श्रवणीय ‘मन फकीरा’

0
29


मृण्मयी प्रतिभा देशपांडे लिखित आणि दिग्दर्शित ‘मन फकीरा’ चित्रपटाच्या संगीताचे अनावरण (म्युझिक लाँच) नुकतेच झाले. आजवर पडद्यावर गाणी दाखवून संगीताचे अनावरण होत असे. मात्र या चित्रपटाच्या ‘टीम’ने लाइव्ह म्युझिक सादर करताना उपस्थितांची मने जिंकली.

संगीत अनावरण सोहळ्यासाठी दिग्दर्शक मृण्मयी देशपांडे, सुव्रत जोशी, सायली संजीव, अंजली पाटील आणि अंकित मोहन या कलाकारांसह संगीत दिग्दर्शक व गायक सिद्धार्थ महादेवन, सौमिल शृंगारपुरे आणि यशिता शर्मा उपस्थित होते. मृण्मयी देशपांडे आणि सुव्रत जोशी यांनी सूत्रसंचालन केले. या संगीत सोहळ्यात या सिनेमाचे संगीत दिग्दर्शक व गायक सिद्धार्थ महादेवन, सौमिल शृंगारपुरे, यशिता शर्मा, गौतमी देशपांडे, निकिता गांधी या सर्व गायकांनी वाद्यवृंदाच्या साथीने ‘मन फकीरा’ चित्रपटातील ‘मन फकीरा’, ‘घरी गोंधळ’, ‘सांग ना’, ‘समथिंग इज राईट’ अशा या चार बहारदार सुरेख गाण्यांची प्रात्यक्षिक जेमिंग मैफल रंगवली यामध्ये सिनेमाचे कलाकार सुव्रत जोशी, सायली संजीव, अंजली पाटील आणि अंकित मोहन देखील सामील झाले.

त्याचबरोबर सुव्रत जोशीने मधुचंद्राच्या पहिल्या रात्री जोडप्यांमध्ये नक्की काय गमती-जमती होतात, यावर पोट धरून हसवणारी ‘स्टॅन्ड-अप कॉमेडी’ सादर केली, या सिनेमाची गाणी वैभव जोशी, क्षितिज पटवर्धन यांच्या लेखणीतून आली आहेत. या कार्यक्रमादरम्यान वैभव जोशी यांच्या काही प्रेमावरील रंगतदार कविता चित्रफीत रूपात दाखवण्यात आल्या.

फ्रेम्स प्रॉडक्शन कंपनीचे हेमंत रूपरेल, रणजीत ठाकूर आणि स्मिता फिल्म प्रॉडक्शन्सची प्रस्तुती असलेल्या ‘मन फकीरा’ चित्रपटाची निर्मिती एस. एन. प्रॉडक्शन्स आणि स्मिता विनय गानू, नितीन प्रकाश वैद्य यांनी केली असून, चित्रपटाची सहनिर्मिती तृप्ती कुलकर्णी यांची आहे. नात्यांचा खरा अर्थ सांगणारा ‘मन फकीरा’ सिनेमा ६ मार्च २०२० रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

युवा पिढी केंद्रस्थानी : मृण्मयी देशपांडे
कथा स्वत: लिहिल्याने चित्रपटात नेमकी किती गाणी असावीत, हे मला ठाऊक होते. वैभव जोशी आणि क्षितिज पटवर्धन यांनी गाणी लिहिली आहेत. सर्व गाणी खूप वेगळ्या धाटणीची आणि गाणी श्रवणीय झाली आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवरची आणि आजच्या तरुण पिढीला आवडतील अशी गाणी हवी होती. सिद्धार्थ महादेवन आणि सौमिल यांनी अशाच पद्धतीची खूप उत्तम दर्जाची गाणी ‘मन फकीरा’साठी रचली आहेत. ‘मन फकीरा’ हे गाणे इतके श्रवणीय झाले आहे की, ते प्रेक्षकांच्या कायम ओठांवर राहील, असे मृण्मयी देशपांडेने म्हटले आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here