'जामा मशीद पाकिस्तानात आहे का?'

0
31


वृत्तसंस्था, नवी दिल्ली

‘भीम आर्मी’चे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांच्याविरुद्ध कुठलाही पुरावा सादर करू न शकणाऱ्या पोलिसांवर न्यायालयाने चांगलेच ताशेरे ओढले. संसदेमध्ये जे सांगणे अपेक्षित आहे, ते सांगितले न गेल्यामुळे लोक रस्त्यावर उतरतात, या शब्दांत न्यायालयाने पोलिसांना फटकारले. जामा मशीद पाकिस्तानात आहे का, असा सवाल करतानाच तिथे असली, तरी लोक शांततेच्या मार्गाने विरोध करू शकतात, अशीही खरडपट्टी न्यायालयाने काढली.

आझाद यांच्या जामीन अर्जावरील सुनावणीवेळी न्यायालयाने आपली मते व्यक्त केली. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध करताना आझाद यांना अटक करण्यात आली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश कामिनी लाऊ यांनी म्हटले आहे, की ‘जामा मशीद पाकिस्तानात असल्यासारखे दिल्ली पोलिसांचे वर्तन आहे आणि ही मशीद पाकिस्तानात असली, तरी तिथेही ते शांततेच्या मार्गाने विरोध करू शकतात. पाकिस्तान एकेकाळी अखंड भारताचाच एक भाग होता. संसदेमध्ये ज्या बाबी सांगितल्या गेल्या पाहिजेत, त्या न सांगितल्यामुळे लोक रस्त्यावर उतरतात. मते मांडण्याचा पूर्ण हक्क आपल्याला आहे; पण देशाचे नुकसान आपण करू शकत नाही.’ जामा मशिदीच्या ठिकाणी झालेली गर्दी बेकायदा होती हे दर्शवणारे आणि जमावासमोर आझाद चिथावणीखोर भाषणे देत असतानाचे सर्व पुरावे न्यायालयासमोर सादर करा, असे न्यायालयाने पोलिसांना सांगितले.

ड्रोनद्वारे काढलेली केवळ छायाचित्रे आपल्याकडे आहेत, असे पोलिसांनी सांगितले. त्यावर न्यायालयाने संताप व्यक्त केला. ‘अशा जमावाला प्रतिबंध करणारा कुठला कायदा आहे, हे सांगू शकाल, हिंसा कुठे आहे, तुम्ही विरोध करू शकत नाही, असे कुणी सांगितले, घटना तुम्ही वाचली आहे का, अशी प्रश्नांची सरबत्ती न्यायालयाने केली. निदर्शने करणे हा घटनेने दिलेला हक्क आहे, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

‘जामिया मिलिया’त ‘एनएचआरसी’चे पथक

नवी दिल्ली : राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या (एनएचआरसी) पथकाने मंगळवारी ‘जामिया मिलिया इस्लामिया’ विद्यापीठाला भेट दिली. गेल्या महिन्यात पोलिसांनी केलेल्या लाठीमारात जखमी विद्यार्थ्यांची मते आयोगाने नोंदवून घेतली. ‘जामिया मिलिया’मध्ये आयोगासमोर अंदाजे ३५ ते ४० विद्यार्थी उपस्थित होते. पोलिस अधिकारी मंजिल सैनी यांच्या नेतृत्वाखाली आयोगाचे पथक दाखल झाले आहे. पोलिसांच्या कृतीतून मानवी हक्कांचा भंग झाला होता का, याचा तपास पथक करील.

उच्च न्यायालयाचे आदेश

‘जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये नुकत्याच झालेल्या हिंसाचारप्रकरणी पोलिसांना हवी असलेली माहिती ‘व्हॉट्सअॅप’ आणि ‘गुगल’ने पुरवावी,’ असे आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने दोन्ही कंपन्यांना दिले आहेत. तसेच, साक्षीदारांना तत्काळ समन्स बजावावे आणि हिंसेशी संबंधित चर्चा करणाऱ्या दोन ‘व्हॉट्सअॅप ग्रुप’च्या सदस्यांचे फोन ताबडतोब जप्त करावेत, असेही आदेश दिले आहेत. ‘जेएनयू’चे प्रशासन आणि विद्यापीठ परिसरातील ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’लाही त्यांच्याकडील ‘सीसीटीव्ही फूटेज’ ताबडतोब द्यावेत, असे आदेश देण्यात आले आहेत. पोलिसांनी यूजरची माहिती, त्यांचा ई-मेल अॅड्रेस दिला, तर माहिती देता येईल, असे ‘गुगल’ने न्यायालयात स्पष्ट केले. आमच्या सिस्टीमवरील सर्व माहिती सुरक्षित राखली जाईल, असेही गुगलने स्पष्ट केले.

जेएनयूतील वर्ग सुरू

जेएनयूतील बहुतेक वर्ग सुरू झाले असून, आज विद्यापाठीच्या आवारात शांतता होती. काही विद्यार्थी आणि शिक्षक मात्र अनुपस्थित होते. जेएनयूचे रजिस्ट्रार प्रमोद कुमार यांनी ही माहिती दिली.

window.fbAsyncInit = function() {
FB.init({
appId : ‘117787264903013’,
autoLogAppEvents : true,
xfbml : true,
version : ‘v2.10’,
oauth : true,
status : true,
cookie : true
});
FB.AppEvents.logPageView();
};

(function(d, s, id){
var js, fjs = d.getElementsByTagName(s)[0];
if (d.getElementById(id)) {return;}
js = d.createElement(s); js.id = id;
js.src = “https://connect.facebook.net/en_US/sdk.js”;
fjs.parentNode.insertBefore(js, fjs);
}(document, ‘script’, ‘facebook-jssdk’));!function(f,b,e,v,n,t,s) {
if(f.fbq)return;n=f.fbq=function(){n.callMethod?
n.callMethod.apply(n,arguments):n.queue.push(arguments)};if(!f._fbq)f._fbq=n;
n.push=n;n.loaded=!0;n.version=’2.0′;n.queue=[];t=b.createElement(e);t.async=!0;
t.src=v;s=b.getElementsByTagName(e)[0];s.parentNode.insertBefore(t,s)
}
(window, document,’script’,’https://connect.facebook.net/en_US/fbevents.js’);

fbq(‘init’, ‘530684973736330’);
fbq(‘track’, “PageView”);Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here