नेताजी सुभाषचंद्र बोस

0
47


ज्यांच्या सावलीचाही इंग्रजांनी धस्का घेतला होता, अशा नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा आज जन्मदिन. दि. २३ जानेवारी १८९७ रोजी क टक येथे त्यांचा जन्म झाला. बंगालचा हा युवक आय.सी.एस.सारखी सर्वोच्च पदवी घेऊनही, सत्ता-संपत्ती-ऐश्वर्य लाथाडून स्वातंत्र्याच्या आंदोलनात सहभागी झाला. प्रथम देशबंधू चित्तरंजन दास आणि पुढे गांधीजींच्या कार्यात सुभाष मग्न राहिले. काँग्रेसचे ते दोन वेळा अध्यक्ष झाले. दुस-या महायुद्धाचा फायदा घेत, आंतरराष्ट्रीय सहकार्याने भारताच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न गौरवास्पद आहेत.

१९४१ ते ४४ या कालावधीत साक्षात काळाशी टक्कर घेत त्यांनी केलेल्या प्रयत्नांचा आढावा जरी घेतला, तरी भारतीय स्वातंत्र्यलढय़ातील ते एक सुवर्णपान होते, हे ध्यानी येते. स्वातंत्र्यसंग्रामाचे सेनानी, समपर्णशीलतेचे प्रतीक असणा-या नेताजींनी आझाद हिंद सरकार स्थापन केले. भारताच्या स्वातंत्र्यासाठी आझाद हिंद फौज उभारली. ‘दारिद्रय़, अज्ञान आणि अनारोग्य यांच्या उच्चाटनासाठी नियोजन आवश्यक आहे. ते यशस्वी व्हायचे असेल तर लोकसंख्येला आळा घातला पाहिजे’ असे दूरदृष्टीने सांगणारा हा क्रांतिपथकावरील यात्रिक, आपल्या कर्तृत्वाने रणशीलतेचा मानदंड ठरलेल्या नेताजींचा आज जन्मदिन.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here