दत्तात्रय रामचंद्र बेंद्रे

0
39


‘ज्ञानपीठ’ विजेते कन्नड कवी दत्तात्रय रामचंद्र बेंद्रे यांचा आज जन्मदिन. धारवाड येथे दि. ३१ जानेवारी १८९३ रोजी त्यांचा जन्म झाला. मुंबई विद्यापीठातून ते एमए झाले. त्यानंतर काही वर्षे कन्नड व इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केले. १९१६ पासून त्यांनी मराठी, कन्नड व संस्कृतमधून काव्यरचना करण्यास प्रारंभ केला.

१९२२ मध्ये ‘कृष्णकुमारी’ हे त्यांचे पहिले कथाकाव्य प्रसिद्ध झाले. त्यानंतर सुरू झाला अखंड काव्यप्रवास. एकंदर २६ काव्यसंग्रह, ९ ग्रंथ, दोन नाटय़संग्रह ही त्यांची ग्रंथसंपदा. त्यांच्या काव्यसंग्रहांचे जर्मन व अन्य परकीय भाषांतूनही अनुवाद झाले. १९५८ मध्ये त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार लाभला, तर १९७३मध्ये त्यांच्या एकंदर साहित्यिक कारकिर्दीबद्दल ज्ञानपीठासारख्या साहित्य जगतातील सर्वोच्च पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले.

भारत सरकारनेही त्यांना १९६८ मध्ये ‘पद्मश्री’ किताबाने गौरविले. स्वातंत्र्यपूर्व काळातील या सर्वश्रेष्ठ कन्नड कवीने १९५६ ते १९६६ अखेर आकाशवाणीच्या धारवाड केंद्रावर साहित्य सल्लागार म्हणून काम पाहिले. ‘कविता हे सर्व ज्ञानपुष्पांचे अत्तर आहे’ असे म्हणणारा हा कवी कर्नाटकात ‘अंबिका-तनय दत्त’ म्हणून प्रसिद्ध होता. आज त्यांचा जन्मदिन.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here