महिन्याचा पगार ७ हजार; आयटीने मागितला १३४ कोटींचा हिशोब

0
18


भोपाळ: महिन्याला केवळ सात हजार रुपये कमावणाऱ्या एका तरुणाला आयकर विभागाने नोटीस बजावून १३४ कोटी रुपयांचा हिशोब मागितल्याची धक्कादायक बाब भोपाळ येथे उघडकीस आली आहे. अचानक आलेल्या या नोटीसमुळे हा तरुण मात्र पुरता चक्रावून गेला आहे.

रवि गुप्ता असं या तरुणाचं नाव आहे. तो भिंडच्या मोहाना येथील रहिवासी आहे. आयकर विभागाच्या एका अधिकाऱ्याच्या माहितीनुसार सप्टेंबर २०११ ते १३ फेब्रुवारी २०१२ दरम्यान मुंबईतील एका खासगी बँकेच्या शाखेतून कंपनीच्या खात्यात १३४ कोटी रुपयांची देव-घेव झाली. पॅन कार्ड त्याच्याशीच संबंधित जोडलेलं आहे. त्यामुळे गुप्ता तक्रार दाखल करून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करू शकतात.

रविने त्याच्या फर्ममध्ये या प्रकरणाची चौकशी सुरू केली असता ज्या कंपनीतून बँकेशी एवढा मोठा व्यवहार करण्यात आला, ती कंपनी मेहुल चोक्सी आणि नीरव मोदीच्या ऑफिसजवळच असल्याची आढळून आली. गुजरातच्या एका डायमंड ट्रेडिंग कंपनीने हा व्यवहार केल्याचं गुप्ता यांनी सांगितलं. मी २१ वर्षाचा असेल त्यावेळी हा व्यवहार झाला. विशेष म्हणजे २०११ ते २०१२ दरम्यान मी मुंबईतही नव्हतो आणि गुजरातमध्येही नव्हतो. त्यावेळी मी एका प्रायव्हेट फर्ममध्ये कामाला होतो आणि मला केवळ सात हजार रुपये पगार मिळत होता. ही रक्कम कर मुक्त होती, असं सांगतानाच मध्यप्रदेशातील सायबर सेल, महाराष्ट्र पोलीस, पीएमओ आणि आयटीच्या अधिकाऱ्यांना पत्र लिहून टॅक्स रिकव्हरीतून मुक्त करण्याची विनंती करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.

पॅन-आधार कार्ड लिंक करण्यास मुदतवाढ

३० मार्च २०१९ रोजी रवि यांना पहिली नोटीस मिळाली. त्यात २०११-१२ दरम्यान त्यांचा आयकर योग्य असल्याचं म्हटलं आहे. मात्र या नोटीसीकडे मी दुर्लक्ष केलं. कारण माझं उत्पन्नच त्यावेळी कर पात्र नव्हतं. त्यानंतर जुलैमध्ये मला दुसरी नोटीस मिळाली. त्यामुळे सुट्टी घेऊन मी माझीच चौकशी सुरू केली. याप्रकरणाची सर्व माहिती जमा करण्यासही मी सुरुवात केली, असं सांगताना आयकर विभागाने मला माझी संपत्ती जप्त करण्याची धमकी दिली आहे, असं त्यांनी सांगितलं. बनावट पॅनकार्ड आणि बनावट सहीद्वारेच माझी फसवणूक करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं.

३१ डिसेंबरपूर्वी ITR रिटर्न फायलिंगआधी हे वाचा!

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here