शाहीनबागेतील आंदोलनकर्त्यांचे मोदींना ‘व्हॅलेंटाईन डे’चे आमंत्रण

0
39


नवी दिल्ली : ‘सीएए’विरोधात शाहीनबाग येथे आंदोलन करणा-यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आंदोलनकर्त्यांसोबत ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा करावा, असे आमंत्रण दिले. सुधारित नागरिकत्व कायदा(सीएए)आणि प्रस्तावित एनआरसी मागे घेण्याच्या मागणीसाठी गेल्या वर्षी १५ डिसेंबरपासून हे आंदोलन शाहीनबाग येथे सुरू आहे.

या पार्श्वभूमीवर आंदोलनस्थळी पोस्टर्स लावण्यात आले असून सोशल मीडियावरही हे पोस्टर्स प्रसिद्ध करण्यात आले आहे. ‘पंतप्रधान मोदी, कृपया शाहीन बागेत या, तुमचे गिफ्ट घ्या आणि आमच्याशी बोला’, असे वाक्य या पोस्टरवर लिहिले आहे.

शाहीन बागेतील आंदोलनकर्ता तासीर अहमद म्हणाला की, पंतप्रधान मोदी असो वा गृहमंत्री अमित शाह किंवा इतर कोणी, येथे येऊन आमच्याशी बोलू शकतात. जर ते आम्हाला समजावून सांगतीले की जे घडत आहे ते घटनेच्या विरोधात नाही तर आम्ही हे आंदोलन मागे घेऊ. तो म्हणाला की, सरकारच्या दाव्यानुसार सीएए एखाद्याचे नागरिकत्व देतही नाही आणि घेतही नाही. पण ते देशासाठी कसे उपयुक्त ठरेल हे कोणी सांगत नाही.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नागरिकत्व दुरस्ती कायद्याबद्दल कुणाला शंका असल्यास त्यांनी आम्हाला भेटून त्यावर चर्चा करावी, असे आवाहन केले आहे. मात्र या आंदोलनावर अद्याप तोडला निघू शकलेला नाही.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here