राज्यातील शाळांमध्येही आता वाजणार ‘वॉटर बेल’

0
56


मुंबई : शालेय विद्यार्थ्यांना पाणी पिण्याची आठवण करून देण्यासाठी काही शाळांमध्ये ‘वॉटर बेल’ वाजवली जाते. ही बेल वाजल्यानंतर विद्यार्थी पाणी पितात, त्यातून त्यांना पाणी पिण्याची सवय लागत असल्याचे वॉटर बेल संकल्पना राबवणा-या शाळांच्या माध्यमातून समोर आले आहे. त्यामुळे आता राज्यातील सर्वच शाळांमध्ये ‘वॉटर बेल’ संकल्पना राबवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार शालेय शिक्षण विभागाकडून राज्यातील सर्व शाळांसाठी तसा शासन आदेश काढण्यात आला आहे. त्याचबरोबर याबाबत शिक्षण आयुक्तांनी सर्व शाळांकडून अहवाल मागवून घ्यावेत, अशी सूचनाही केली आहे.

वॉटर बेल या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पाणी पिण्याची आठवण करून देण्यासाठी घंटा वाजवली जाणार आहे. शाळेच्या वेळापत्रकात तीन वेळा अशाप्रकारे घंटा वाजवण्यासाठी मुख्याध्यापकांनी आपल्या शाळेमध्ये वेळ निश्चित करावी, असेही या आदेशात म्हटले आहे.

पाणी पिण्यासाठी राखून ठेवलेल्या वेळेमध्ये मुलांना आवश्यकतेनुसार पाणी पिता येईल. त्यासाठीची मानसिकता तयार होईल. पाणी पिण्याची सवय होईल, यासाठीची काळजी घ्यावी, असे आदेशही शालेय शिक्षण विभागाने शाळांना दिले आहेत.

मुलांच्या शरीरात पाण्याची खूप मोठी कमतरता असते. त्यामुळे अनेक आजारांना त्यांना सामोरे जावे लागते. शरीरात आवश्यक तेवढे पाणी न गेल्यामुळे मुलांना अनेक प्रकारचे आजार होण्याचा धोका असतो. त्यामुळे मुलांनी दररोज सर्वसाधारणपणे दीड ते दोन लिटर पाणी पिणे आवश्यक असते; परंतु मुले पाणी पीत नाहीत, अशी तक्रार पालकांकडून केली जाते. घरून भरून आणलेली पाण्याची बॉटल मुले तसेच घरी परत आणतात. पाणी कमी पिल्यामुळे थकवा येणे, मुतखडा, चिडचिडेपणा वाढणे आधी त्रास होण्याची शक्यता असते. यामुळे हा उपक्रम शालेय शिक्षण विभागाकडून राबवला जात असल्याचे शिक्षण विभागाने म्हटले आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here