Connect with us

देश

शिमलातील शिव मंदिर कोसळून 9 जणांचा मृ्त्यू; ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकल्याची भीती

Published

on

शिमला : हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh) राज्यात मोठी दुर्घटना घडली आहे. शिमल्यामध्ये भूस्खलन झाल्याने शिव मंदिर कोसळून 9 जणांचा मृत्यू झाला आहे. शिमल्याच्या समरहिल येथील बाळूगंजच्या शिव बावडी मंदिराजवळ दरड कोसळल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे शिवमंदिर दरडीखाली गाडलं गेलं. दरडीखाली 20 ते 25 जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या दुर्घटनेत नऊ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. आज सोमवार असल्याने शिव मंदिरात मोठ्या प्रमाणात शिवभक्तांची गर्दी असते. आज सकाळी साडेसातच्या सुमारास ही दुर्घटना घडली. येथे सध्या बचावकार्य सुरू आहे.

शिमलातील शिव मंदिर कोसळून 9 जणांचा मृत्यू

हिमाचलचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी ट्विट करून या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुखू यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत आतापर्यंत नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. ढिगाऱ्याखालून नऊ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे. श्रावणी सोमवार असल्याने मोठ्या संख्येने भाविक मंदिरात पोहोचले होते. दुसरीकडे, शिमल्याच्या लाल कोठीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकल्याची भीती

शिमलाचे एसपी संजीव कुमार गांधी यांनी सांगितलं की, भूस्खलनात एक शिव मंदिर कोसळलं. त्यामुळे आजूबाजूच्या इमारतींनाही धोका निर्माण झाला आहे. अनेक लोक अडकले आहेत. शिव मंदिराच्या ठिकाणी ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहेत. परिसरात बचावकार्य सुरू आहे.

Continue Reading
Advertisement
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *