‘म्होरक्या’ २४ जानेवारीला होणार प्रदर्शित

0
48


६५ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट बालचित्रपटाचा पुरस्कार मिळालेला ‘म्होरक्या’ चित्रपट २४ जानेवारी २०२० रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. स्वस्तिक प्रीती फिल्म प्रोडक्शन निर्मित आणि ‘ऐसपैस’ची प्रस्तुती असलेला हा सिनेमा भारताबरोबरच परदेशातही प्रदर्शित होणार आहे. अमर देवकर यांचा लेखक व दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच चित्रपट आहे.

राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट बालचित्रपटासह रमण देवकर आणि यशराज कऱ्हाडे यांना अभिनयासाठी विशेष उल्लेखनीय कामगिरीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. प्रजासत्ताक दिनाला शाळेत होणा-या परेडचे नेतृत्व करण्यास मिळावे यासाठी संघर्ष करणा-या एका चौदा वर्षाच्या मुलाची कथा म्होरक्यामध्ये सांगितली आहे.

मात्र ही केवळ परेड शिकणा-या एका लहान मुलाची गोष्ट नाही, तर खरे म्हणजे ही जगाची, इतिहासाची, आपल्या भोवतालातल्या प्रत्येकाची गोष्ट आहे. चित्रपटाचे पोस्टर समाजमाध्यमांवर चर्चेचा विषय ठरत आहे. आनंद शिंदेच्या आवाजातील ‘म्होरक्या’ गाणे चांगलेच गाजत आहे. यात पहिल्यांदाच आनंद शिंदेनी मराठीत रॅप गायले आहे. हा या चित्रपटाचा ‘यूएसपी’ ठरू शकतो.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here