मुंबई गारठणार, पारा आणखी खाली जाणार

0
48


मुंबईकरांना शेकोटीचा आधार

मुंबई : देशाच्या उत्तरेकडे असणारी थंडीची लाट काही केल्या कमी होत नाही आहे. त्यातच आता मुंबईतही हिवाळा चांगलाच जोर पकडत आहे. हवामान खात्याकडून नुकत्याच देण्यात आलेल्या इशा-यानुसार गुरुवारची रात्र ही यंदाच्या मोसमातील सर्वाधिक थंड रात्र होती. दरम्यान, यंदा रेकार्ड ब्रेक थंडी पडल्याने स्वेटर, कानटोप्या खरेदीसाठी मुंबईकरांची बाजारात गर्दी पाहावयास मिळत आहे.

तापमान कमी होत असल्यामुळे आणि सोसाटय़ाचा वारा असल्यामुळे थंडी जास्त वाढण्याची चिन्हे स्पष्ट आहेत. हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार रात्रीच्या वेळी तापमान आणखी खाली घसरणार असून, हा आकडा १४ ते १५ अंश सेल्शिअसपर्यंत जाईल.

वाहत्या वा-याचे प्रमाण जास्त असल्यामुळे त्यामुळे गारवा वाढलेला असेल. शुक्रवारी सकाळपर्यंत हा गारठा कायम राहणार आहे. मुंबईत अचानक वाढणारी थंडी पाहता, हवामान खात्याकडून शहरातील नागरिकांसाठी काही सल्ले दिले आहेत. सकाळच्या वेळी मुंबईत मॉर्निग वॉकसाठी बाहेर पडणा-यांनी यावेळी जास्त काळजी घेण्याचे सांगण्यात आले आहे. मुळात मॉर्निग वॉकला जाणे टाळा, असेही सांगितले गेले आहे. सोबतच ज्येष्ठ नागरिकांनीही या परिस्थितीमध्ये काळजी घेण्याचा सल्ला हवामान खात्याने दिला आहे.

दरम्यान, मुंबईत पारा खाली येत असून, मुंबईकर गारठले आहेत. यंदाच्या मोसमातील ही सर्वाधिक थंडी असून स्वेटर घालण्याची वेळ मुंबईकरांवर आली आहे. तर रात्रीच्या वेळी मुंबईत ठिकठिकाणी शेकोटी पेटलेली दिसून येत आहे. तर बाजारात स्वेटर विक्रीचा धंदा तेजीत सुरू झाला आहे. स्वेटर बरोबर कानटोप्या, हात मोजे खरेदीसाठी मुंबईकर बाजारात गर्दी करत आहेत. मुंबईत इतकी थंडी पडेल, याची कल्पना मुंबईकरांना नव्हती. त्यामुळे स्वेटर खरेदीसाठी लहानांपासून मोठय़ांपर्यंत बाजारात गर्दी करत आहेत. त्यात हवामान विभागाने पुढील काही दिवस थंडी अशीच राहील, असा इशारा दिला आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here