वीज ग्राहकांना बेस्टचा ‘शॉक’

0
38


वीज दरात २ ते ५ टक्क्य़ांनी होणार वाढ, १ एप्रिलपासून दरवाढीचा झटका

मुंबई : महागाईच्या आगीत होरपळून निघणा-या मुंबईकरांना लवकरच बेस्ट वीज दरवाढीचा झटका बसणार आहे. वीजनिर्मिती आणि विद्युत विभागाच्या खर्चात वाढ झाल्याने वीज ग्राहकांवर वीज दरवाढीचा बोजा पडणार आहे. वीज दरात २ ते ५ टक्क्य़ांनी वाढ करण्याचे बेस्ट विद्युत विभागाने प्रस्ताविले असून, महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाच्या आदेशानंतर १ एप्रिलपासून नवीन वीज दरवाढ लागू होणार आहे. दरम्यान, बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन (बेस्ट) उपक्रमाकडून करण्यात येणा-या वीज दरवाढीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विरोध केला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या प्रकरणी विद्युत नियामक आयोगाला पत्र दिले आहे, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

बेस्ट उपक्रमाच्या विद्युत विभागाकडे २ लाख व्यावसायिक आणि ८ लाख निवासी ग्राहक आहेत. वीज ग्राहकांना वीजपुरवठा करण्यासाठी बेस्ट टाटा पॉवरकडून ९०० मेगावॉट वीज खरेदी करते. मात्र, वीज खरेदी ट्रान्समिशन खर्चात वाढ झाली आहे. तसेच विद्युत विभागाच्या खर्चातही वाढ झाल्याने वीज दरात २ ते ५ टक्क्य़ांनी वाढ करण्याचा प्रस्ताव एमएमआरसीकडे सादर केल्याचे बेस्ट उपक्रमातील वरिष्ठ अधिका-याने सांगतिले.

दरम्यान, एमएमआरसीने वीज दरवाढीला परवानगी दिल्यास, १ एप्रिलपासून वीज ग्राहकांना बेस्टचा शॉक सहन करावा लागणार आहे, तर बेस्ट उपक्रमाने २ ते ५ टक्के दरवाढीचा प्रस्ताव एमएमआरसीकडे सादर केला असला, तरी किती दरवाढ द्यायची, याचा निर्णय एमएमआरसीच घेणार असल्याचेही अधिका-याने सांगतले. दरम्यान, सुरळीत व अखंडित वीजपुरवठा करणारा विद्युत विभाग अशी बेस्ट उपक्रमाची जगभरात ओळख आहे. मुंबई शहरात पुरवठा करणा-या बेस्ट विद्युत विभागाची वीज अन्य वीजपुरवठा करणा-या कंपन्यांच्या तुलनेत कमी असल्याचा दावा बेस्ट उपक्रमाच्या विद्युत विभागातील अधिका-याने केला आहे.

वीज ग्राहक निवासी व व्यावसायिक

>> ० ते १०० युनिट

सध्याचे दर            वाढीव दर

२ रुपये ९३ पैसे       ३ रुपये ८ पैसे

>> १०१ ते ३०० युनिट

सध्याचे दर              वाढीव दर

५ रुपये १८ पैसे        ५ रुपये ४४ पैसे

>> ३०१ ते ५०० युनिट

सध्याचे दर               वाढीव दर

७ रुपये ७९ पैसे        ८ रुपये १८ पैसे

>> ५०१ ते १००० युनिट

सध्याचे दर               वाढीव दर

९ रुपये २ पैसे           ९ रुपये ६६ पैसेSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here