नागपूर-चंद्रपूर जिल्ह्याच्या वार्षिक योजनांना कात्री

0
43


नागपूर : तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर जिल्ह्यासाठी तर अर्थमंत्री या नात्याने सुधीर मुनगंटीवार यानी चंद्रपूर जिल्ह्याच्या वार्षिक योजनांसाठी भक्कम निधी दिला होता. असे असताना अर्थमंत्री म्हणून अजित पवारांनी या योजनांना, योजनांचा निधीला कात्री लावली आहे. वार्षिक योजनांना नियमाच्या बाहेर जाऊन भक्कम निधी दिल्याचे म्हणत हे असे चालणार नाही, सर्व जिल्ह्यांना ठरलेल्या सुत्राप्रमाणेच निधी दिला जाईल, अशी माहिती पवार यांनी दिली आहे.

वर्ष २०२०-२१ साठी विविध जिल्ह्याच्या वार्षिक योजना तयार करण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरु असून त्याच्याच आढावा पवार यांनी सुरु केला आहे. नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांचा आढावा त्यांनी घेतला. त्यानंतर नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्याच्या वार्षिक योजनेत मागील वर्षाच्या तुलनेत भरीव कपात केली जाणार आहे, असे संकेत त्यांनी दिले आहेत. चालू आर्थिक वर्ष म्हणजेच वर्ष २०१९-२० साठी नागपूर जिल्ह्याची वार्षिक योजना ५२५ कोटी रुपयांची असताना आगामी आर्थिक वर्षासाठी नागपूर जिल्ह्याची वार्षिक योजना फक्त २९९ कोटी रुपयांची असणार आहे, असे अजित पवारांनी सांगितले आहे.

अजित पवारांच्या सूत्रानुसार नागपूर जिल्ह्याला पहिल्याच वर्षात २२६ कोटींचा फटका बसला आहे. तर चंद्रपूर जिल्ह्याची चालू आर्थिक र्वष म्हणजेच २०१९-२०ची वार्षिक योजना ३७५ कोटी रुपयांची होती. मात्र अजित पवारांच्या सूत्रानुसार आता ती फक्त २२३ कोटींची असणार आहे. त्यामुळे सुधीर मुनगंटीवार यांच्य्या चंद्रपूर जिल्ह्याला ही तब्बल १५२ कोटींचा फटका बसणार आहे.

अर्थमंत्री म्हणून कोणत्याही जिल्ह्याला विशेष न्याय आणि इतर जिल्ह्यावर अन्याय असे करून चालणार नाही. नागपूर, चंद्रपूर आणि सिंधुदुर्ग सारख्या जिल्ह्यांना मागील सरकारने दिलेला जास्तीचा निधी लगेच थांबवता आला असता. मात्र आम्हाला सुडाचे राजकारण करायचे नाही, असेही अजित पवारांनी स्पष्ट केले.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here