राजाभाऊ देसाई चषक कबड्डीत रत्नागिरीचाच बोलबाला

0
33


अंतिम फेरीत मुंबईवर विजय

मुंबई : रत्नागिरीचा पुरुष कबड्डी संघ चांगलाच फॉर्मात आहे. चिपळूण येथे झालेल्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेनंतर सातत्य राखताना रत्नागिरीने बलाढय़ मुंबईवर ३७-३२ असा विजय मिळवत स्वामी समर्थ आयोजित राजाभाऊ देसाई चषकावर नाव कोरले.

समर्थ क्रीडा मंडळ आयोजितप्रभादेवी येथे झालेल्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत मुंबई संघ राज्य अजिंक्यपद स्पर्धेतील पराभवाची परतफेड करेल, असे वाटले. मात्र मुंबईला मोक्याच्या क्षणी खेळ उंचावता आला नाही. वेगवान चढायांबरोबर अप्रतिम पकडी करणारा रत्नागिरीचा रोहन गमरे याने सर्वोत्कृष्ट खेळाडूचा मान मिळवला. त्याला बक्षीस म्हणून ‘पॅशन प्रो’ बाईक देऊन गौरविण्यात आले. सर्वोत्कृष्ट चढाईपटूचा पुरस्कार मुंबईच्या अजिंक्य कापरेला मिळाला. सर्वोत्कृष्ट पकडीसाठी पुरस्कार रत्नागिरीचा शुभम शिंदेने मिळवला.

जर्नादन राणे क्रीडानगरीत अंतिम सामन्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद लाभला. रंगतदार ‘फायनल’मध्ये शेवटची सात मिनिटे निर्णायक ठरली. त्यावेळी रत्नागिरीकडे २९-२६ अशी आघाडी होती. चढाई बदली खेळाडू म्हणून आत आलेल्या ओंकार गुरवने चढाईत मिळवलेले दोन गुण त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरले. रत्नागिरीने अजिंक्य कापरेची पकड करून मुंबईवर लोण चढवत आघाडी ३३-२६ अशी वाढवली आणि सामन्यावरही पकड मजबूत केली. त्यानंतर मुंबईच्या ओंकार जाधव, अजिंक्य कापरेने मुंबईला गुण मिळवून देण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. परंतु, प्रतिस्पध्र्याचे अभेद्य क्षेत्ररक्षण भेदण्यात त्यांना अपयश आले. दुसरीकडे, निर्णायक आघाडी असल्याने रत्नागिरीने सावध पवित्रा घेतला. दुस-या सत्रात खेळ ढेपाळला तरी मुंबईकडे मध्यंतराला १९-१७ अशी आघाडी होती.

उपांत्य फेरीत रत्नागिरीने रायगडचा ३२-२४ असा पराभव केला. रत्नागिरीच्या विजयात रोहन गमरे, अजिंक्य पवार आणि शुभम शिंदे हीरो ठरले. मुंबई शहरने ठाण्याची ५०-२३अशी धूळधाण उडवली. चार दिवस रंगलेल्या या दिमाखदार कबड्डी महोत्सवाचा बक्षीस वितरण सोहळा माजी राज्यमंत्री सचिन अहिर, मंडळाचे अध्यक्ष रामदास गावकर, प्रमुख कार्यवाह महेश सावंत, निशिकांत शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडला.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here