×

वेस्ट इंडिजहून परतताच अजिंक्य रहाणेचा धक्कादायक निर्णय, ‘या’ महत्त्वाच्या स्पर्धेतून माघारी घेतले नाव

वेस्ट इंडिजहून परतताच अजिंक्य रहाणेचा धक्कादायक निर्णय, ‘या’ महत्त्वाच्या स्पर्धेतून माघारी घेतले नाव

[ad_1]

क्रिकेटविश्वातून मोठी बातमी समोर येत आहे. भारतीय संघाचा अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे याने मोठा निर्णय घेत सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. रहाणे जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याद्वारे जवळपास 18 महिन्यांनंतर संघात परतला होता. या सामन्याच्या दोन्ही डावात त्याने लाजवाब प्रदर्शन केले होते. मात्र, सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर वेस्ट इंडिज दौऱ्यावरील 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतही रहाणेची बॅट तळपली नव्हती. त्याला फक्त दोन्ही डावात मिळून 11 धावा करता आल्या होत्या. अशात त्याने घेतलेल्या निर्णयाची चर्चा रंगली आहे.

रहाणेचा महत्त्वाच्या स्पर्धेत खेळण्यास नकार
वेस्ट इंडिज दौऱ्यातून परतल्यानंतर अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) याने मोठा निर्णय घेतला. रहाणेने इंग्लंडचा काऊंटी क्लब लीसेस्टरशायर (Leicestershire) संघाकडून वनडे कपमध्ये खेळण्यास नकार दिला आहे. अनुभवी फलंदाजाने क्लबला आपल्या निर्णयाबाबत सांगितले आहे. त्याने या निर्णयात क्रिकेटमधून छोटा ब्रेक घेण्याचा उल्लेख केला आहे.

इंग्लंडच्या देशांतर्गत 50 षटकांच्या स्पर्धेला ऑगस्ट महिन्यात सुरुवात होऊन ही स्पर्धा सप्टेंबर महिन्यापर्यंत चालणार आहे. रॉयल लंडन वनडे कप स्पर्धेत लीसेस्टरशायर संघाला 5 ऑगस्ट रोजी ब गटात पहिला सामना केंट संघाविरुद्ध खेळायचा आहे. रहाणेच्या या ब्रेकबद्दल क्लबकडूनही एक निवेदन जारी करण्यात आले आहे.

‘आम्ही रहाणेच्या या निर्णयाचा सन्मान करतो’
लीसेस्टरशायर क्लबकडून रहाणेच्या या निर्णयाबाबत एक निवेदन जारी करण्यात आले आहे. यामध्ये क्लबच्या संचालकांनी म्हटले आहे की, “आम्ही रहाणेची स्थिती समजतो आणि मागील काही महिन्यांतील त्याचे वेळापत्रक खूपच व्यस्त राहिले आहे. आम्ही त्याच्या कुटुंबासोबत वेळ घालवण्याच्या निर्णयाचा पूर्णपणे सन्मान करतो.”

अशात रहाणे संघातून बाहेर पडल्यामुळे त्याच्या जागी दुसऱ्या खेळाडूची वर्णी लागली आहे. क्लबने आगामी स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियाचा खेळाडू पीटर हँड्सकॉम्ब याला संघाचा भाग बनवले आहे. (cricketer ajinkya rahane takes break from cricket and not play for this team in one day cup know here)

[ad_2]

Post Comment