थॉमस अल्वा एडिसन

0
47


थॉमस अल्वा एडिसन या जगद्विख्यात अमेरिकन संशोधकाचा आज जन्मदिन. हा विश्वप्रसिद्ध वैज्ञानिक दि. ११ फेब्रुवारी १८४७ रोजी जन्माला आला. प्रतिकुल परिस्थितीमुळे फारसे शिक्षण घेता न आलेल्या एडिसनने रसायनशास्त्रातील गोडीमुळे स्वत:ची एक छोटी प्रयोगशाळा सुरू केली. १८७६ मध्ये ‘मेनिली पार्क’ येथे एडिसनने उभारलेल्या या प्रयोगशाळेत तांत्रिक उपकरणांच्या सहाय्याने त्याने अनेक शोध लावले. लहान प्रमाणावर तारायंत्राचा अभ्यास करून त्याने ते सुरू करून पाहिले. हे सर्व प्रयोग करीत असतानाच एक वृत्तपत्रही तो चालवत होता. निरनिराळय़ा संशोधनांतून मिळणा-या पैशाचा उपयोग त्याने आपल्या प्रयोगशाळेच्या विस्तारासाठी केला.

तारायंत्र, फोनोग्राम, टेलिफोन, विजेचा बल्ब असे अनेक शोध लावून एडिसनने माणसांसाठी दूरसंचार सोयींचा प्रारंभ करून दिला. आपल्या शास्त्रीय ज्ञानाचा उपयोग व्यावहारिक सुखसोयींचा प्रारंभ करणारा हा शास्त्रज्ञ दि. १८ ऑक्टोबर १९३१ रोजी निधन पावला. ज्याच्या दीर्घ प्रयत्नांमुळे अंधारयुगातच वावरणा-या माणसाच्या जीवनात विजेचा प्रकाशझोत आला आणि अवघी सृष्टी उजळून निघाली, असा हा शास्त्रज्ञ थॉमस अल्वा एडिसन!Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here