हॉटेल नको, परमिट रुम सुरू करा!

0
39


शिवसेनेच्या मंत्र्याचा बेरोजगार तरुणांना अजब सल्ला

जळगाव : यशस्वी व्हायचे असेल तर नुसते हॉटेल चालवून उपयोग नाही. त्यात फार पैसा मिळत नाही, मात्र परमिट रुम चालविले तर चांगले पैसे मिळतात, त्यामुळे तरुणांनी अशा व्यवसायाकडे वळावे, असा अजब अजब शिवसेनेची मंत्री गुलाबराव पाटील यांनी बेरोजगार तरुणांना दिला.

गुलाबराव पाटील यांनी जळगावात प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजनेच्या मेळाव्यात हा अजब सल्ला दिला आहे. प्रधानमंत्री मुद्रा योजनेंतर्गत विविध शासकीय योजनांच्या संदर्भात जिल्हास्तरीय मेळाव्याचे उद्घाटन करताना ते बोलत होते.

मंत्री पाटील म्हणाले की, विद्यार्थीदशेत असताना पैसे मिळवण्यासाठी काहीतरी व्यवसाय करायचा मनात ठरवले होते. त्या प्रमाणे शाकहारी हॉटेल सुरू केले. त्यावेळी ते चालायचे नाही. मग नंतर मांसाहारी पदार्थ सुरू केले तर हॉटेलमध्ये ग्राहक येण्यास सुरुवात झाली. पण त्यामध्ये अपेक्षित तेवढा नफा मिळत नव्हता. त्यानंतर हॉटेलसाठी परवानगी घेऊन परमिट रुम सुरू केली, तर हॉटेल चालायला लागले. ज्या हॉटेलचा दिवसभराचा गल्ला ४ हजार होता त्याचा परमिट रुमनंतर २० हजापर्यंत गेला. दिवसेंदिवस याचे प्रमाण वाढत गेले. शाहकारी हॉटेल चालत नाही पण परमिट रुम चालते असा दावा करत त्यांनी बेरोजगार आणि नव्या व्यवसायात उतरु पाहणा-या तरुणांना अजब सल्ला दिला आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here