हिंगणघाट जळीतकांड: पीडितेची प्रकृती खालावली

0
47


नागपूर : हिंगणघाट जळीतकांडातील पीडितेची प्रकृती खालावली असल्याची माहिती तिच्यावर उपचार करणा-या डॉक्टरांनी दिली आहे. पीडितेचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करत असून सध्या या तरुणीला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. गेल्या सहा दिवसांपासून नागपूरच्या ऑरेंज सिटी रुग्णालयात ही तरुणी मृत्यूशी झुंज देत आहे.

पीडितेवर शनिवारी एक अतिशय महत्वाची शस्त्रक्रिया करण्याचे डॉक्टरांनी ठरवले होते. मात्र, पीडितेची प्रकृती खालावल्याने डॉक्टरांनी ही शस्त्रक्रिया न करता ती रविवारी किंवा योग्य वेळी करण्याचा निर्णय घेतला आहे.

पीडितेचा गुरुवारी रक्तदाब वाढला होता. त्यानंतर जंतूसंसगार्चा धोका लक्षात घेता ऑरेंज सिटी रुग्णालयाने अतिदक्षता विभागातील सर्व ७ रुग्णांना इतरत्र हलविले होते. या ठिकाणी केवळ एकटय़ा पीडितेलाच ठेवण्यात आले आहे. हा वॉर्ड जळीत प्रकरणातील पीडित तरुणीसाठी आरक्षित करण्यात आला आहे. त्यानंतर शुक्रवारी तिचा रक्तदाब स्थिर झाल्याने तिच्यावर उपचार करणा-या डॉक्टरांनी शस्त्रक्रिया केली. या घडामोडीत भाजलेल्या तिच्या शरीरावरी जखमांचेही र्निजतुकीकरण करण्यात आले. सोबतच या तरुणीच्या जखमांवरही ड्रेसिंग रोज बदलले जात आहे.

आरोपीला न्यायालयीन कोठडी; पहाटेच न्यायालयीन कामकाज
हिंगणघाट जळीतकांडातील आरोपी विकेश नगराळेची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आल्याचे पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी सांगितले. शनिवारी भल्या पहाटे अंधारात आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे. सुरुवातीला पोलीस कोठडी वाढवून मिळेल, असे वाटत होते. मात्र, अचानक न्यायालयीन कोठडी मिळाल्याने सुरक्षेच्या दृष्टीकोनातून तसेच ओळख परेडसाठी हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.

हिंगणघाटमधील नांदोरी चौकात सोमवारी प्राध्यापिकेला पेट्रोल टाकून जाळण्यात आले. यामध्ये ती ४० टक्के भाजली असून तिच्यावर नागपूर येथील ऑरेंज सिटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात रोष पसरला होता. तसेच ठिकठिकाणी आंदोलन देखील करण्यात आले.

दरम्यान, घटनेतील आरोपी विकेश नगराळे याला घटनेच्या दिवशी नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी परिसरातील टाकळघाट येथून अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी मिळाली होती. शनिवारी पहाटेच न्यायालय सुरू करून पुन्हा त्याला न्यायालयात हजर करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. त्यामध्ये त्याला न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. पुढील तपासात गरज पडल्यास पुन्हा चौकशीसाठी पोलीस कोठडी मिळावी, अशी विनंती पोलीस प्रशासनाकडून करण्यात आली होती. ती देखील मान्य करण्यात आल्याचे पोलीस अधीक्षकांनी सांगितले.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here