महाराष्ट्रात सिंगल युज प्लॅस्टिकवर १ मे पासून बंदी

0
47


मुंबई : दोन वर्षांपूर्वी राबविण्यात आलेल्या प्लॅस्टिक बंदीचा फज्जा उडाल्याचे स्पष्ट झाले असतानाच आता पुन्हा एकदा राज्यात एकदा वापराच्या (सिंगल युज) प्लॅस्टिकवर बंदी घालण्यासाठी नवी डेडलाईन निश्चित करण्यात आली आहे. महाराष्ट्र दिनी १ मे पासून राज्यात सिंगल युज प्लॅस्टिक वापरावर बंदी घालण्यात येणार आहे. राज्याचे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

महाराष्ट्र प्लॅस्टिकमुक्त करण्यासाठी नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रचार मोहिम आखण्यात येईल. त्याचबरोबर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि जिल्हाधिकारी कार्यालयांकडूनही या संदर्भात त्यांचा प्लॅन मागवून घेण्यात येणार आहे. २० फेब्रुवारीपर्यंत हा प्लॅन राज्य सरकारकडे द्यावा लागणार आहे.

महाराष्ट्र प्लॅस्टिकमुक्त करण्यासाठी राज्यातील स्वयंसेवी संस्था आणि शाळांचेही सहकार्य घेण्यात येईल. या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी सामान्य नागरिकांचा त्यामध्ये सहभाग असणे आवश्यक आहे. शाळा, महाविद्यालये, स्वयंसेवी संस्था, क्लब यांचा यात समावेश केल्यामुळे हे उद्दिष्ट यशस्वी होऊ शकेल, असे आदित्य ठाकरे यांनी या बैठकीत सुचविल्याचे विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here