मुंबईकरांची धावाधाव!

0
50


मुंबई : टाटा मुंबई मॅरेथॉनच्या १७व्या आवृत्तीच्या निमित्ताने आज, रविवारी (१९ जानेवारी) राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील अव्वल धावपटूंसह हौशी मुंबईकर धावतील.

५५ हजार धावपटूंचा समावेश
मुंबई मॅरेथॉन ही वर्ल्ड अ‍ॅथलीट्स गोल्ड लेबल रोड रेस आहे. यंदा या स्पर्धेत तब्बल ५५ हजार धावपटू सहभागी होणार आहेत. त्यात पूर्ण मॅरेथॉन गटात ९,६६०, अर्ध मॅरेथॉनमध्ये १५,२६०, १० किमी धावणे प्रकारात ८,०३२, ड्रीम रन गटात १९,७०७, वरिष्ठ नागरिक गटात १०२२ तसेच अपंग गटात १५९६ धावपटू असतील.

केनिया, इथियोपियाचे धावपटू केंद्रस्थानी
एलिट मॅरेथॉनमध्ये केनिया आणि इथियोपियाचे अ‍ॅथलीट केंद्रस्थानी आहेत. गतविजेता केनियाचा कॉसमॅस लॅगट आणि गतविजेती इथियोपियाची वोर्कनेश अलेमू यंदाच्या टाटा मुंबई मॅरेथॉनमध्ये बाजी मारतानाच सलग दुस-या जेतेपदासाठी उत्सुक आहेत.

सुधा सिंग, बुगाथावर भारताची भिस्त
भारतातर्फे महिला आणि पुरुषांच्या गटात गतविजेती सुधा सिंग तसेच लष्कराचा श्रीनू बुगाथावर भारताची भिस्त आहे. या दोघांसह ज्योती गवते आणि रशपाल सिंगच्या कामगिरीवर सर्वाच्या नजरा असतील.

सुधा सिंगला सातत्य राखताना ‘हॅट्ट्रिक’ नोंदवण्याची अनोखी संधी आहे. बिजेंद्र सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करणारी सुधा सिंग दोन महिन्यांच्या ‘ब्रेक’नंतर पुनरागमन करत आहे. ‘‘टाटा मुंबई मॅरेथॉनमुळे मला भविष्यातील स्पर्धाकरिता मला मानसिकदृष्टय़ा सक्षम बनण्यात मदत मिळते. यावेळचे वातावरण चांगल्या कामगिरीसाठी पोषक आहे,’’ असे सुधा सिंग म्हणाली.
आंध्र प्रदेशचा श्रीनू बुगाथा यंदा विक्रमी कामगिरीसाठी उत्सुक आहे. त्याने २ तास १६ मिनिटे हा भारतीयांतर्फे रचलेला स्पर्धा विक्रम मोडण्याचे लक्ष्य ठेवले आहे. बुगाथाला यंदा प्रोकॅमने दोन अनुभवी पेसर्स उपलब्ध करून दिले आहेत.

एलिट गटात भारतातर्फे राहुल पाल, शेर सिंग, प्रदीप सिंग चौधरी तसेच महिला गटात श्यामली सिंग, दिव्यांका चौधरी, जिगमेट डोलमा हेही धावपटू सहभागी आहेत.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here