दिल्ली विधानसभेसाठी आज मतदान

0
44


नवी दिल्ली : दिल्ली विधानसभेसाठी शनिवार, दि. ८ फेब्रुवारी मतदान होत असून यासाठी निवडणूक आयोगाने जय्यत तयारी केली आहे. दिल्लीत सर्वत्र पोलीस बंदोबस्तही वाढविण्यात आला असून संवेदशनशील मतदान केंद्रावर विशेष दले पाठविण्यात आली आहेत. दिल्लीचा कारभारी आम आदमी पक्ष की भाजप हे ११ तारखेला मतमोजणीनंतर स्पष्ट होईल.

प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सभांचा धडाका लावला होता. एकंदरच भाजपने ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली असताना निवडणूकपूर्व जनमत चाचण्यांचे आकडे मात्र भाजपचा भ्रमनिरास करणारे आहेत. दिल्लीत पुन्हा एकदा ‘आप’चेच वारे वाहत असल्याचा अंदाज या चाचण्यांमधून व्यक्त होत आहे. भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मात्र या अंदाजाला आव्हान देत दिल्लीत भाजपच्याच नेतृत्वाखालील सरकार स्थापन होईल, असा दावा केला आहे.

निवडणुकीच्या आखाडय़ातील चाणक्य म्हणून प्रतिमा निर्माण करणारे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्ली निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी भाजप ७० पैकी ४५ जागा जिंकून सरकार स्थापन करेल असा दावा केला आहे. तरीही भाजप नेत्यांचे चेहरे उतरलेले दिसत आहेत. मोदी-शाह यांनी केलेल्या दाव्यामुळे जनता अरविंद केजरीवाल यांना पुन्हा संधी देणार नाही, असे भाजपातील काही नेत्यांना वाटत आहे.

स्वत: मोदी-शाह तसेच पक्षाच्या अनेक दिग्गज नेत्यांच्या रॅलीमध्ये जमलेली गर्दी, पक्षाचा अंतर्गत सव्‍‌र्हे यातून जनतेचा बदलेला मूड आणि काही ओपिनियन पोलचे निकाल त्यामुळे भाजपला आशेचे किरण दिसत आहेत. भाजप नेत्यांचा असा विश्वास आहे की, गृहमंत्री अमित शाह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मेळाव्यांनी दिल्लीत निवडणुकीचे वातावरण बदलण्याचे काम केले, त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभांनंतर वातावरण भाजपच्या बाजूने दिसायला लागले आहे.

मोदींच्या मेळाव्यापूर्वी झालेल्या सर्व सर्वेक्षणांमध्ये, दिल्लीत आम आदमी पक्ष भाजपाला जोरदार टक्कर देताना दिसत होता. परंतु निकाल आम आदमी पक्षाच्या बाजूने झुकताना दिसले. मात्र, योगी आदित्यनाथ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभांनंतर भाजपा आणि आपमध्ये कडवी झुंज होताना दिसत आहे. यात निकाल आता भाजपाच्या बाजूने झुकताना दिसतात. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या सर्वेक्षणात काँग्रेस ब-याच जागांवर विजयी होताना दिसत आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here