Connect with us

क्रिडा

मध्ये पुन्हा एकदा वादग्रस्त निर्णय, तुम्हाला काय वाटते बाद की नाबाद?

Published

on

आयपीएलच्या मैदानात शुक्रवारी (१ ऑक्टोबर) कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यात पंजाब किंग्जने पाच विकेट्सने विजय मिळवला आहे. केकेआरने २० षटकांमध्ये १६५ धावा केल्या होत्या आणि पंजाबने प्रत्युत्तरात १९.३ षटकांत त्याचे लक्ष्य गाठले. हा सामना फारच रोमांचक झाला, पण सामन्यात तिसऱ्या पंचांनी दिलेल्या एका निर्णयावर अनेकांनी शंका उपस्थित केली आहे.

सामन्याच्या १९ व्या षटकात राहुल त्रिपाठीने केएल राहुलचा झेल घेतला होता, पण तिसऱ्या पंचांनी त्याला नाबाद करार दिला. त्यानंतर समालोचकांनीही तिसऱ्या पंचांच्या या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले होते.

सामन्याच्या १९ व्या षटकात केएल राहुलने पुल शॉट खेळला आणि चेंडू मिड विकेटकडे गेला. तिथे क्षेत्ररक्षणासाठी उभा असलेल्या राहुल त्रिपाठी पुढे आला आणि चेंडू अप्रतिम प्रकारे झेलला. झेल घेतल्यानंतर केएल राहुल बाद असल्यासारखा वाटत होता. पण तिसऱ्या पंचांनी त्याला नाबाद करार दिला. तिसऱ्या पंचांच्या मते चेंडू झेलताना राहुलचा हात चेंडूच्या खाली नव्हता आणि चेंडूचा जमिनीला स्पर्श झाला होता. यामुळेच त्यांनी केएल राहुल नाबाद असल्याचा निर्णय दिला. जर पंचांनी त्याला बाद करार दिला असता तर सामन्याचे चित्र पालटले असते आणि केकेआर सामन्यात विजय मिळवू शकता असता.

तिसऱ्या पंचांच्या या निर्णयानंतर समालोचन करणारे माजी खेळाडू गौतम गंभीर आणि इरफान पठान हैराण झालेले पाहायला मिळाले. आकाश चोप्रानेही या निर्णयावर प्रश्न उपस्थित केला आहे. गौतम गंभीर आणि इरफान पठानच्या मते केएल राहुल बाद होता आणि आकाश चोप्रानेही याचे समर्थन केले होते. पंचांनी हा निर्णय दिला होता, त्यावेळी सामन्यात पंजाबला १५ धावांची आवश्यकता होती. तसेच नाबाद करार मिळाल्यानंतर राहुलने या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर एक चौकारही मारला होता.

दरम्यान, सामन्यात पंजाब किंग्जचा कर्णधार केएल राहुने ६७ आणि मयंक अगरवालने ४० धावा केल्या. सामन्याच्या अंतिम काही क्षणांमध्ये शाहरुख खानने अवघ्या ९ चेंडूत २२ धावांची महत्वाची खेळी केली. या सामन्यात विजय मिळवल्यानंतर पंजाब किंग्ज प्लेऑफच्या शर्यतीत कायम आहे आणि गुणतालिकेत पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. चेन्नई आणि दिल्ली संघ प्लेऑफसाठी पात्र झाले आहेत. आता तिसऱ्या स्थानासाठी बेंगलोर, पंजाब, कोलकाता आणि मुंबईमध्ये संघर्ष सुरू आहे.

Continue Reading
Advertisement
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *