ठाण्यात आजपासून ‘भव्य कोकण महोत्सव २०२०’

0
57


मुंबई : मनसे पक्षनेते राजसाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मनसे प्रभाग क्र. १९ तर्फे १७ जानेवारीपासून २५ जानेवारी दरम्यान ‘भव्य कोकण महोत्सव २०२०’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. ठाणे येथील रघुनाथ नगर येथे हा कार्यक्रम रंगणार आहे. महोत्सवात पारंपरिक दशावतारी नाटके, महिलांसाठी होम मिनिस्टर, कोकणी रुचकर खाद्यपदार्थ, लहान मुलांसाठी फनफेअर तसेच विविध स्टॉल आयोजित करण्यात आले आहेत. मुलांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी शिबिरे व अनेक स्पर्धाचे आयोजन केले आहे.

दररोज सायंकाळी ६.०० ते रात्री १०.०० वा. दरम्यान विविध स्पर्धा रंगणार आहेत. १७ जानेवारी रोजी महोत्सवाच्या उद्घाटनासह अनंत कोटी श्री स्वामी समर्थ नाटक सादर होईल. तर १८ जानेवारी रोजी संगीत भजन, १९ जानेवारी रोजी जादूचे प्रयोग, मिमिक्री, २० जानेवारी रोजी महिलांसाठी पैठणी खेळ, २१ जानेवारी रोजी हळदी-कुंकू कार्यक्रम, २२ जानेवारी रोजी दशावतार, २३ जानेवारी रोजी कोळी नृत्य, २४ जानेवारी रोजी लावणी नृत्य, २५ जानेवारी रोजी नृत्यस्पर्धा आणि महोत्सवाचा समारोप सोहळा आयोजित केला आहे. दररोज रात्री १०.०० वा. महिलांसाठी आयोजित पैठणी खेळासाठी लकी ड्रॉचा निकाल जाहीर होईल. त्यावेळी विजयी स्पर्धक उपस्थित असणे बंधनकारक आहे.

मनसे सरचिटणीस बाळा नांदगावकर, मनसे नेते अभिजीत पानसे, मनसे नेते आमदार राजू पाटील, खेड नगराध्यक्ष वैभव खेडेकर, ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव, ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे, महिला शहर अध्यक्ष रोहिणी निंबाळकर, उपशहर अध्यक्ष मनोहर चव्हाण, ठाणे शहर सचिव अनिल म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here