या या उमेदवारांना तातडीने नियुक्त करून घेण्यात यावे. तसेच न्यायालयामध्ये पुनर्विचार याचिका दाखल करावी व या उमेदवारांना न्याय मिळवून द्यावा, अन्यथा मराठा समाजाला पुन्हा एकदा आपल्या न्याय हक्काच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरावे लागेल व त्यावेळी मराठा समाजाला अडवणे कठीण जाईल, असे सांगून दरेकर यांनी सांगितले की, हा विषय मार्गी लावण्यासाठी भाजप मराठा समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here