Connect with us

देश

‘बोका व्हायरस’ म्हणजे नेमकं काय? वाचा यामागची लक्षणं आणि उपचार

Published

on

[ad_1]

Bokavirus : बोकाव्हायरसचा पहिला रुग्ण 2005 मध्ये आढळला होता. बोकाव्हायरसमध्ये टाईप एक, टाइप दोन आणि टाइप चार यांसारखे अनेक प्रकार आहेत. टाइप 1 विषाणू प्रामुख्याने श्वसनमार्गाच्या संसर्गाशी संबंधित आहे. वैद्यकीय उपचार केलेल्या मुलाला टाईप एक विषाणूची बाधा झाली होती. टाईप दोन आणि चार यामध्ये अतिसार, ओटीपोटात दुखणे या लक्षणांसह गॅस्ट्रोएन्टरोलॉजी म्हणजे पोटाच्या विकाराशी संबंधित संसर्ग असल्याचे दिसून आले आहे. हा विषाणू प्रामुख्याने तीन वर्षांखालील मुलांना संक्रमित करतो. खोकला, सर्दी आणि श्वसनमार्गाचे संक्रमण ही लक्षणे दिसून येतात.

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

बोका व्हायरस कशामुळे होतो?
बोका व्हायरस हा प्रामुख्याने लहान मुलांमध्ये आढळून येतो. हिवाळ्यामध्ये या व्हायरसचा संसर्ग होण्याचा मोठा धोका असतो. बोका व्हायरसमध्ये टाईप 1, टाईप 2, आणि टाईप 4 सारखे अनेक प्रकार आहेत.
या संसर्गाला बोकाव्हायरस का म्हणतात?
बोकाव्हायरस हा एक नवीन विषाणूजन्य वंश आहे जो 2005 मध्ये तीव्र आजारी मुलांपासून वरच्या श्वसनमार्गामध्ये सापडला होता. बोकाव्हायरस हे नाव बोवाइन पार्व्होव्हायरस आणि कॅनाइन मिनिटव्हायरस या नावांच्या संयोगाने झाले. ज्यामध्ये बोकाव्हायरस काही अनुवांशिक आणि संरचनात्मक वैशिष्ट्ये आढळून येतात.
बोका व्हायरस किती काळ टिकतो?
बोका व्हायरसची लक्षणे सहसा 1-2 आठवडे टिकतात. परंतु, कधीकधी दीर्घकाळापर्यंत असू शकतात. महत्त्वाचे म्हणजे, HBoV हे ILI आणि न्यूमोनियाच्या लक्षणांच्या संयोगाने आढळून आले आहे.
बोकाव्हायरस गंभीर आहे का?
जरी बहुतेक प्रकरणे सौम्य आहेत. परंतु, गंभीर श्वसन रोगाचा देखील त्रास यामध्ये नोंदवला गेला आहेत. त्यामुळे हा आजार गंभीर आहे.
बोकाव्हायरस संसर्ग कसा पसरतो?
बोकाव्हायरस हा नवीन सापडलेला विषाणू असल्यामुळे यावर अजून संशोधन सुरु आहे. हा विषाणू श्वसनमार्गामध्ये आणि काही रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांच्या श्वासोच्छवासाच्या स्रावांमध्ये मोठ्या संख्येने आढळून येतो. बोकाव्हायरस मुख्यतः श्वासोच्छवासाच्या स्रावाने इतर मानवांमध्ये पसरतो. तथापि, हे मल (अतिसार) आणि रक्तामध्ये देखील आढळू शकते, म्हणून हे विषाणू पसरण्याचे पर्यायी मार्ग असू शकतात.
बोका विषाणूचा उपचार कसा केला जातो?
मानवी बोकाव्हायरसवर परिणाम करणारे कोणतेही अँटीव्हायरल औषध सद्य स्थितीत उपलब्ध नाही. त्यामुळे लक्षणात्मक काळजी हा उपचाराचा मुख्य आधार आहे.
प्रौढांना बोका व्हायरस होऊ शकतो?
3 अभ्यासांमध्ये, मानवी बोकाव्हायरस 126 पैकी 1 (0.8%), 202 पैकी 3 (1.5%), आणि श्वसनमार्गाच्या संसर्गासह 3.1% प्रौढांमध्ये श्वसन स्रावांमध्ये पीसीआरद्वारे आढळले. बोकाव्हायरस-संबंधित न्यूमोनियासह रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या पाच प्रौढांना हा संसर्ग आढळून आला.

[ad_2]