साप्ताहिक राशिभविष्य

0
45


साप्ताहिक राशिभविष्य, दि. २ ते ८ फेब्रुवारी २०२०

रोज व्यायाम करा
मेष – व्यायामाच्या आधारे वजन नियंत्रणात ठेवू शकता. आर्थिक स्थितीतील बदल हे नक्कीच होणार आहेत. दूरवर राहणा-या नातेवाइकांकडून अनपेक्षितपणे गोड बातमी मिळाल्याने संपूर्ण कुटुंबासाठी आनंदाचा दिवस ठरेल. शारीरिक अस्तित्व हे आता गौण आहे कारण तुम्ही सदासर्वकाळ एकमेकांच्या प्रेमाची अनुभूती घेत आहात. अनुभवी लोकांसाठी वेळ काढा आणि त्यांना काय म्हणायचे आहे हे जाणून घ्या. तुमचे व्यक्तित्व लोकांपेक्षा थोडे वेगळे आहे. तुम्ही एकटा वेळ घालवणे पसंत करतात. तुम्हाला आपल्यासाठी वेळ मिळेल; परंतु ऑफिसच्या अनेक समस्या तुम्हाला त्रास देत राहतील. तुमचे वैवाहिक आयुष्य आज एक चांगले वळण घेणार आहे.

लकी क्रमांक : २

साप्ताहिक राशिभविष्य उधार दिलेले पैसे परत मिळतील
वृषभ – तुमचा आनंदी-उत्साही स्वभाव इतरांना आनंद देणारा असेल. आर्थिक पक्ष मजबूत होण्याची पूर्ण शक्यता आहे. तुम्ही कुठल्या व्यक्तीला पैसा उधार दिला असेल, तर तुम्हाला तो पैसा परत मिळण्याची शक्यता आहे. मुलांनी त्यांच्या अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रीत करण्याची आणि भविष्याची योग्य योजना करण्याची गरज आहे. नवीन प्रेमप्रकरण घडण्याची दाट शक्यता आहे, पण आपली खासगी आणि गुप्त माहिती तुम्ही उघड करू नका. तुमच्या कार्यालयात तुम्ही जे काम करणार आहात, त्याचा तुम्हाला भविष्यात एका वेगळ्या प्रकारे फायदा होणार आहे. व्यक्तिमत्त्व सुधारण्यावर केलेल्या प्रयत्नांचे समाधानकारक फळ मिळेल.

लकी क्रमांक : २

साप्ताहिक राशिभविष्य नशिबावर हवाला ठेवत बसू नका
मिथुन – नशिबावर हवाला ठेवून बसू नका, त्याऐवजी आपले आरोग्य सुधारण्याचा प्रयत्न करा. भविष्यात असे होईल, तसे होईल असे म्हणत राहू नका. आपले वजन नियंत्रणात आणून आपले आरोग्य सुस्थापित करण्यासाठी नव्याने व्यायाम सुरू करण्याची आत्यंतिक गरज आहे. संयुक्त प्रकल्पात आणि संशयास्पद आर्थिक योजनांमध्ये गुंतवणूक करू नका. तुमचा विश्वास ज्या व्यक्तीवर आहे अशी व्यक्ती तुम्हाला पूर्ण सत्य सांगणार नाही. इतरांना पटवून देण्याच्या तुमच्या क्षमतेमुळे तुम्ही आगामी काळात उद्भवणा-या समस्या सोडवू शकाल. महत्त्वाचे जमीनविषयक व्यवहार आणि करमणुकीच्या प्रकल्पामधील अनेक लोकांचे समन्वयन करण्यास सध्याची स्थिती तुमच्यासाठी उत्तम आहे.

लकी क्रमांक : ५

साप्ताहिक राशिभविष्य दीर्घ काळ प्रवास फायदेशीर ठरेल
कर्क – तुमचे आरोग्य आणि ऊर्जा बचतीची सवय तुम्हाला दीर्घ काळ प्रवासाच्या योजनेसाठी फायदेशीर ठरेल. अतिशय व्यस्त असूनही तुम्ही आरोग्य चांगले राखल्यामुळे थकवा येणार नाही. आर्थिक व्यवहार आणि वायदे अतिशय काळजीपूर्वक सांभाळा. तुम्ही सगळ्या समस्या, अडचणी विसरून कुटुंबातील सदस्यांसमवेत आनंदात वेळ घालवाल. तुमच्या तीव्र भावनांना आवर घाला, नाहीतर तुमचे प्रेम प्रकरण धोक्यात येऊ शकते. आपल्या कामाबाबत आणि दृष्टिकोनाबाबत प्रामाणिक राहा. आपले दृढ निश्चय आणि कामातील कौशल्याची दखल घेतली जाईल. तुम्ही ऑफिसमधून परत येऊन आपले आवडते काम करू शकतात, यामुळे मनाला शांती मिळेल.

लकी क्रमांक : ३

साप्ताहिक राशिभविष्य वागण्यावर नियंत्रण ठेवा
सिंह – उत्स्फूर्तपणे वागण्यावर नियंत्रण ठेवा आणि दुराग्रही स्वभावावर नियंत्रण ठेवा. खासकरून पार्टीमध्ये त्यामुळे एखाद्याचा मूड खराब होईल. धनलाभ होण्याची शक्यता आहे; परंतु असे होऊ शकते की, आपल्या रागीट स्वभावाच्या कारणाने तुम्ही पैसा कमावण्यात सक्षम होणार नाही. प्रेमातून साहचर्य आणि बॉण्डिंग तयार होईल. पाहताक्षणी तुम्ही प्रेमात पडण्याची शक्यता आहे. अटेंड केलेल्या व्याख्यानांमुळे आणि परिसंवादामुळे तुम्हाला प्रगतीसाठी नव्या संकल्पना सुचतील.

लकी क्रमांक : २

साप्ताहिक राशिभविष्य बचत कराल
कन्या – तुम्ही निवांत राहण्याची गरज आहे आणि त्यासाठी जवळचे मित्र व कुटुंबातील सदस्य यांच्यासोबत आनंद लुटा. धनाची देवाण-घेवाण असेल आणि दिवस मावळण्याच्या वेळी तुम्ही बचत करण्यात यशस्वी असाल. तुमच्या कृतीमुळे तुमच्यासोबत राहात असलेली व्यक्ती प्रचंड त्रासून जाईल. तुमचा जोडीदार रोमॅन्टिक मूडमध्ये असेल. तुम्हाला कामाच्या ठिकाणी खास वाटेल. कायदेशीर सल्ल्यासाठी वकिलांना भेटायला चांगला सप्ताह.

लकी क्रमांक : ९

साप्ताहिक राशिभविष्य स्वभावावर नियंत्रण ठेवा
तूळ – उत्स्फूर्तपणे वागण्यावर नियंत्रण ठेवा आणि दुराग्रही स्वभावावर नियंत्रण ठेवा. खासकरून पार्टीमध्ये त्यामुळे एखाद्याचा मूड खराब होईल. तुमच्यासमोर सादर झालेल्या गुंतवणूक योजनांचा नीटपणे विचार करायला हवा. कुटुंबीयांनी दिलेला चांगला सल्ला तुमच्यासाठी लाभदायक फळ देणारा असेल. आपल्या प्रिय व्यक्तीपासून दूर राहणे खूप कठीण असेल. समाजातही वेगवेगळ्या लोकांशी भेटीगाठी होतील. लोक तुमचा सल्ला मागण्यासाठी तुमच्याकडे येतील आणि तुमच्या मुखातून निघालेला प्रत्येक शब्द त्यांना निर्विवाद मान्य होईल. तुमच्या परिपूर्ण आत्मविश्वासाचा फायदा घ्या आणि बाहेर जाऊन नवीन लोकांशी, मित्रमंडळींशी संपर्क साधा. जर तुमच्या आयुष्याला नियंत्रित करण्यासाठी तुम्ही इतरांना तुमच्या जोडीदारापेक्षा अधिक संधी देत असाल, तर तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून विपरित प्रतिक्रिया मिळेल.

लकी क्रमांक : २

साप्ताहिक राशिभविष्य बोलताना, वागताना सावध राहा
वृश्चिक – भावनिकदृष्टय़ा तुम्ही स्थिर व्यक्ती नाहीत. त्यामुळे इतरांसमोर कसे वागता-बोलता त्याबाबत सावध असणे योग्य ठरेल. प्रलंबित घटना, वादग्रस्त विषय संदेहास्पद होतील आणि खर्चामुळे तुमचे मन काळवंडून जाईल. मुलांवर आपली मते लादण्यामुळे ती त्रस्त होतील. त्यापेक्षा आपणास काय सांगायचे ते त्यांना समजण्यास मदत होईल असे करा, ते आपली मते स्वीकारतील. स्वप्नील चिंता सोडून द्या. तुम्ही एखाद्याला मदत देऊ केलीत, तर गौरव होईल किंवा लोक त्याची दखल घेतील आणि तुम्ही प्रकाशझोतात याल. तुमच्या नेहमीच्या दिवसापेक्षा आजचा दिवस वैवाहिक आयुष्यातील वेगळा दिवस असेल.

लकी क्रमांक : ४

साप्ताहिक राशिभविष्य अनपेक्षित बिलांमुळे आर्थिक बोजा वाढेल
धनु – मौज, मस्ती, मजा आणि करमणुकीचा सप्ताह अनपेक्षित बिलांमुळे आर्थिक बोजा वाढेल. नातेवाइकांच्या घरी जाऊन एखाद् दोन दिवस घालवलेत तर दैनंदिन धकाधकीच्या जीवनातून थोडा आराम, विश्रांती मिळेल. तुमच्या नात्यातल्या सगळ्या तक्रारी निघून जातील. संधी येण्याची, काहीतरी घडण्याची वाट पाहत बसू नका, त्याऐवजी स्वत:हून नव्या संधींचा शोध घ्या. आपल्या प्रेमीसोबत वेळ घालवू शकाल आणि त्यांच्यासमोर आपल्या गोष्टींना व्यक्त करू शकाल. आपल्या सहचरासोबत असणे कसे असते याची तुम्हाला जाणीव होईल आणि तुमचा/तुमची जोडीदार ही त्यापैकीच एक आहे.

लकी क्रमांक : १

साप्ताहिक राशिभविष्य कार्यालयातून लवकर बाहेर पडा
मकर – कार्यालयातून लवकर बाहेर पडण्याचा प्रयत्न करा आणि ज्या गोष्टी तुम्हाला आवडतात त्याच करा. तुमचे भाऊ-बहीण तुमच्याकडून आर्थिक मदत मागू शकतात आणि त्यांच्या मदतीने तुम्ही स्वत: आर्थिक दबावात येऊ शकतात. तथापि स्थिती लवकरच सुधारेल. मित्र आणि जवळचे स्नेही मदतीचा हात पुढे करतील. तुमच्या प्रिय व्यक्तीच्या बाहुपाशात तुम्ही कमालीचा आनंद मिळविण्यात मश्गूल व्हाल. त्यामुळे तुमचे कामाकडे लक्ष लागणार नाही. नेहमीपेक्षा तुम्ही उच्च लक्ष्य गाठण्याचा प्रयत्न कराल. अपेक्षित निकाल मिळाला नाही तरी नाराज होऊ नका. प्रवास आनंददायी आणि खूपच फायदेशीर ठरेल.

लकी क्रमांक : १

साप्ताहिक राशिभविष्य अडचणींवर हसत हसत मात करा
कुंभ – तुमच्या सर्व अडचणी, समस्यांवर हसत हसत मात करणे हाच उत्तम उपाय ठरतो. देणेकरी तुमच्या दरवाजावर येऊ शकतो आणि तुमच्याकडून उधार मागू शकतो. त्यांना पैसे परत करून तुम्ही आर्थिक तंगीमध्ये येऊ शकतात. तुम्हाला उधार न घेण्याचा सल्ला दिला जातो. नातेवाईक आणि मित्रांना आपल्या आर्थिक बाबीचे व्यवस्थापन करू देऊ नका, अन्यथा आपले अंदाजपत्रक कोलमडू शकते. जोपर्यंत एखादे काम पूर्ण होण्याची खात्री होत नाही तोपर्यंत कसलेही वचन देऊ नका. रिकाम्या वेळेचा तुम्ही सदुपयोग करा.

लकी क्रमांक : ८

साप्ताहिक राशिभविष्य आजार दु:खाचे कारण ठरेल
मीन – तुमचा आजार तुमच्या दु:खाचे कारण ठरेल. लवकरात लवकर त्यावर मात करून कुटुंबात आनंद परत आणा. तुम्ही आपले धन धार्मिक कार्यात लावू शकतात, ज्यामुळे तुम्हाला मानसिक शांतता मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. मोकळा वेळ घराच्या सुशोभीकरणासाठी खर्च करा. तुमच्या कुटुंबाकडून तुमचे कौतुक होईल. नवीन व्यावसायिक भागीदारीत काही सुरु करणे टाळा, गरज पडल्यास आपल्या जवळच्या लोकांचा सल्ला घ्या. रिकाम्या वेळेचा योग्य वापर करणे तुम्हाला शिकावे लागेल अथवा जीवनात तुम्ही अनेक लोकांच्या मागे राहाल.

लकी क्रमांक : ६Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here