देश
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोना वाढत्या पादुर्भावामुळं सात दिवसांचे कडक लॉकडाऊन जाहीर; पालकमंत्री यांची घोषणा
Published
2 years agoon
By
Kokanshaktiजिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असल्यामुळे दिवसेंदिवस रुग्ण संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
कोरोनाचा संसर्ग तोडण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात सात दिवसाचा कडक लॉकडाऊन पालकमंत्री उदय सामंत यांनी जाहीर केला आहे.
जिल्ह्यामध्ये ९ मे रात्री १२ वाजल्यापासून १५ मे ठी ७ वाजेपर्यंत कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात येत असल्याची शनिवारी घोषणा केली आहे.
भाजीपाला, फळ विक्रेते, खाद्यपदार्थ, अंडी, पाळीव प्राण्यांची खाद्यंची दुकाने तसेच सर्व दुकाने बंद राहतील. होम डिलिव्हरी सकाळ १ पर्यंत करण्याची परवानगी देण्यात आली आहे. कृषी अवजारे, शेती च्या संबंधित दुकाने सकाळी ७ ते ५ पर्यंत सूरु राहतील.त्याचप्रमाणे हॉटेल्स, रेस्ट्रॉरंट यांची घरपोच पार्सल सेवा सकळी ११ते दुपारी २ पर्यन्त सुरू राहील,
जिल्ह्यातील रास्त भाव धान्य दुकाने सकळी ११ते २ पर्यंत सुरू असतील.
या आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती अथवा संस्थेवर भारतीय दंड संहिता १८६०(४५) च्या कलम १८८, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ व साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदी प्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असे आदेश जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी दिले आहेत.
You may like
जगातील 30 सर्वात सुंदर पर्यटनस्थळांच्या यादीत सिंधुदुर्गचा समावेश
सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीनंतर भाजप पदाधिकाऱ्यांचा जल्लोष
जलवाहतुकीने कोकणातील पर्यटन बहरणार; रो-रो सेवेला मिळतेय अधिक पसंती, जलमार्गाने पाहता येतेय नैसर्गिक सौंदर्य
Hapus Mango : देवगड हापूस आंब्याचे बाजारात आगमन, पेटीचा भाव 18 हजार रुपये
कोकणच्या विकासाने भरारी घेतली | कोकणची संपन्नता जगासमोर येणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
‘कुडाळेश्वर’च्या जिल्हास्तरीय भजन स्पर्धेला आज पासून सुरुवात