पाकिस्तानचा कट पंजाब पोलिसांनी उधळला; एका जवानाला अटक

0
22चंदिगड: पंजाब पोलिसांनी पाकिस्तानचा मोठा कट उधळून लावला आहे. भारत-पाकिस्तान सीमेवरून जीपीएस आधारीत ड्रोनच्या मदतीने अंमली पदार्थ आणि शस्त्रांची तस्करी करण्यात येत होती. या प्रकरणी पोलिसांनी एका जवानासहित तिघांना अटक केली आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून चीनी बनावटीचे दोन ड्रोन. १२ ड्रोन बॅटरी, ड्रोन कंटेनर, इन्सास रायफल काडतूसे, दोन वॉकी-टॉकी सेट, मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थासह सहा लाख २२ हजार रुपये जप्त करण्यात आले असल्याची माहिती पंजाब पोलीस महासंचालक दिनकर गुप्ता यांनी दिली. अमृतसर आणि करनाल येथून दोन ड्रोन जप्त केले असून एका आरोपीचा शोध सुरू असल्याचे गुप्ता यांनी सांगितले.

भारतीय लष्करात नायक हुद्यावर असलेल्या राहुल चौहान या व्यक्तिला अटक करण्यात आली आहे. अंमली पदार्थांच्या तस्करीसह पिस्तूल आणि अन्य छोट्या शस्त्रांची तस्करी ड्रोनने झाली असावी असा पोलिसांना संशय आहे. राहुल चौहान फक्त ड्रोनची खरेदी करण्यापुरता नव्हता तर त्याचा वापर करण्याचे प्रशिक्षण तो देत होता. या प्रकरणात अमृतसरमधील धनोआ कुर्द गावातील धर्मेंद्र सिंग आणि अमृतसर जिल्ह्यातीलच बालकर सिंग यांना अटक करण्यात आली आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here