२०१९ मधील जगातील सर्वात बलाढ्य देश

0
23

भारतीय सरकारचा ऐतिहासिक निर्णय 

भारतीय सरकारने काही दिवसांपूर्वी म्हणजेच ६ ऑगस्ट २०१९ रोजी एक ऐतिहासिक निर्णय घेत जम्मू आणि काश्मीर मधला ३७० चा कायदा रद्द करून त्याचे दोन नवीन केंद्रशासित राज्य बनवली. सध्या जम्मू आणि काश्मीर मध्ये म्हणजेच भारत पाकिस्तान सीमेवर तणावाचे वातावरण आहे.  दरम्यान भारतीय सरकारने परिस्थीती नियंत्रित ठेवण्याकरिता जम्मू आणि काश्मीर मध्ये ४५,००० पेक्षा जास्त सैनिकांची नियुक्ती येथे केली. त्यात जवळ जवळ ३ लाख शास्त्रधरी सैनिक भारत पाकिस्तान सीमेवर होते. एवढ्या प्रचंड प्रमाणात शस्त्रधारी सैनिक पाहून, भारताची सैनिक क्षमता किती आहे आणि त्याच बरोबर जगात कोणते देश या बाबतीत आघाडी वर आहेत हे जाणून घेण्याची आकांक्षा झाली. सैन्य दलाच्या बाबतीत भारताचा जगात ४ था क्रमांक लागतो,  आणि भारत सध्या जगातील सर्वात जास्त शस्त्रे आयात करण्याच्या यादीत अव्वल स्थानावर आहे. ते पाहता पुढील काही वर्षात भारताच्या या क्रमवारीत सुधारणा होऊ शकते. या क्रमवारीत अमेरिका, रशिया आणि चीन अनुक्रमे पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर येतात. किती आहे या देशांची क्षमता आणि कोण कोणते देश यामध्ये आघाडीवर आहेत हे आपण या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत. २००६ पासून GLOBAL FIRE POWER ही वेबसाईट अशाच गोष्टींवर कार्य करते आहे. 

१. अमेरिका 

जेव्हा केव्हा देशांच्या शक्तींची किंवा इतर कोणत्याही गोष्टींची तुलना केली जाते तेव्हा अमेरिका नेहमीच आघाडीच्या क्रमवारीतच असतो आणि बऱ्याच दा अव्वल स्थानावर असतो. अमेरिका हा जगातील सर्वात शक्तिशाली आणि सुसज्ज लष्कर असलेला देश आहे. अमेरिका हा जगातला सर्वात शक्तिशाली देश म्हणून ओळखला जातो. जरी सैनिकांच्या संख्येमध्ये अमेरिका भारत आणि चीन च्या बराच मागे असला तरी सैन्य दलाच्या सामर्थ्यामध्ये सर्व देशांच्या पुढे आहे. जर नुसत्या सैनिकांची तुलना केली तर चीन अमेरिकेच्या खूप पुढे आहे. सर्वात बलाढ्य देश असण्याच्या मगच मुख्य कारण म्हणजे सैन्यावर केलेला खर्च. अमेरिका आपल्या सैन्यावर जवळपास $६१० अब्ज खर्च करत. ते दुसऱ्या स्थानावर असलेल्या चीनच्या जवळपास तीन पट आहे आणि क्रमवारीतील बाकीच्या ९ देशांच्या मिळून एकूण खर्च पेक्षाही जास्त आहे.  अमेरिकेच्या सैन्याची स्थापना सन १७७५ मध्ये झाली होती. आत अमेरिकेकडे १२,८१,९०० सक्रिय सैनिक सेवेत आहेत. सैन्याच्या संखे मध्ये अमेरिकेचा तिसरा क्रमांक लागतो. तसेच अमेरिका शस्त्र आणि इतर लष्करी साहित्य निर्यातीत सुद्धा अव्वल स्थानावर आहे. 

२. रशिया 

जगात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात मोठा असलेला देश म्हणजे रशिया. हा देश जगातील दुसरा शक्तिशाली देश आहे. त्याच बरोबर शस्त्र आणि इतर लष्करी साहित्य निर्यातीत सुद्धा रशिया दुसऱ्या स्थानावर आहे.  रशियाकडे एकूण २१, ९३२ रणगाडे आहेत. ते बाकीच्या देशांच्या तुलनेत सर्वांत जास्त आहेत. रशियाच्या रणगाड्यांची संख्या ही अमेरिकेच्या तीन पट आहे. जरी सैन्यावर आणि इतर सामुग्रीवर केलेला खर्च फक्त $४४ अब्ज असला तरी अमेरिकेच्या पाठोपाठ हा देश जगातल्या सर्वात शक्तिशाली देश आहे.  क्षेत्रफळाच्या दृष्टीने जरी मोठा असला तरी देशाची लोकसंख्या खुपच कमी आहे परिणामी सैन्याच्या एकूण संख्येत रशियाचा ४ था क्रमांक लागतो. सध्याच्या स्थितीला रशियाकडे १०, १३, ६२८ इतके सैन्य आहे.

३. चीन 

गेल्या काही दशकांपासून चीनच्या प्रगतीत फार वेगाने वाढ होत आहे. चीन सगळ्या बाबीमध्ये सुरुवातीच्या पाच देशांमध्ये असतो. ज्या वेगाने चीन पुढे जातो आहे त्या वरून जाणकार असे म्हणतात की, चीन हा अमेरिके सारखी महासत्ता लवकरच बनेल. People’s Liberation Army असे चीन च्या सैन्याचे नाव आहे. चीन हा जगात सर्वाधिक मनुष्य बळ असलेला देश आहे. या देशाकडे २१,८३,००० इतके प्रचंड सैन्य आहे आणि त्या बाबतीत दुसऱ्या स्थानी असणाऱ्या भारताच्या कितीतरी पटीने जास्त आहे. त्याचबरोबर रशियापाठोपाठ सगळ्यात जास्त रांगडे असणाऱ्या देशांच्या यादीत चीन चा दुसरा क्रमांक लागतो. त्याच प्रमाणे विमान, नौदल आदी मध्ये देखील चीन पहिल्या तीन मध्ये येतो.

४. भारत

जगात लोकसंख्येच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर असणारा भारत देश हा एकूण सुसज्ज सैनिकांच्या यादीत चीनच्या नंतर दुसऱ्या स्थानावर आहे.  बलाढ्य देशांच्या बाबतीत इतर विकसित देशांच्या तुलनेत अधिक ताकदवर आहे. भारताचे संरक्षण बजेट हे ५६.२ अब्ज आहे आणि ते अमेरिका आणि चीनच्या तुलनेत फारच कमी आहे पण जगातील दुसऱ्या शक्तिशाली देश असलेल्या रशिया पेक्षा जास्त आहे. चीनप्रमाणेच भारत देखील पुढील काही वर्षात महासत्ता बानू शकतो, असे म्हटले जाते. भारताकडे एकूण १३,६२,५०० सैनिक सेवेत कार्यान्वित आहेत. लढाऊ विमानांच्या संख्येत देखील भारताचा ४ था क्रमांक लागतो. भारताकडे एकूण ४,१८४ रणगाडे आहेत, याच्या बाबतीत अग्रस्थानी असणाऱ्या रशियाच्या जवळ जवळ ५ पटीने कमी असून भारताचं रांगड्यांमध्ये जगात ६ वा क्रमांक लागतो. सध्याच्या आकडेवारी नुसार भारत हा सगळ्यात जास्त शस्त्र आणि इतर वस्तूंचा आयात करण्यात प्रथम स्थानावर आहे. जगात सर्वाधिक म्हणजे १८,२३९ दशलक्ष डॉलर इतकी आयात भारत करत आहे. ते पाहता येणाऱ्या काळात भारताचे संरक्षण खाते आजून मजबूत होईल.

५. फ्रान्स 

फ्रान्स चे २०१९ चे संरक्षण बजेट हे $४०.५ अब्ज आहे. फ्रान्सचे हवाई खाते हे इतर खात्यांपेक्षा सरस आहे त्यामुळेच हवाई दलामध्ये फ्रान्स चा जगात ८ वा क्रमांक लागतो. सध्या फ्रान्सकडे २,०५,००० इतके सैन्य आहे ते वरील बलाढ्य देशांच्या तुलनेत फारच कमी आहे. त्यामुळे एकूण कार्यरत सैनिकांच्या यादीत फ्रान्स २३ व्या क्रमांकावर आहे. एक विकसित देश असल्यामुळे आधुनिक तंत्रज्ञानामध्ये हा देश सरस आहे आणि त्यामुळेच शक्तिशाली देशांच्या यादीत ५ व्या स्थानी आहे.

६. जपान 

सर्वात शक्तिशाली देशांमध्ये उगवत्या सूर्याचा देश म्हणजेच जपान. या यादीत जपानचा  ६ वा क्रमांक लागतो. चारही बाजूने पाण्याने वेढलेला जपानीची प्रमुख शक्ती ही त्याचा नौदलात आणि हवाई दलात आहे. त्याचमुळे हवाई दलांच्या क्रमवारीत जपानचा ६ वा क्रमांक लागतो. जपानच्या लष्करात एकूण २,४७,१५७ इतके सैन्य आहे आणि जागतिक क्रमवारीत हा देश २० व्या क्रमांकावर येतो. हिरोशिमा नागासाकी या सारखा महाभयानक हल्ला झेलून देखील जपानने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे आणि हा एक विकसित देश आहे. 

७. दक्षिण कोरिया 

जगातील १० सगळ्यात शक्तिशाली देशामध्ये दक्षिण कोरिया हा आशियातला ४ था देश आहे. या देशाची गणती विकसित देशांमध्ये होते त्यामुळे नॉर्थ कोरीया पेक्षा कमी सैन्यबळ असून देखील हा देश जगातला ७ वा सर्वात बलाढ्य देश आहे. दक्षिण कोरियाकडे ६,२५,००० इतके लष्कर आहे. त्याच्यामागचं प्रमुख कारण म्हणजे नॉर्थ कोरिया. जसा तणाव भारत पाकिस्तानच्या सीमारेषेवर असतो अगदी तसाच या दक्षिण कोरिया आणि नॉर्थ कोरिया यांच्यात असतो. 

८. युनाइटेड किंग्डम 

जसा तणाव आशियातील देशांच्या सीमेवर असतो तास युरोपातील देशांच्या सीमेवर तो नसतो. युरोपातील सीमा ह्या ओपन आहेत आणि तेथे सैन्याची फार काही गरज भासत नाही म्हणूनच एवढा प्रगशील देश असून देखील ब्रिटिशांकडे फक्त १,५०,०० सैन्य आहे आणि त्यापैकी बराच सैन्य हे इतर देशांच्या मदतीसाठी तत्पर असत.

९. टर्की 

युरोप आणि आशिया खंडाला जोडणारा हा देश आहे. या देशाच्या एकूण लोकसंख्येच्या फक्त ०.५%  सैनिक आहेत. तास असाल तरी हा एक विकसित देश आहे. २०१९ च्या ग्लोबल फिरे पॉवर इंडेक्स च्या मते या देशाने शक्तिशाली देशांच्या यादीत इटलीला मागे काढलं आहे.

१०. जर्मनी 

एके कालचा सगळ्यात शक्तिशाली देश म्हणून नावाजलेला जर्मनी आज जगात दहाव्या स्थानी आहे. तंत्रज्ञानाच्या बाबतीत हा देश आघाडीवर आहे. जर्मन कडे एकूण  १,७८, ६४१ एवढाच सैन्य आहे. ते बाकीच्या देशांच्या तुलनेत फारच कमी आहे. पण आधुनिक तंत्रज्ञानामुळे हा देश जगातील बलाढ्य देशांच्या यांची १० व्या स्थानावर आहे.  लढाऊ वाहनांमध्ये जमर्नीचा जगात ८ वा क्रमांक लागतो. हा देश जगातील दोन महायुद्धाचं साक्षीदार देखील आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here