आरोग्य
दिवाळीत बनवा करिनासारखी फिगर, तिच्या Nutritionist ने दिलेल्या टिप्स जाणून घ्या
Published
11 months agoon
By
KokanshaktiNutritionist : दिवाळी म्हटलं की फटाके, मज्जा मस्ती आलीच पण फराळ देखील त्यात येते. आपण सगळेच दिवाळीत न विचार करता मनसोक्त खातो. आपण फिटनेस सदंर्भातील जे प्लॅन करतो ते प्लॅन सणांच्या काळात पुर्ण होताना दिसत नाहीत. पण जर तुम्ही कलाकारांचे फिटनेस पाहिले तर तुम्हाला या दिवसांमध्ये देखील त्याचं वजन वाढलेलं दिसत नाही. ते नेहमीच फिट राहतात.
आज आपण अशाच एका स्टर्स विषयी जाणून घेणार आहोत जिनं गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडला आपल्या अभिनायने घायाळ केलं आहे. तिचं नाव आहे करिना कपूर खान (Kareena Kapoor Khan). पण तुम्हाला माहितेय का, करिना कपूरला तिच्या फिटनेससाठी नेहमीच ओळखले जाते. करिनाच्या फिटनेसमध्ये तिच्या Nutritionist चा विशेष हातभार आहे. अनेकजण सण म्हटलं की मिठाई (sweets) आलीच. पण अनेकांना मिठाई खायायला अधिक भीती वाटते कारण मिठाई खाल्याने वजन वाढतं असा समज आहे. (Get a figure like Kareena this Diwali learn tips from her nutritionist nz)
तर आज आपल्याला करीना कपूरला फिटनेस टिप्स देणाऱ्या रुजुता दिवेकरनेही दिवाळीनिमित्त चाहत्यांना काही विशेष टिप्स दिल्या आहेत.
1. बहुतांश मिठाईतील सर्वात मोठा घटक असलेले तूप, आतड्यांना सुस्थितीत ठेवण्यास मदत करते आणि दिवाळीच्या वेळी अति खाण्याचा भार सहन करण्यास तयार होते.
2. ही एक अत्यावश्यक चरबी आहे आणि ऋतूंच्या बदलासह हाडे, त्वचा आणि रोगप्रतिकारक शक्तीचे संरक्षण करताना A, E, आणि K सारख्या चरबी-विरघळणारे जीवनसत्त्वे आत्मसात करण्यास मदत करते.
3. साखर किंवा गूळ हे ड्रायफ्रुट्स, तूप, बेसन, मैदा किंवा डिंक किंवा रवा या सर्व पदार्थांमध्ये भरपूर पोषक आणि चविष्ट असतात असे मिसळले तर ते गुणकारी आहे.
4. पॅकबंद मिठाई टाळा कारण त्या अनेकदा कमी दर्जाच्या असतात. घरची मिठाई खा.
रुजुता दिवेकर पुढे सांगतात, ‘दिवाळीत घरी बनवलेल्या मिठाई खाऊन तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. रक्तातील साखरेच्या नियमनातील वास्तविक गेम चेंजर हे खरेतर शेवटचे डिनर आहे, त्यामुळे त्यावर लक्ष ठेवा.
(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. दैनंदिन आयुष्यात याचा वापर करायचा झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
You may like
डेटा प्रोटेक्शन विधेयक लोकसभेत मंजूर, विरोधकांनी का केलाय विरोध? एडिटर्स गिल्डने व्यक्त केली चि
लोकसभेत डेटा संरक्षण बिल सादर, उल्लंघन केल्यास कंपन्यांना बसणार 250 कोटीपर्यंत दंड
G-Pay : गूगल पेला आरबीआयची मान्यता नाही?
मार्केटमधील Makeup remover बिघडवताहेत सौंदर्य..हा आहे घरगुती उपाय
फाटलेले ओठ आणताहेत सौंदर्यात बाधा. रोज वापरा या टिप्स
अजय देवगणच्या लेकीचा ग्लँमरस लुक, ‘तो’ VIDEO आला समोर