दिग्गज दिग्दर्शकासोबत काम करणे, हाच बोनस!

0
42


सौरभ भावे लिखित आणि दिग्दर्शित गश्मीर महाजनी आणि पूजा सावंत यांची मध्यवर्ती भूमिका असलेला ‘बोनस’ चित्रपट २८ फेब्रुवारी रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे. ‘देऊळबंद’, ‘कान्हा’, ‘वन वे टिकट’ आणि ‘मला काहीच प्रॉब्लेम नाही’ यांसारख्या चित्रपटातून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणारा गश्मीर ‘बोनस’ चित्रपटात वेगळ्याच भूमिकेत पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने त्याच्याशी साधलेला संवाद!

‘बोनस’ चित्रपटाशी कसा जोडला गेलास, असे विचारले असता, ‘‘सिनेमाच्या चित्रीकरणापूर्वी सहा ते आठ महिने आधी सौरभ मला भेटला होता. त्यानंतर आम्ही सिनेमाच्या कथेवर, भूमिकेवर काम करायला सुरुवात केली. सौरभसारख्या दिग्गज दिग्दर्शकासोबत काम करणे, हा माझ्यासाठी खूप मोठा बोनस होता. केवळ दिग्दर्शक म्हणून नव्हे, तर लेखक म्हणूनही सौरभ खूप यशस्वी आहे. त्याच्या कलाकृतींची दखल राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली गेली आहे. स्क्रिप्टबाबत दोघांचे एकमत होत नाही. तसेच तुझ्या शंकांचे निरसन होत नाही, तोपर्यंत भेटत राहू, असे सौरभने मला सांगितले. दिग्दर्शकाने दाखवलेला विश्वास माझ्यासाठी महत्त्वपूर्ण ठरला. माझा हा केवळ सहावा सिनेमा आहे. मात्र, भूमिकेला न्याय देण्याचा मी पुरेपूर प्रयत्न केला आहे.

‘बोनस’मध्ये मी आणि पूजा सावंत पहिल्यांदा एकत्र काम करत आहोत. तिच्यासोबतचा अनुभवही सवरेत्कृष्ट आहे. आमची ऑफस्क्रिन आणि ऑनस्क्रिन चांगली ‘केमिस्ट्री’ जुळली आहे.
सिनेमा ‘मेकिंग’सह सेटवरील अनेक अनुभव गश्मीरने यावेळी ‘शेअर’ केले. ‘‘सेटवर एखादी गोष्ट कळली नाही, तर अभिनेता लगेच दिग्दर्शकाकडे बघतो. मला माहीत होते की, माझ्या दिग्दर्शकाला नक्की काय हवे आहे. त्यामुळे सौरभला अपेक्षित मी अभिनय करण्याचा प्रयत्न केला. ‘कॅप्टन’ म्हणून त्याने दिलेल्या प्रत्येक सूचनेचे मी पालन केले. लेखन आणि दिग्दर्शनादरम्यान प्रत्येक बाबीवर चर्चा होऊन चित्रपट बनल्याने ‘बोनस’कडून खूप अपेक्षा आहेत.’’

‘बोनस’चा नवा ट्रेलर प्रदर्शित
अर्जुन सिंग बरन व कार्तिक डी निशाणदार आणि लायन क्राऊन एंटरटेन्मेंट प्रस्तुत गोविंद उभे, अनुपमा कराळे, कांचन पाटील व जीसिम्स निर्मित ‘बोनस’ या मराठी चित्रपटाचा ट्रेलर मुंबईत एका भव्य समारंभात प्रदर्शित करण्यात आला. ट्रेलर रिलीजवेळी अभिनेता गश्मीर महाजनी, पूजा सावंत, मोहन आगाशे आणि जयवंत वाडकर, दिग्दर्शक सौरभ आर. भावे आणि प्रस्तुतकर्ता तसेच निर्माते उपस्थित होते.

नव्या ट्रेलरने चित्रपटाबद्दलची अधिक माहिती रसिकांना दिली आहे. या चित्रपटाची कथा एका सुखवस्तू कुटुंबातील युवकाभोवती फिरते. तो एका सर्वसामान्य मजुराप्रमाणे एक महिना आयुष्य व्यतीत करण्याचे आपल्या आजोबांचे आव्हान स्वीकारतो आणि त्याचे संपूर्ण आयुष्यच बदलून जाते. ‘छोटय़ा-छोटय़ा गोष्टींमध्ये सुख आहे,’ अशी टॅगलाईन त्याच्या या ट्रेलरवर अवतरते. त्यातून ही कथा पुढे सरकते आणि शेवटी एक सामाजिक संदेश देत संपते. त्या कोळीवाडय़ातच तो त्याच्या प्रेयसीला भेटतो. तिची भूमिका पूजा सावंतने साकारली आहे

‘बोनस’ चित्रपटाची प्रस्तुती जीसिम्सच्या अर्जुन सिंग बरन आणि कार्तिक डी. निशाणदार यांची आहे. जीसिम्सने याआधी ‘मोगरा फुलला’, ‘फुगे’, ‘तुला कळणार नाही’, ‘रणांगण’ या चित्रपटांची निर्मिती केली असून, भिकारी या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here