सफरचंदाचे उत्तम आरोग्यासाठी १० प्रभावशाली फायदे!

0
66
Benefits of Apple

रोज एक अप्पाल खा आणि डॉक्टर पासून दूर रहा

“APPLE” (सफरचंद) हे बहुचर्चित नाव आहे. त्याच्या उल्लेख केला की सगळ्यात पहिल ध्यानात येतो तो म्हणजे Apple कंपनीचा स्मार्टफोन. ही वस्थुस्थिती आहे. आताच्या युवा पिढीला जर विचारलं What are the benefits of APPLEतर ते नक्कीच तुम्हाला सफरचंद (APPLE )फळ  सोडून कंपनीबद्दल सांगतील आणि असं चक्क माझ्या सोबत घडलं. म्हणून ठरवलं की, सफरचंदावर लिहणं खूप गरजेचं आहे जेणेकरून, युवा पिढीला या फळाचं महत्व समजेल.

सफरचंद हे एक स्वादिष्ट, अतिशय लोकप्रिय, आणि आरोग्यासाठी लाभदायी असं फळ आहे. तसेच जगात सर्वात जास्त उत्पन्न घेतलं जाणार फळ आहे आणि त्याची  मागणी जग भर आहे.  सफरचंदाचे उत्पन्न समशीतोष्ण प्रदेशात घेतलं जात. या फळाची सुरुवात मध्य आशियातून झाली आणि म्हणूनच चीन हा देश सफरचंदाच्या उत्पन्नामधे अग्रस्थानावर आहे.  चीनच्या पाठोपाठ अमेरिका आणि पोलंड अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर येतात, तर या यादी मध्ये भारताचा पाचवा क्रमांक लागतो. 

सफरचंदाचे फायदे अनेक आहेत. जर आपण नियमितपणे सफरचंदाचे सेवन केलं तर आपण विविध आजारापासून स्वतःला दूर ठेऊ शकतो. म्हणून तर इंग्रजी मध्ये एक म्हण प्रचलित आहे, ती म्हणजे “AN APPLE A DAY KEEPS THE DOCTOR AWAY” याचाच अर्थ आसा की, नियमित पणे सफरचंद खाल्ल्यास तुम्ही आजारी नाही पडणार. त्याचाच आढावा आज आपण सफरचंदाचे १० प्रभावशाली फायदे या लेखाच्या माध्यमातून घेणार आहोत.

सफरचंदाचे उत्तम आरोग्यासाठी १० प्रभावशाली फायदे!

Image by S. Hermann & F. Richter from Pixabay 

१. सफरचंद पौष्टिक असतात

सफरचंद स्वादिष्ट असतातच पण त्याचबरोबर पौष्ठिक देखील असतात. सफरचंद हे पॉलीफेनॉल ने भरपूर असते. त्याचप्रमाणे एका मध्यम आकाराच्या सफरचंदात मॅंगनीज, तांबे आणि जीवनसत्त्वे अ, ई, बी 1, बी 2 आणि बी 6 असतात. फायबर आणि व्हिटॅमिन सी चा एक उत्तम स्रोत म्हणून सफरचंदाकडे पाहिलं जाते. ज्याचे अनेक फायदे आपल्या आरोग्यासाठी होतात. 

२. वजन कमी करण्यासाठी

जे लोक आपले वाजन कमी करू इच्छितात त्याच्या साठी सफरचंद फारच उपयोगी ठरते. पण याचा अर्थ असा नाही के तुम्ही फक्त सेवन करत राहाल आणि तुमचं वजन कमी होईल. वजन कमी करण्यासाठी सफरचंद फायदेशीर ठरते याचे पुरावे विज्ञान देतो परंतु त्याचबरोबर योग्य तो व्यायाम करणं देखील तितकाच गरजेच आहे. एका अभ्यासातून असे निष्कर्षास आले आहे की, सफरचंदाच्या सेवनाने ऊर्जा खर्च (Calories Burned) करण्यासाठी लागणाऱ्या रसाला अधिक प्रभावशाली बनवते. जेवढी अधिक ऊर्जा खर्च होणार तेवढ्या कमी वेळात आपलं कॅलरीज कमी होणार. 

३.हृदयविकारासाठी 

विज्ञान असं म्हणतं की नियमित जर सफरचंदाचा सेवन केलं तर ते हृदयविकारांस कमी करण्यात मदत करते. 

सफरचंदामध्ये फायबर चे प्रमाण जास्त असल्यामुळे ते रक्तातील Cholesterol ची पातळी कमी करण्यात फायदेशीर ठरते. सफरचंदात असणाऱ्या लिपीड पेरॉक्सिडेशन आणि तंतू हृदयाला ताण देण्यापासून वाचवतात. तसेच हृदयाचे कार्य व्यवस्थित चालू राहते. कोलेस्टेरॉलचे वाढते प्रमाण हे हृदयविकाराचे प्रमुख कारण आहे, आणि सफरचंदाच्या सेवनाने आपण ते प्रमाण कमी करू शकतो. सफरचंदामध्ये पॉलीफेनॉल देखील आहेत, जे कमी रक्तदाब आणि स्ट्रोकचा प्रभाव कमी करत.

४. मधुमेह 

मधुमेह आजकाल हा वाढत्या वयाबरोबर बऱ्याच जणांना होऊ लागला आहे. याच मुख्य कारण म्हणजे रक्तामध्ये शर्करेचे वाढते प्रमाण होय. ज्यांना मधुमेह होतो त्यांना शर्करेचे रक्तातले प्रमाण नियंत्रित ठेवणे गरजेचे आहे. सफरचंदामध्ये असलेलं पॉलिफिनॉल सरळपणे शरीरातील कर्बोदकांच्या संपर्कात राहून रक्तातील शर्करेला नियंत्रित करण्याचे काम करते. त्याचमुळे मधुमेहाचे प्रमाण नियंत्रित राहते. तसेच पॉलिफिनॉलमुळे पाचनशक्ती वाढते, त्यामुळे ग्लुकोज पचवण्याची क्षमता वाढते आणि शरीरातील इन्सुलीन चे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत होते. रक्त प्रवाह सुरळीत होतो आणि रक्ताचे प्रमाण शरीरात नियंत्रित होते. सफरचंदाच्या सेवनाने तांबड्या पेशीचे प्रमाण वाढण्यास देखील मदत होते. म्हणूनच जर मुधमेहाचा शिकार व्हायचा नसेल आणि जर त्याचे प्रमाण कमी करायचे असेल तर नियमित पाणे सफरचंदाचे सेवन करणे अनिर्वाय आहे.

५. एनिमिया 

शरीरात लोहाच्या कमतरतेमुळे एनिमिया होतो. माणसाच्या शरीरात ३ ते ४ ग्राम लोह असते. पुरुषांत लोहाचे प्रमाण जास्त तर त्यापेक्षा थोडे कमी स्त्रियांमध्ये आढळते. आपल्या निरोगी आरोग्याचा आणि शरीरातील लोहाचा महत्वाचा संबंध आहे. आपल्याला होणारे बरेचशे आजार हे लोहाच्या कमतरतेमुळे होतात. सफरचंद हे लोह्याने परिपूर्ण आहे. त्याच्या मध्ये लोह भरपूर प्रमाणात असते.  म्हणूनच आजारी पडल्यावर मोठी माणस आपल्याला सफरचंद खाण्याचा सल्ला देतात. की जेणेकरून आपल्या शरीरातील तांबड्या पेशी वाढाव्यात आणि त्यानिमित्ताने रोगप्रतिकारक शक्ती वाढावी.

६. कर्करोग थांबवू शकतो 

कर्करोग हा जगातील सर्वात भयानक आजार आहे आणि त्याचे प्रमाण दिवसेन दिवस वाढतच आहे. मागच्याच महिन्यात म्हणजे जुलै २०१९ ला जेव्हा मी मुंबईच्या टाटा मेमोरेबलमध्ये गेलो होतो तेव्हा एक गोष्ट ऐकून थक्कच झालो ती म्हणजे दर दिवशी येणाऱ्या नवीन रुग्णांची संख्या. या महाभयंकर आजारावर सध्या एक संशोधन चालू आहे ते म्हणजे, सफरचंदनाच्या सेवनाने कर्करोग कशाप्रकारे प्रभावीपणे थांबवला जाऊ शकतो. 

कर्करोग हा शरीरातील रोग प्रतिकारक शक्ती कमी करतो अर्थात संपवून टाकतो आणि त्याचमुळे आपल्या शरीराला इतर आजार होतात. त्या आजारांचा सामना करण्यासाठी आपल्याकडे रोगप्रतिकारक शक्ती असं गरजेचं आहे. आधी सांगितल्या प्रमाणे सफरचंद हे रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यात मदत करत. परिणामी ते कर्करोग काही प्रमाणात कमी करतात. तसेच सफरचंदामुळे महिलांमध्ये होणार स्तन आणि मलाशयाच्या कर्करोगास थांबवू शकतो. त्याचप्रमाणे फुपुसामध्ये होणाऱ्या कर्करोगात सफरचंद खाल्ल्याने खूप फायदा होतो.

७. निरोगी दात 

दातांचे आजार हे अतिशय वेदनादायी असतात. दातांमध्ये कॅल्शियम चे प्रमाण कमी झाले की, दाताला कीड लागणे, हिरड्यातून रक्त येणे या सारख्या समस्या उद्भवतात. रोज सफरचंदाचे सेवन केल्याने दातांमधील कॅल्शियम चे प्रमाण वाढण्यास मदत होते. सफरचंदामधील तंतू दातांची आतून सफाई करतात आणि हानिकारक विषाणूंना पसरण्यापासून रोकतात. तसेच शरीरातील लाळेचे प्रमाण संतुलित ठेवण्यात सफरचंद महत्वाची भूमिका पार पडते. 

८. डोळ्यांचे आजार 

डोळ्यांच्या मुख्य समस्या म्हणजे डोळ्यांत येणारी अंधारी आणि न दिसण्याची समस्या. तसेच मैकुलर डिजरेशन, कटरेक्ट आणि ग्लुकोमात होणारे रोग नियमित सफरचंदाच्या सेवनाने दूर करता येतात. म्हणूनच आजच स्वतःला दिवसतुन एक तरी सफरचंद खाण्याची सवय लावा.

९. वात 

बऱ्याच लोकांना वाताचा खूप त्रास असतो आणि त्यामुळे त्याचे शरीर हे पूर्णपणे आखडून जाते. अशा लोकांनी नियमितपणे सफरचंदाचे सेवन केले तर वाताच्या समस्या दूर होण्यास मदत होते. पॉलिफेनॉलचे (Polyphenols) प्रमाण सफरचंदामध्ये भरपूर प्रमाणात असते हे तुमच्या लक्षात आलाच असेल. त्याचाच एक उपघटक म्हणजेच फ्लॅवोनाइड हे कम्पर्फेरोल, क्युर्सेनटीन आणि मेरी सेटीनयांनी बनलेले असते ते वाताशी निगडित आजार दूर करण्यास मदत करते.

१०. अस्थमा 

बरेचसे आजार हे नाकातून होतात. नाक हे अत्यंत संवेदनशील आहे. म्हणून श्वसनयंत्रणेत थोडा जरी बिघाड झाला तरी लगेचच आपण आजारी पडतो. नकामधून होणाऱ्या प्रमुख समस्यांपैकी एक म्हणजे अस्तमा होय. त्याचा परिणाम कमी कारण्यासाठी सफरचंद खूप फायदेशीर ठरते. 

अशाप्रकारे सफरचंदाचे अनेक फायदे आपल्या शरीराला होतात आणि मुख्य म्हणजे त्यापासून कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. जसे जास्त केळी खाल्ली की सर्दी होते, हापूस आंब्याचे जास्त सेवन केले की, उष्णतेचा त्रास होतो. म्हणून आजच निश्चय करा आणि रोज एक सफरचंद नियमित सेवन करा. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here