Connect with us

मनोरंजन

‘मी बहिरी नाही…’, पुन्हा एकदा पापाराझींवर संतापल्या Jaya Bachchan व्हिडीओ व्हायरल

Published

on

[ad_1]

Jaya Bachchan Trolled : बॉलिवूड अभिनेत्री जया बच्चन या सध्या त्यांच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. त्यांचा हा चित्रपट 28 जुलै रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. नुकताच जया बच्चन या त्यांच्या मुलांसोबत चित्रपटाच्या प्रीमीयरसाठी पोहोचल्या होत्या. त्यावेळी त्यांचा जो रागिट स्वभाव आहे तो सगळ्यांना पाहायला मिळाला आणि त्यानं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. त्याचा एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी त्यावर त्यांच्या प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत.

जया बच्चन यांचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओत जया बच्चन यांनी लाल रंगाचा सुंदर ड्रेस परिधान केल्याचे पाहायला मिळत आहे. जया बच्चन यांच्यासोबत यावेळी त्यांची दोन्ही मुलं म्हणजेच श्वेता बच्चन आणि अभिषेक बच्चन दिसले. व्हिडीओच्या सुरुवातीला जया बच्चन या पापाराझींसमोर येऊन थांबलेल्या दिसतात. अशात पापाराझी जया बच्चन यांना मागून फोटोसाठी ओरडताना दिसत आहे. जया जी, जया जी असे हे पापाराझी बोलताना दिसत आहेत. त्याचवेळी जया बच्चन या मागे वळून पाहतात आणि “मला ऐकू येतं. मी बहिरी नाही. थोडं हळू बोला’, असे रागात बोलतात. त्यानंतर श्वेता आणि अभिषेक हे दोघे येतात आणि ते येताच जया बच्चन या निघून जातात.

जया बच्चन यांचा हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केलं आहे. एक नेटकरी म्हणाला, या स्त्रीला काहीच वाटत नाही, तिला पापाराझींची थोडी देखील इज्जत करता येत नाही. दुसरा नेटकरी म्हणाला, ती शाळेतच्या मुख्याध्यापकांसाठी सगळ्यांवर ओरडते. तिसरा नेटकरी म्हणाला की, ही शाळेतल्या हिंदीच्या शिक्षिकांसारखी ओरडताना दिसते. आणखी एक नेटकरी म्हणाला, मला कोणत्याही खलनायकाची भूमिका साकारण्याची गरज नाही. कारण मी आधीच एक खडूस खलनायिका आहे. दुसरा नेटकरी म्हणाला, म्हणून आम्हाला रेखा आवडते. हसत मूख कधीच कोणावर रागवत नाही. शांत स्वभाव.’

हेही वाचा : TARKARLI BEACH – तारकर्ली मध्ये करण्यासारख्या १५ गोष्टी

दरम्यान, या आधी जया बच्चन या चर्चेत येण्याचं कारण ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटातील गाणं होतं. त्यात जया बच्चन यांचे खूप रागिट एक्सप्रेशन पाहायला मिळाले. त्यानंतर सोशल मीडियावर मीम्सचा वर्षावर झाला. नेटकऱ्यांनी जया बच्चन यांची चांगलीच खिल्ली उडवली होती. दरम्यान, ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ चित्रपटाविषयी बोलायचे झाले. तर चित्रपटात रणवीर सिंग, आलिया भट्ट महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. तर त्यांच्याशिवाय धर्मेंद्र आणि शबाना आझमी देखील दिसणार आहेत. करण जोहरनं या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.

[ad_2]

Continue Reading
Advertisement
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *