फलंदाजीचे पुन्हा तीनतेरा

0
41


पृथ्वीसह शुबमन, साहा, अश्विन शून्यावर बाद, विहारी (१०१), पुजारामुळे २६३ धावांची मजल

हॅमिल्टन : मध्यमगती गोलंदाज स्कॉट कुगेलिनसह फिरकीपटू ईश सोढीच्या (प्रत्येकी ३ विकेट) अचूक मा-यासमोर भारताची आघाडी फळी कोसळली. पृथ्वी शॉसह शुबमन गिल, वृद्धिमान साहा आणि अश्विनला खातेही खोलता आले नाही. मात्र मधल्या फळीतील हनुमा विहारीसह (१०१ धावा) तिस-या क्रमांकावरील चेतेश्वर पुजाराच्या (९३ धावा) दमदार फलंदाजीमुळे न्यूझीलंड अध्यक्षीय संघाविरुद्ध भारताने पहिल्या दिवसअखेर शुक्रवारी पहिल्या डावात २६३ धावांची मजल मारली.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय भारतासाठी चुकीचा ठरला. सलामीवीर पृथ्वी शॉ याला कुगेलिनने पहिल्याच षटकात माघारी धाडले. तो खातेही उघडू शकला नाही. त्यानंतर दुसरा सलामीवीर मयांक अगरवाललाही (१) बाद केले. चौथ्या क्रमांकावरील शुबमन गिल (०) आल्यापावली परतल्याने पाहुण्यांची अवस्था ३ बाद ५ धावा अशी झाली. अनुभवी पुजाराने एक बाजू लावून धरली. मात्र ‘मुंबईकर’ अजिंक्य रहाणेने (१८)निराशा केली.

पुजाराला विहारीची चांगली साथ लाभली. या जोडीने पाचव्या विकेटसाठी १९५ धावांची मोठी भागीदारी करताना भारताला सुस्थितीत आणले. पुजाराचे शतक सात धावांनी हुकले. त्याच्या २११ चेंडूंतील ९३ धावांच्या खेळीत ११ चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे. हनुमाने फलंदाजीचा चांगलाच सराव करताना १८२ चेंडूंत १०१ धावांची दमदार खेळी केली. त्याने त्याच्या शतकी खेळीत १० चौकार आणि तीन षटकार लगावले. भारताचे शेपूट फार न वळवळल्याने ६ बाद २४५ वरून पाहुण्यांचा डाव २६३ धावांमध्ये आटोपला. तळातील वृद्धिमान साहा आणि आर. अश्विन खाते उघडू शकले नाहीत. रिषभ पंतला ७ आणि रवींद्र जडेजाला ८ धावा करता आल्या.

न्यूझीलंडतर्फे स्कॉट कुगेलिन (४०-३) सर्वात यशस्वी ठरला. स्पिनर ईश सोढीने त्याच्या इतक्याच विकेट घेतल्या तरी ७२ धावा दिल्या. मध्यमगती गोलंदाज जेक गिब्सनने (२६-२) अचूक आणि नियंत्रित मारा केला.

भरवशाच्या म्हशीला..
पृथ्वी शॉ (०), शुबमन गिल (०), मयांक अगरवाल (१), रिषभ पंत (७), रवींद्र जडेजा ८), अजिंक्य रहाणे (१८).Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here